Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gokul Milk Price Hike: अमूल-मदर डेअरीनंतर आता गोकुळ दूधही महागणार; दरात २ रुपयांची वाढ होणार?

Gokul Milk Price Hike: अमूल आणि मदर डेअरीच्या दरवाढीनंतर आता गोकुळनेही दूध दर वाढवले, तर ग्राहकांच्या मासिक खर्चात आणखी भर पडू शकते. दुसरीकडे, खरेदी दरात वाढ झाल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकतो.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 13, 2026 | 01:15 PM
Gokul Milk Price Hike News, Gokul Milk Rate Increase 2 Rupees, Gokul Milk, Milk Price Hike

Gokul Milk Price Hike News, Gokul Milk Rate Increase 2 Rupees, Gokul Milk, Milk Price Hike

Follow Us
Follow Us:
  • प्रत्येकी २ रुपये दरवाढीची शक्यता
  • नव्या संचालक मंडळाची उद्या बैठक
  • ग्राहक आणि शेतकऱ्यांवर दुहेरी परिणाम
Gokul Milk Price Hike: अमूल आणि मदर डेअरी पाठोपाठ आता पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य दूध उत्पादक संघ गोकुळ दूध संघाकडूनही दूध दरवाढीचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. गोकुळच्या दूध खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी दोन रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्या होणाऱ्या नव्या संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

दूध विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय झाल्यास त्यानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या खरेदी दरातही वाढ केली जाऊ शकते. ग्राहकांकडून दूध विक्रीतून मिळणारे उत्पन्न आणि शेतकऱ्यांना द्यावा लागणारा दर यांचा विचार करून हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Gokul Election : गोकुळच्या मतमोजणीवेळी शरद पवारांचा सतेज पाटलांना फोन! नेमकं काय म्हणाले होते पवार?

गोकुळच्या पहिल्याच बैठकीत दरवाढीवर चर्चा?

गोकुळ दूध संघाच्या नव्या कार्यकारिणीची उद्या पहिली बैठक होणार आहे. या बैठकीत दूध खरेदी आणि विक्री दरवाढीच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दूध विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय झाल्यास त्यानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या खरेदी दरातही वाढ केली जाऊ शकते. सध्या खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी दोन रुपयांची वाढ अपेक्षित असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीतच होणार आहे.

दूध उत्पादकांसह ग्राहकांचेही बैठकीकडे लक्ष

अमूल आणि मदर डेअरीच्या दरवाढीनंतर आता गोकुळनेही दूध दर वाढवले, तर ग्राहकांच्या मासिक खर्चात आणखी भर पडू शकते. दुसरीकडे, खरेदी दरात वाढ झाल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकतो. मात्र, गोकुळच्या दूध दरात नेमकी किती वाढ होणार आणि ती कधीपासून लागू होणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे उद्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे दूध उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

Gokul Election : अध्यक्षपदासाठी महायुतीचा मास्टर प्लॅन; चार पक्षांना प्रत्येकी एक वर्ष अध्यक्षपद, पाचव्या वर्षाचा निर्णय कसा?

दरम्यान, या पूर्वी अमूल आणि मदर डेअरीने दूध दरात वाढ केल्याने ग्राहकांच्या खर्चात भर पडली आहे. आता गोकुळनेही दरवाढ केल्यास ग्राहकांना आणखी महागाईचा सामना करावा लागू शकतो. मात्र, गोकुळच्या दूध दरात नेमकी किती वाढ होणार आणि ती कधीपासून लागू होणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे उद्याच्या बैठकीतील निर्णयाकडे दूध उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

अमूल दूध दरात प्रति लीटर ४ रुपयांची वाढ

देशातील आघाडीची डेअरी कंपनी अमूलने दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या दरानुसार अमूल गोल्ड दुधाच्या किमतीत प्रति लिटर ४ रुपयांची, तर अमूल ताजाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा परिणाम दररोज अमूल दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या मासिक बजेटवर होण्याची शक्यता आहे.

दुधाच्या दरात किती वाढ झाली?

अमूल गोल्ड दुधाचा दर यापूर्वी प्रति लिटर ७० रुपये होता. त्यात ४ रुपयांची वाढ झाल्याने आता ग्राहकांना एका लिटरसाठी ७४ रुपये मोजावे लागणार आहेत. तर अमूल ताजा दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती आहे. चहा, कॉफी, लहान मुलांसाठी दूध तसेच दैनंदिन वापरासाठी नियमित दूध खरेदी करणाऱ्या कुटुंबांना या दरवाढीचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागू शकतो.

पूरक उत्पादनांच्या किमतीतही वाढ

अमूलने दुधाच्या पूरक उत्पादनांच्या किमतीतही ४ ते ५ टक्क्यांनी वाढ केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अमूल फ्रेश, गोल्ड आणि फुल क्रीम यांसारख्या दूध प्रकारांच्या किमतीतही दोन ते चार रुपयांची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.

 

 

 

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोकुळ दूध संघाकडून दुधाच्या दरात किती रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे?

    Ans: गोकुळ दूध संघाकडून दूध खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी दोन रुपयांची वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • Que: गोकुळच्या दूध दरवाढीचा निर्णय कधी घेतला जाऊ शकतो?

    Ans: गोकुळ दूध संघाच्या नव्या संचालक मंडळाची उद्या पहिली बैठक होणार असून, या बैठकीत दरवाढीच्या प्रस्तावावर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

  • Que: या संभाव्य दरवाढीचा शेतकरी आणि ग्राहकांवर काय परिणाम होईल?

    Ans: दूध विक्री दर वाढल्यास ग्राहकांच्या मासिक खर्चात भर पडेल, तर दुसरीकडे खरेदी दर वाढल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा थेट आर्थिक लाभ मिळू शकेल.

Web Title: Gokul milk union likely to hike procurement and selling prices by 2 rupees as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • Gokul Milk
  • kolhapur news
  • Milk Price Hike

संबंधित बातम्या

Gokul Election : गोकुळच्या मतमोजणीवेळी शरद पवारांचा सतेज पाटलांना फोन! नेमकं काय म्हणाले होते पवार?
1

Gokul Election : गोकुळच्या मतमोजणीवेळी शरद पवारांचा सतेज पाटलांना फोन! नेमकं काय म्हणाले होते पवार?

Kolhapur News: आरोग्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात आरोग्यसेवेचा बोजवारा! गारगोटीतही महाडायलिसिस सेवा बंद, पुढे काय?
2

Kolhapur News: आरोग्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात आरोग्यसेवेचा बोजवारा! गारगोटीतही महाडायलिसिस सेवा बंद, पुढे काय?

Milk Price Hike: 12 नोव्हेंबरपासून दूध महागणार, मदर डेअरीने वाढवले भाव; आता खिशाला किती पडणार भगदाड
3

Milk Price Hike: 12 नोव्हेंबरपासून दूध महागणार, मदर डेअरीने वाढवले भाव; आता खिशाला किती पडणार भगदाड

Gokul Election : अध्यक्षपदासाठी महायुतीचा मास्टर प्लॅन; चार पक्षांना प्रत्येकी एक वर्ष अध्यक्षपद, पाचव्या वर्षाचा निर्णय कसा?
4

Gokul Election : अध्यक्षपदासाठी महायुतीचा मास्टर प्लॅन; चार पक्षांना प्रत्येकी एक वर्ष अध्यक्षपद, पाचव्या वर्षाचा निर्णय कसा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.