Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कृष्णा आंधळे जिवंत नाहीये, त्याची हत्या करण्यात आली’; ‘या’ माजी मंत्र्याने केलं विधान

कृष्णा आंधळे हा जीवंत नाही, त्याची हत्या झालेली आहे. महादेव मुंडे यांची पत्नी सध्या उपोषणाला बसली आहे. तिला तरी न्याय द्या. रामकृष्ण बांगरांना न्याय द्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 05, 2025 | 09:35 AM
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी अटकेत; पुरावाही आहे पण न्याय अद्याप प्रलंबित

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी अटकेत; पुरावाही आहे पण न्याय अद्याप प्रलंबित

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. यामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड हा या हत्येमागचा सूत्रधार असल्याचे आरोपपत्र समोर आले आहे. त्यानुसार, आत्तापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, यातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. त्यावरच माजी मंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विधान केले आहे. ‘कृष्णा आंधळे जिवंत नाही, त्याची हत्या झालेली आहे’, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘धनंजय मुंडेंना महाराष्ट्र पेटेल म्हटल्यावर जबरदस्ती राजीनामा द्यायला लावला गेला. नाहीतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नसता. सरकारकडे हे फोटो होते, तरीही धनंजय मुंडेंना लपवण्याचे काम सरकार करत होते, असे ते म्हणाले. नागपूरच्या अधिवेशनात या सगळ्या घटनेचं वर्णन मी केलं होतं. या फोटोतील सगळं वर्णन माझ्या भाषणात होतं. संतोष देशमुखांच्या अंगावर लघुशंका करण्यात आली, हे देखील मी विधानसभेत सांगितलं होतं.

दरम्यान, सरकारला प्रश्न विचारायचा की, 90 दिवसांपासून हे सगळे फोटो तुमच्या ताब्यात होते. माहिती सरकारला होती, मग सरकार इतकं निर्दयी आहे? इतकी सगळी माहिती असतानाही धनंजय मुंडेंना लपवण्याचे काम करत होते, असा आरोपही त्यांनी केला आहे.

कृष्णा आंधळे जीवंत नाही

कृष्णा आंधळे हा जीवंत नाही, त्याची हत्या झालेली आहे. महादेव मुंडे यांची पत्नी सध्या उपोषणाला बसली आहे. तिला तरी न्याय द्या. रामकृष्ण बांगरांना न्याय द्या. किशोर फडच्या आई-वडिलांना बोलवून घ्या, त्याला न्याय द्या. बापू आंधळेच्या हत्या प्रकरणात न्याय द्या. मी अशा 15 हत्या प्रकरण संध्याकाळपर्यंत देतो आणि सरकारला आवाहन करतो की, तुम्ही हे गुन्हे दाखल करा आणि न्याय द्या, असेही त्यांनी म्हटले आहे.

…नाहीतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नसता

‘नैतिकता…’ हे फोटो काय दाखवत होते. या फोटोतून उद्रेक होईल. महाराष्ट्र पेटेल म्हटल्यावर धनंजय मुंडेंना जबरदस्ती राजीनामा द्यायला लावला. नाहीतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नसता’, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Web Title: Krishna andhale is not alive he was murdered says jitendra awhad nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 09:34 AM

Topics:  

  • Jitendra Awhad
  • Krushna Andhale
  • Santosh Deshmukh Case
  • Walmik Karad

संबंधित बातम्या

Thane Election :  निवडणूक यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला
1

Thane Election : निवडणूक यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.