Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडगाव गावठाणात रस्ता सुरू करा, अन्यथा…; शेतकऱ्यांचा इशारा

मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील गावठाण ते पाझर तलाव रस्ता गावठाण पासून सुरू न केल्यास शेतकरी व गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी सामूहिक आत्मदहन करणार असल्याचे निवेदन जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र क्षीरसागर यांना देण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 23, 2022 | 08:12 PM
वडगाव गावठाणात रस्ता सुरू करा, अन्यथा…; शेतकऱ्यांचा इशारा
Follow Us
Follow Us:

शिरोली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील गावठाण ते पाझर तलाव रस्ता गावठाणपासून सुरू न केल्यास शेतकरी व गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी सामूहिक आत्मदहन करणार असल्याचे निवेदन जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र क्षीरसागर यांना देण्यात आले. त्यांच्याशी फोनवरून संभाषण झाले असता त्यांच्या वतीने उपकार्यकारी अभियंता पोळ यांनी त्यांच्या आदेशानुसार निवेदन स्वीकारले.

निवेदनात म्हटले आहे की, मौजे वडगाव येथील गावठाण ते पाझर तलाव रस्त्याची सुधारणा गेल इंडिया कंपनीच्या सीएसआर फंडातून होत आहे .सदर रस्त्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी विनामोबदला जमिनी दिल्या आहेत .सदर रस्त्याचा ग्रामपंचायत ग्रामसभा ठरावानुसार कामाची वर्क ऑर्डर गावठाण पासून पाझर तलावापर्यंत अशी आहे. परंतु ठेकेदाराने व गावातील तथाकथित पुढाऱ्यांनी सुरुवातीचे अंतर सोडून पुढचा रस्ता सुरू केला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम बंद पाडले. त्यामुळे ठेकेदाराने रस्त्यासाठी लागणारी यंत्र सामग्री घेऊन गेले.

दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी व खासदार धैर्यशील माने तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी जि. प. बांधकाम विभागाला पत्राद्वारे वर्क ऑर्डर नुसार रस्त्याचे काम गावठाण पासून सुरु करावे असे लेखी पत्र दिले. परंतु सव्वा महिना होऊन गेले तरी ग्रामपंचायतीने कोणतीही हालचाल केली नाही.

आत्मदहनाच्या निवदेनाची प्रत, खासदार धैर्यशील माने यांचे बांधकाम विभागाला दिलेले लेखी पत्र, बांधकाम उपविभाग हातकणंगले यांनी ग्रामपंचायतीला दिलेले लेखी पत्र जोडत असून माहितीसाठी प्रत मा. पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर यांना देण्यात आले आहे. निवेदनावर मनोहर चौगले, गुणधर परमाज, बाळासो थोरवत, मधुकर अकीवाटे, सुरेश कांबरे, स्वप्नील चौगुले, सुनील खारेपाटणे, यांच्या सह्या आहेत.

Web Title: Start the road in wadgaon village demands of farmers shiroli kolhapur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2022 | 08:12 PM

Topics:  

  • kolhapur
  • Shiroli

संबंधित बातम्या

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
1

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Kolhapur Ichalkaranji Ganesh Visarjan: फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मधमाशांचा हल्ला, भाविकांची पळापळ
2

Kolhapur Ichalkaranji Ganesh Visarjan: फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मधमाशांचा हल्ला, भाविकांची पळापळ

Lotus Eletre चा कोल्हापुरात ग्रँड शो! लक्झरी इलेक्ट्रिक Hyper-SUV चे सादरीकरण; दोन दिवस रंगणार खास Brand Experience कार्यक्रम
3

Lotus Eletre चा कोल्हापुरात ग्रँड शो! लक्झरी इलेक्ट्रिक Hyper-SUV चे सादरीकरण; दोन दिवस रंगणार खास Brand Experience कार्यक्रम

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
4

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.