Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shaktipeeth Mahamarga News: विकास की विनाशाचा महामार्ग? शक्तीपीठ प्रकल्पावरून डॉ. परुळेकर आक्रमक

महामार्गामुळे वन्यजीवांचे अधिवास नष्ट होऊन विस्थापन होईल. यामुळे आधीच गव्यांच्या त्रासाने त्रस्त असलेला शेतकरी अधिकच संकटात येईल.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 04, 2026 | 06:15 PM
Shaktipeeth Mahamarg, Konkan News, Environment Threat, Sindhudurg News, Save Konkan,शक्तीपीठ महामार्ग विरोध २०२६, डॉ. जयेंद्र परुळेकर शक्तीपीठ, कोकण जैवविविधता संकट,

Shaktipeeth Mahamarg, Konkan News, Environment Threat, Sindhudurg News, Save Konkan,शक्तीपीठ महामार्ग विरोध २०२६, डॉ. जयेंद्र परुळेकर शक्तीपीठ, कोकण जैवविविधता संकट,

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्य सरकारने ‘शक्तिपीठ महामार्गा’चा नवा आराखडा जाहीर केला
  • कोणाच्या फायद्यासाठी १ लाख १० हजार कोटींचा घाट- डॉ. परुळेकर
  • नागपूर-रत्नागिरी मार्ग असताना नव्या मार्गाची गरज काय
Shaktipeeth Mahamarga Latest News: राज्य सरकारने ‘शक्तिपीठ महामार्गा’चा नवा आराखडा जाहीर केला असला, तरी या प्रकल्पामुळे कोकणातील जैवविविधता आणि शेतकऱ्यांच्या अस्तित्वावर मोठे संकट उभे राहिले आहे. बाराऐवजी आता तेरा जिल्ह्यांतून जाणारा आणि ८०६ किमीवरून ८५६ किमी लांबी वाढलेला हा महामार्ग म्हणजे जनतेच्या रेट्यापुढे सरकारने स्वीकारलेला तात्पुरता बदल असला, तरी मूळ धोके कायम आहेत, अशी टीका डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे.

 

मागणी नसताना महामार्गाचा अट्टहास का?

डॉ. परुळेकर यांनी सरकारला थेट सवाल केला आहे की, या महामार्गासाठी महाराष्ट्रातील कोणत्याही जनतेने किंवा शेतकरी संघटनेने साधी विनंती किंवा निवेदन दिलेले नाही. मग कोणाच्या फायद्यासाठी हा एक लाख दहा हजार कोटींचा घाट घातला जात आहे? विदर्भ आणि कोकणाला जोडण्यासाठी आधीच ‘नागपूर-रत्नागिरी’ महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असताना, त्याच मार्गाला समांतर असा नवा महामार्ग कशासाठी, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Shaktipeeth Mahamarg News: शेतकऱ्यांच्या विरोधापुढे सरकार झुकलं; शक्तीपीठ महामार्गाचा नकाशा बदलला! ९५% बदल

निसर्गाची कत्तल आणि न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील ज्या गावांमधून हा मार्ग जाणार आहे, ती गावे निसर्गसंपन्न आणि वन्यजीवांनी समृद्ध आहेत. विशेष म्हणजे: प्रस्तावित आराखड्यातील सहा गावे ‘इको सेन्सिटिव्ह’ क्षेत्रात येतात. दोडामार्ग तालुक्यात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वृक्षतोडीवर बंदी आहे. १०० मीटर रुंदीच्या पट्ट्यासाठी हजारो झाडांची कत्तल झाल्यास पर्यावरणाचे कधीही न भरून येणारे नुकसान होईल. उच्च न्यायालयाच्या आदेशाला धाब्यावर बसवून हा कसला विकास साधला जात आहे? असा सवाल डॉ. परुळेकर यांनी विचारला आहे.

 

‘एक्झिट’ नाही, मग गावांचा विकास कसा?

या महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही ‘एक्झिट’ प्रस्तावित नाही. १८ तासांचा प्रवास ८ तासांवर आणण्याच्या नादात १२० किमी वेगाने धावणाऱ्या गाड्या पाहण्यापलीकडे स्थानिक ग्रामस्थांच्या हाती काहीही लागणार नाही. उलट, १०० मीटर रुंदीचे महाकाय भराव घातल्यामुळे नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटतील आणि पावसाळ्यात शेतीमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन छोट्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडेल.

NCP Merger News Update: दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? विलीनीकरणाच्या चर्चेवर जय पवारांचे सूचक वक्तव्य

वन्यजीव-मानव संघर्ष वाढण्याची भीती

महामार्गामुळे वन्यजीवांचे अधिवास नष्ट होऊन विस्थापन होईल. यामुळे आधीच गव्यांच्या त्रासाने त्रस्त असलेला शेतकरी अधिकच संकटात येईल. आता गवेरेडे थेट शेतकऱ्यांच्या अंगणात येतील अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे, असे डॉ. परुळेकर यांनी नमूद केले.

 

पालकमंत्र्यांवर टीका

पर्यावरण रक्षणासाठी लढणाऱ्यांना ‘समाजविघातक प्रवृत्ती’ म्हणण्यापर्यंत पालकमंत्र्यांची मजल गेली आहे. यावरून या प्रकल्पासाठी त्यांच्यावर वरिष्ठांचा किती मोठा दबाव आहे, हे स्पष्ट होते. रेणुका माता, तुळजाभवानी आणि अंबाबाई यांसारख्या श्रद्धास्थानांचे नाव पुढे करून केवळ आर्थिक लाभासाठी निसर्गाचा बळी देणाऱ्यांना देवी पावेल काय? असा संतप्त सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.

 

Web Title: Konkan under threat massive tree felling feared for shaktipeeth project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • Shaktipeeth Mahamarg

संबंधित बातम्या

Shaktipeeth Mahamarg News: शेतकऱ्यांच्या विरोधापुढे सरकार झुकलं; शक्तीपीठ महामार्गाचा नकाशा बदलला! ९५% बदल
1

Shaktipeeth Mahamarg News: शेतकऱ्यांच्या विरोधापुढे सरकार झुकलं; शक्तीपीठ महामार्गाचा नकाशा बदलला! ९५% बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.