Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकण आपत्ती निवारण हक्क समिती करणार लाल व निळा रेषांच्या परिणांमाबाबत जनजागृती ! 

लाल आणि निळ्या रेषांच्या भविष्यातील परिणामांबाबत जनजागृती करावी तसेच शासनाने या दोन्ही रेषांच्या २०२१च्या सुधारणांना तात्काळ स्थगिती द्यावी या मागण्यांसाठी कोकण आपत्ती निवारण हक्क समिती कोकण परिषद आयोजित करणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Dec 25, 2024 | 11:40 PM
फोटो सौजन्य- प्रतिनिधी

फोटो सौजन्य- प्रतिनिधी

Follow Us
Close
Follow Us:

लाल व निळ्या रेषांच्या भविष्यातील परिणामांबाबत लोकांना माहिती व्हावी व त्या दृष्टीने जनजागृती करावी तसेच शासनाने या दोन्ही रेषांच्या २०२१च्या सुधारणांना तात्काळ स्थगिती द्यावी या सर्व मागण्यांकरिता कोकण आपत्ती निवारण हक्क समिती कोकणात ठिकठिकाणी कोकण परिषद आयोजित करणार असल्याची माहिती समितीच्या  वतीने देण्यात आली.

नुकतीच कोकण आपत्ती निवारण हक्क समितीची बैठक खेड येथे पार पडली. यावेळी कोकणातल्या पुरांसहीत विविध आपतींवर चर्चा झाली व शासनाकडून यावर काय उपाययोजना केल्या जात आहेत व आणखी काय अपेक्षित आहेत यावरचा तांत्रिक आढावा घेण्यात आला. कोकणातील महाड, खेड, चिपळूण,संगमेश्वर व राजापूर या मुख्य शहरांमध्ये दरवर्षी पूर येत असतो. लाखो रुपयांचे नुकसान तसेच अनेक गोष्टींचा फटका बसत असतो. पुराचा धोका कमी व्हावा याकरिता गाळ काढण्याचे काम काही ठिकाणी सुरू आहे. परंतु गाळ काढण्याच्या या कामाला कमी निधी मिळत असल्याने त्या त्या टप्प्यातील काम वेळेत पूर्ण होत नाही व सातत्य राहत नाही असा मुद्दा यावेळी मांडण्यात आला. यासाठी पुरेसा निधी मिळण्याकरिता समितीचे शिष्टमंडळ संबंधित मंत्रीमहोदयांना भेटण्याचे यावेळी ठरले. संबंधित जलसंधारण विभागाकडून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात घडत असलेल्या सर्वच आपत्तींचा निकष लावून कोकणाला मदत व निधी उपलब्ध करून दिला जातो.कोकणातील आपत्तीची तीव्रता आणि भौगोलिक परिस्थिती ही सर्व लक्षात घेता, शासनाने असे धोरण न राबवता, कोकणातली आपत्तींची विशेष बाब म्हणून वेगळ्या हेड खाली हा निधी देण्यात यावा व यासाठी शासनाने एक नवीन विभाग सुरू करावा याचीही मागणी करण्याचे ठरले. याशिवाय कोकणातील नवीन व जुन्या पुलांचे ऑडिट तसेच जीपीएस ड्रोन सर्वे करणे आवश्यक असल्याचेही मत यावेळी मांडण्यात आले.

आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या अंतर्गत व्हॅकरियरस लायबिलिटी मध्ये नुकसान भरपाई मिळावी अशी ही मागणी करण्याचा ठराव यावेळी मांडण्यात आला.लाल व निळ्या रेषां सर्वसामान्य माणसाला अडचणीत आणणाऱ्या आहेत. या दोन्ही रेषा कोणत्याही शहराच्या विकासाला मारक आहेत. या दोन्ही रेषांच्या २०२१ च्या नवीन सुधारणा आल्या तर शहरात व गावात राहणं कठीण जाईल अशी ही भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे या नवीन सुधारणांना ताबडतोब शासनाने स्थगिती द्यावी तसेच गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू करावे जेणेकरून या रेषांची उंची कमी करता येईल व नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल या सर्व मागण्यांकरिता शासनाकडे दाद मागण्यात येणार आहे व याकरिता जनजागृती होण्यासाठी महाड खेड चिपळूण तसेच राजापूर येथे कोकण परिषद घेण्यात येणार आहे. ही परिषद जानेवारी पासून सुरु होईल व याकरिता त्या त्या भागातील समितीचे कार्यकर्ते हे लोकांपर्यंत पोहोचतील व त्यांना या रेषांचे गंभीर परिणाम समजावून सांगतील त्यानंतर शासनाकडे व संबंधित मंत्रालयाकडे याबाबतचा पाठपुरावा सुरू करण्यात येईल असेही यावेळी ठरवण्यात आले या बैठकीला चिपळूणहून सतीश कदम,शिरीष काटकर, आशिष जोगळेकर,पंकज दळवी तर महाडहून प्रकाश पोळ प्राध्यापक समीर बुटाला, संजीव मेहता, नितीन पावळे,सचिन करवा व खेड वरून बिपिन पाटणे ऋषिकेश कानडे, रविशंकर वेर्णेकर, विश्वास पाटणे, प्रमोद बुटाला, अतुल, शेठ आदी उपस्थित होते

Web Title: Konkan disaster relief rights committee to organize awareness campaign on the consequences of red and blue lines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2024 | 11:40 PM

Topics:  

  • Kokan News
  • maharashtra

संबंधित बातम्या

जगातील सर्वात मोठे ‘सद्भावना वृध्दाश्रम’ भारतभर १५१ कोटी झाडे लावणार
1

जगातील सर्वात मोठे ‘सद्भावना वृध्दाश्रम’ भारतभर १५१ कोटी झाडे लावणार

Mhada Lottery : स्वस्तात घर खरेदी करण्याची शेवटची संधी, ४१८६ घरांसाठी म्हाडाची लॉटरी, शेवटची तारीख कधी?
2

Mhada Lottery : स्वस्तात घर खरेदी करण्याची शेवटची संधी, ४१८६ घरांसाठी म्हाडाची लॉटरी, शेवटची तारीख कधी?

महाराष्ट्रात फार्मसीच्या तृतीयांश जागा रिक्त! गुणवत्तेचा अभाव, कालबाह्य अभ्यासक्रम आणि अव्यवस्थित प्रवेश प्रक्रियेची मोठी समस्या
3

महाराष्ट्रात फार्मसीच्या तृतीयांश जागा रिक्त! गुणवत्तेचा अभाव, कालबाह्य अभ्यासक्रम आणि अव्यवस्थित प्रवेश प्रक्रियेची मोठी समस्या

Mumbai Climate Week 2026: मुंबईतून सुरू होणार 2026 चा हरित क्रांतीचा प्रवास! मुंबई क्लायमेट वीकने सुरू केला इनोव्हेशनची महास्पर्धा
4

Mumbai Climate Week 2026: मुंबईतून सुरू होणार 2026 चा हरित क्रांतीचा प्रवास! मुंबई क्लायमेट वीकने सुरू केला इनोव्हेशनची महास्पर्धा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.