Koyna Dam: महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' म्हणून ओळख असलेल्या कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात घट; वीजनिर्मितीवर परिणाम होणार?
सातारा: महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेल्या कोयना नदीच्या शिवसागर जलाशयाची पाणीपातळी तीव्र उन्हाळ्याने घटू लागली असून नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात उघडे पडू लागले आहे, त्यामुळे जलाशयातील बेटे दिसू लागली आहेत. १०५ टीएमसी क्षमता असलेल्या कोयनेची पाणी पातळी यावर्षी शंभर टक्के भरली होती.
सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे वीज निर्मिती, शेतीसाठी व पिण्याचे पाणी, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन यामुळे पाणी दिवसेंदिवस वेगाने कमी होत आहे. त्यामुळे आगामी काळात प्रशासनाला पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.
पाणी पातळी घटल्याने बामणोली, तापोळा भागातील मुख्य दळणवळणाचे साधन असलेल्या बोटी चालवणे अवघड बनत आहे. पात्र उघडे पडू लागल्याने उन्हातान्हात पात्रातून लोकांना पायपीट करावी लागत आहे. विशेषतः सोळशी व कोयना नदीच्या खोऱ्यातील तापोळ्याच्या वरील भागातील पाणी वेगाने कमी होवून या भागातील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर या भागातील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठीही नदीपात्रातील पायी चालण्याचे अंतर वाढत आहे. त्यामुळे पर्यटक संख्या ही कमी होवू लागली आहे.
त्याचबरोबर बोटिंग साठी तापोळा, बामनोली या ठिकाणी येणारे पर्यटक पाणी कमी असल्याने बोटिंगचा मनमुराद आनंद घेता येत नसल्याने या व्यवसायावर परिणाम होणार आहे. अजून ही तीव्र उन्हाळ्याचे दोन महिने बाकी असून पाणी पातळी अशीच घटत राहिल्यास वरील अडचणीत वाढ होणार आहे. त्यामुळे कोयनेतील सिंचन, वीजनिर्मितीसह इतर कारणांसाठीचा पाणी वापर जपून करण्याची गरज आहे.
पुण्यात ‘पाणीबाणी’! टँकरच्या 4 लाख फेऱ्या: यंदा 4 हजारांनी वाढ, पुण्यात पाण्याची मागणी वाढली
पाणी पातळी घटल्याने सद्या सत्तर टक्के बोटी चालू असून असेच पाणी कमी झाल्यास पुढील काही दिवसांत पन्नास टक्के बोटी बंद होतील. वासोटा पर्यटन ही अडचणीत येणार आहे. उन्हाळ्यात लोकांच्या अडचणीत वाढ होणार असून पाणी सोडताना समस्यांचा विचार व्हावा.
– धनाजी संकपाळ, अध्यक्ष भैरवनाथ बोट क्लब बामणोली.
पुण्यात ‘पाणीबाणी’! टँकरच्या 4 लाख फेऱ्या
एकीकडे समान पाणी पुरवठा (चाेवीस तास) याेजनेचे काम सुरु असले तरी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा त्याच प्रमाणात वाढत आहे. यावर्षी टॅंकरच्या सुमारे चार लाख ४ हजार इतक्या फेऱ्या झाल्या अाहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यात चार हजारांनी वाढ झाली आहे. सध्या वाढत्या तापमानामुळे शहरात पाण्याची मागणीत वाढ हाेत आहे. गेल्या दोन महिन्यांत टॅंकरच्या फेऱ्या वाढत आहे. जानेवारी महिन्यात ३९ हजार ६९२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. त्याचवेळी फेब्रुवारी महिन्यात ३८ हजार ५२२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.