Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

पुणे शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने कोंढवा परिसरात आंदोलन करण्यात आले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 16, 2026 | 01:41 PM
भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने कोंढवा परिसरात आंदोलन करण्यात आले. पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये भाजप नेत्यांच्या नावाने कमळ सोडून सत्ताधारी भाजपचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनात नगरसेवक गफूर पठाण, नगरसेविका अनिता इंगळे, महिला आघाडीच्या पुणे शहर अध्यक्षा स्वाती पोकळे यांच्यासह मकरंद देशमुख , रोहन पवार, सॉल्विन विलियम, प्रमोद संचेती, अमोल भूरेवर, उर्मिलाताई गुंड, जयश्री आदमाने, जावेद पठाण, इस्माइल आगवान, हानिफ शेख, आरिफ शेख, इम्तियाज शेख, शाहीद शेख आदि नागरिक उपस्थित होते. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हे सुद्धा वाचा  : चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

यावेळी श्रीकांत पाटील म्हणाले, “पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अनेक ठिकाणी अपघात झाले असून काही नागरिकांना जीव गमवावा लागला, तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. मात्र, पुणे महानगरपालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपकडून या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे.” “पुणेकर नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी न बुजविलेल्या खड्ड्यांच्या कामांसाठी टेंडर काढून जनतेच्या पैशांचा अपव्यय केला जात आहे. महापालिकेपासून केंद्र सरकारपर्यंत भाजपची सत्ता असतानाही पुणे शहरातील रस्त्यांचा प्रश्न सोडवण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत,” असा आरोपही त्यांनी केला. कोंढवा परिसरातील खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असून, खड्ड्यांमध्ये कमळ सोडून भाजपचा निषेध करण्यात आला. “पुणे शहर लवकरात लवकर खड्डेमुक्त करण्यात यावे, अन्यथा येत्या काळात शहरभर तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

हे सुद्धा वाचा : नोकरीत भागेना, बहाद्दराने काढला ड्रग्जचा कारखाना; पोलिसांना सुगावा लागला अन्…

Web Title: Sharad pawars ncp has staged a protest in pune over the potholes on the roads

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • BJP
  • MP Sharad pawar
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण
1

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण

पावसामुळे शाळांच्या परिसराती बसथांबा कोसळला, मनसे आक्रमक; महापालिका आयुक्तांकडे केली ‘ही’ मागणी
2

पावसामुळे शाळांच्या परिसराती बसथांबा कोसळला, मनसे आक्रमक; महापालिका आयुक्तांकडे केली ‘ही’ मागणी

Maharashtra Drought: दुष्काळाच्या यादीबाहेर असूनही पावसाचा दुष्काळ! पुण्यातील ५ तालुक्यांतील ४३ मंडळांत शेतीवर संकट
3

Maharashtra Drought: दुष्काळाच्या यादीबाहेर असूनही पावसाचा दुष्काळ! पुण्यातील ५ तालुक्यांतील ४३ मंडळांत शेतीवर संकट

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
4

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.