Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रत्नागिरी जिल्ह्यातील ३५ किनाऱ्यांवर १७९ कासव घरटी; 66 पिल्ले समुद्राकडे मार्गस्थ

गतवर्षांतील कासव पिल्लांच्या अंड्यांच्या संरक्षणाबरोचरच महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कासव संवर्धनामध्ये गुहागर समुद्रकिनारा अग्रेसर आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 04, 2026 | 02:40 PM
रत्नागिरी जिल्ह्यातील ३५ किनाऱ्यांवर १७९ कासव घरटी; 66 पिल्ले समुद्राकडे मार्गस्थ
Follow Us
Follow Us:

३५ किनाऱ्यांवर १७९ कासव घरटी
१८.७३६ अंड्यांचे संवर्धन
आतापर्यंत ६६ पिल्ले सोडली समदात

गुहागर: कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचा हंगाम सुरू असून, रत्नागिरी जिल्ह्यातील ३५ समुद्रकिनाऱ्यांवर कासव संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत १७९ घरट्यांमधून १८ हजार ७३६ अंड्यांचे यशस्वीरीत्या संरक्षण करण्यात आले असून, अंड्यातून बाहेर पडलेली ६६ पिल्ले सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, गुहागर येथे टॅगिंग केलेली चार कासवे पुन्हा अंडी घालण्यासाठी परतली असून, यामुळे कासव आपल्या मूळ स्थानीच अंडी घालण्यासाठी येतात, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

थंडीचा कडाका अनविणीचा हंगाम जिल्ह्यात सध्या थंडीचा कडाका वाढला असून, हे वातावरण कासवांच्या विणीसाठी पोषक मानले जाते. यावर्षी कासव विणीचा हंगाम काहीसा लांबला आहे. मात्र, सध्या ज्या वेगाने कासवे किनाऱ्यांकडे येत आहेत, ते पाहता फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणावर अंड्यांचे संवर्धन होईल, असा अंदाज वन विभाग व कासव मित्र संस्थांनी व्यक्त केला आहे. कासर्वाच्या स्थलांतराचा व त्यांच्या सवयींचा अभ्यास करण्यासाठी ‘टॅगिंग’ (खूण करणे) पद्धत वापरली जाते.

गुहागर किनाऱ्यावर यापूर्वी टॅगिंग केलेली चार कासवे या हंगामात पुन्हा अंडी घालण्यासाठी परतल्याचे दिसून आले. एकदा अंडी घालून गेलेली कासवे पुन्हा त्याच किनाऱ्यावर येतात, हे यावरून अधोरेखित झाले असून संवर्धन मोहिमेचे हे मोठे यश मानले जात आहे. जिल्ह्यातील ३५ किनाऱ्यांवर कासव संवर्धन मोहीम सुरू असली, तरी त्यातील आठ ठिकाणच्या किनाऱ्यांवर अद्याप एकही घरटे आढळलेले नाही. त्यात गुहागरमधील एका ठिकाणासह तवसाळ, ढोकमळे, जैतापूर, पूर्णगड, आडे, कर्दे, काळबादेवी, भाट्ये यांचा समावेश आहे. पुढील २ महिने या किनाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. वनरक्षक आणि स्थानिक कासव मित्र रात्रंदिवस गस्त घालून या घरट्यांचे शिकारी व भक्षकांपासून संरक्षण करत आहेत.

Turlte News: कासव संवर्धनामध्ये राज्यात गुहागर अग्रेसर; १,४१८ अंड्यांचे संरक्षण

राज्यात गुहागर अग्रेसर

गतवर्षांतील कासव पिल्लांच्या अंड्यांच्या संरक्षणाबरोचरच महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कासव संवर्धनामध्ये गुहागर समुद्रकिनारा अग्रेसर आहे. येथे कासव पिल्लांचा जन्मदर अधिक असून गुहागरमध्ये आतापर्यंत १.४९८ कासव अंड्यांचे संरक्षण करण्यात आले आहे यामुळे यावर्षी १७ जानेवारीपासून कासव पिल्लांचा जन्मोत्सव सुरु होणार आहे. गुहागर समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवाच्या अंड्यांचे कांदळवन विभागाकडून संरक्षण करण्यात येते. गतवर्षी समुद्रकिनारी ३४२ घरट्यांमध्ये ३३.१५९ अंड्यांचे संरक्षण देण्यात आले होते. त्यामधून २२,२६१ कासव पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. गुहागर समुद्रकिना-याबरोबर तवसाळ व रोहिले समुद्रकिनारीही ५६ पाठ्‌यामधून ५.२८७जेंडाचे सरक्षण करण्यात आले. त्यामधून २.९९८ पिलले बाहेर आली होती आतापर्यंत १३ घरट्यांमध्ये १,४१८ अंड्याचे संरक्षण करण्यात आले.

यंदा सर्वाधिक अंड्यांची शक्यता
गुहागर समुद्रकिनाऱ्यावर सहा ठिकाणी कसब अंडी संरक्षण केंद्र उभारण्यात आली असून पाच्या संरक्षणासाठी ११ कासवमित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. तवसाळ, रोहले व वेळणेश्वर येथे प्रत्येकी एक कासव अडी संरक्षण केंद्र तयार करण्यात जाते असून त्या ठिकाणी प्रत्येकी दोन कासवमित्र नियुक्त करण्यात आले आहेत.

Web Title: 179 turtle nests on 35 beaches in ratnagiri district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Konkan
  • Ratnagiri
  • Turtle

संबंधित बातम्या

Ratnagiri Accident: दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, मागून कारही आदळली; रत्नागिरी-पावस मार्गावर विचित्र अपघात, २२ प्रवासी जखमी
1

Ratnagiri Accident: दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, मागून कारही आदळली; रत्नागिरी-पावस मार्गावर विचित्र अपघात, २२ प्रवासी जखमी

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट
2

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.