Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Krishna River: कृष्णा नदीच्या दूषित पाण्याची गंभीर दखल; प्रशासनाचे पथक कवठेत दाखल, नमुने तपासणीसाठी पाठविले

Krishna River pollution: कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग बदलून ते दूषित झाल्याच्या प्रकारामुळे नदीकाठच्या गावांमध्ये चिंता निर्माण झाली असून प्रशासनाने तातडीने तपास सुरू केला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने घटनास्थळी भेट देऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून आरोग्य विभागासह संबंधित यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 17, 2026 | 08:28 PM
Krishna River: कृष्णा नदीच्या दूषित पाण्याची गंभीर दखल; प्रशासनाचे पथक कवठेत दाखल, नमुने तपासणीसाठी पाठविले
Follow Us
Follow Us:
  • कृष्णा नदीच्या दूषित पाण्याची गंभीर दखल
  • प्रशासनाचे पथक कवठेत दाखल
  • नमुने तपासणीसाठी पाठविले
कराड: – कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग बदलून पाणी दूषित झाल्याच्या प्रकारामुळे नदीकाठच्या गावांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हालचाली वेगवान केल्या आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत पाहणी केली, तर दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Maharashtra Rain Alert: ये रे ये रे पावसा! हवामानाचा लहरीपणा संपेननाच; ‘या’ जिल्ह्यांना…

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सातारा येथील उपप्रादेशिक अधिकारी अमोल सातपुते यांनी कवठे गावाजवळील कृष्णा नदीपात्राची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्याआधी कराड प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या दालनात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत दूषित पाण्याच्या नमुन्यांच्या अहवालासह नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींवर चर्चा करण्यात आली. बैठकीस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील, आरोग्य विभागाचे अधिकारी व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कृष्णा नदीतील बदललेल्या पाण्याच्या रंगामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजनांनाही सुरुवात केली आहे. मंगळवारी गटविकास अधिकारी प्रताप पाटील आणि तालुका आरोग्य अधिकारी नरेंद्र माळी यांनी नदीकाठच्या परिसराची पाहणी केली होती. त्यानंतर बुधवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकासमवेत पुन्हा एकदा नदीकाठावर भेट देऊन पाण्याचे नमुने संकलित करण्यात आले.

या पाहणीवेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी, आरोग्य सेविका, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा वापर करण्याबाबत तसेच आवश्यक आरोग्यविषयक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.

कृष्णाकाठी अधिकाऱ्यांची धाव

कृष्णा नदीतील पाण्याचा रंग हिरवा झाल्याची बाब समोर आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. आरोग्य विभाग, पंचायत समिती आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सलग दोन दिवस नदीकाठावरील गावांना भेटी देत परिस्थितीचा आढावा घेतला. पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही निश्चित केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai Local Update: मुंबईकरांनो सावधान! मध्य रेल्वेचा विशेष मेगा ब्लॉक; माटुंगा ते कुर्ला दरम्यान लोकल सेवांवर होणार परिणाम

Web Title: Krishna river pollution green water karad inspection water sample testing maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 08:28 PM

Topics:  

  • Government
  • Krishna River
  • water pollution

संबंधित बातम्या

फक्त 15 दिवस… काळा पैसा भारतात परतणार! परदेशात जमा मालमत्तेवर सरकार नियम आणण्याच्या तयारीत
1

फक्त 15 दिवस… काळा पैसा भारतात परतणार! परदेशात जमा मालमत्तेवर सरकार नियम आणण्याच्या तयारीत

रस्ते अपघातांना बसणार ब्रेक! हायवे सुरक्षेसाठी भारताचा मास्टरस्ट्रोक, ‘असा’ होणार AI तंत्रज्ञानाचा वापर
2

रस्ते अपघातांना बसणार ब्रेक! हायवे सुरक्षेसाठी भारताचा मास्टरस्ट्रोक, ‘असा’ होणार AI तंत्रज्ञानाचा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.