Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Konkan News : परतीच्या पावसामुळे भातपिकाचे प्रचंड नुकसान, कोकणातील बळीराजा हवालदिल

भातपिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने मराठवाडा, विदर्भासाठी दिलेल्या मदतीप्रमाणेच कोकणातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 31, 2025 | 07:12 PM
Konkan News : परतीच्या पावसामुळे भातपिकाचे प्रचंड नुकसान, कोकणातील बळीराजा हवालदिल
Follow Us
Close
Follow Us:
  • परतीच्या पावसामुळे भातपिकाचे प्रचंड नुकसान
  • कोकणातील बळीराजा हवालदिल
  • कोकणातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी

राज्यभरात परतीच्या पावसाने चांगलाच जोर धरल्याचं पाहायला मिळत आहे. या रपरतीच्या पावसाचा सर्वात मोठा फटका कोणाला बसला असेल तो म्हणजे शेतकरी वर्गाला. विदर्भ, मराठवाडा प्रमाणेच कोकणतील शेतकऱ्यांना देखील पावासामुळे शेतीच्या नुकसानीला सामोरं जावं लागत आहे.  वादळवारा आणि परतीच्या पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव माध्यम असलेल्या भातपिकाचे प्रचंड नुकसान झालंं. त्यामुळे मराठवाडा, विदर्भासाठी दिलेल्या मदतीप्रमाणेच कोकणातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी शिवसेना नेते, आमदार भास्करराव जाधव यांनी केली आहे. .याबाबत जाधव यांनी राज्याचे मुखमंत्री यांच्यासह कृषी तसेच मदत व पुनर्वसन मंत्री यांना रितसर पत्राद्वारे निवेदन केलं आहे.

या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, कोकणात गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पाऊस, वादळ आणि परतीच्या पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले पीक भिजून आडवे पडले आहे, त्यांना पुन्हा कोंब फुटले आहेत, तर काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके अक्षरशः सडत आहेत. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी प्रचंड चिंताग्रस्त असून शासनाने याची दखल घेऊन तात्काळ पंचनामे करावेत.

Karjat News : कर माफीच्या अभय योजनेत मुदतवाढ करा ; शिवसेनेकडून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

भातपीक हे कोकणातील एक प्रमुख पिक असून बहुतांश शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह त्यावर चालतो. परंतु, यावर्षी शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. हातातोंडाशी आलेले पिक डोळ्यांदेखत वाया जात असल्याचे पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.कोकणातील शेतकरी कितीही नुकसान झाले, संकटात सापडला, अन्याय झाला किंवा कर्जबाजारी असला तरी आत्महत्या करत नाही. त्यामुळे सरकार कोकणातील शेतकऱ्यांकडे कायमच दुर्लक्ष करत आलेलं आहे. परंतु यावेळची परिस्थिती खूपच गंभीर आहे. ही बाब लक्षात घेऊन मराठवाडा, विदर्भात यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्य सरकारने दिलेल्या मदतीप्रमाणेच कोकणातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच कापणीच्या वेळी आलेल्या वादळी पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतीला चांगलचं झोडपलं. त्याशिवाय सांगायचं तर, रत्नागिरी जिल्ह्यातील  खेड तालुक्यात देखील भातशेतीचं प्रचंड नुकसान पाहायला मिळालं. सिंधुदुर्ग जिल्यातील सावंडवाडी आणि वैभववाडी तालुक्यातील पावसामुळे कापणीला आलेलं भाताचं पिक भुईसपाट झालं आहे.

कर्जतमध्ये शेतकऱ्यांसाठी ‘ड्राय डायरेक्ट पेरणी’ भात तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक; ५०% पाण्याची बचत, उत्पादन वाढणार

Web Title: Konkan news heavy damage to rice crop due to return rains farmer in konkan in custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 07:10 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • Heavy Rain
  • Konkan

संबंधित बातम्या

Cyclone Montha : उत्तर प्रदेशसह बिहारमध्ये मुसळधार पाऊस; आंध्र प्रदेशात तिघांचा मृत्यू तर पिकांना मोठा फटका
1

Cyclone Montha : उत्तर प्रदेशसह बिहारमध्ये मुसळधार पाऊस; आंध्र प्रदेशात तिघांचा मृत्यू तर पिकांना मोठा फटका

Pankaja Munde: “पशुपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जामुळे…”; काय म्हणाल्या मंत्री पंकजा मुंडे?
2

Pankaja Munde: “पशुपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जामुळे…”; काय म्हणाल्या मंत्री पंकजा मुंडे?

Latur : जिल्ह्यात पावसाचा कहर; रेना नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
3

Latur : जिल्ह्यात पावसाचा कहर; रेना नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Kolhapur News : परतीच्या पावसाचा पिकांना धोका; शेतकरी वर्गाची तारांबळ
4

Kolhapur News : परतीच्या पावसाचा पिकांना धोका; शेतकरी वर्गाची तारांबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.