
तलावाच्या संवर्धनासाठी कोट्यावधी रुपये खर्च, मात्र देखरेख नाही
वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिकेकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप वाढत आहे. तलाव संवर्धनासाठी शासनाच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतो मात्र देखरेख नसल्याने सर्व ठिकाणी दुरावस्था झाली आहे. वहाळ तलाव, नारपोली तलाव, नसरुल्ला तलाव, भादवाड तलाव, तडाली तलाव हेच अस्तित्वात असलेले तलाव असून इतर सर्व तलाब संपुष्टात आली आहे.
Bhiwandi : भिवंडी तालुक्यातील गुंदवली गावातून निघाली स्व. दि.बा.सन्मान रॅली
अतिक्रमणाचा विळखा
काही विकाणी तर तलाव बुजवून अतिक्रमण झाले असून झोपडपट्टचा, इमारती उभ्या झाल्या आहेत. तर, काही ठिकाणी शासकीय इमारती उभारण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या दुर्लक्षतेमुळे आता फक्त ५ तलावचे उरली आहेत आणि त्याची देखील दुरावस्था सुरू आहे.
चलावांच्या संरक्षणासाठी बांधलेल्या भिंती तुटल्या असून, त्या नादुरुस्त अवस्थेत आहेत. काही ठिकाणी अनधिकृत भराव टाकून तलाव कुजवले जात आहेत. आधी अस्तित्वात असलेल्या अकरा तलावांपैकी पाच ते सहा तलाव अतिक्रमणामुळे नामशेष इगले असून, या जागावर झोपडपट्टचा आणि इमारती उभ्या राहिल्या आहेत. महानगरपालिकेने वेळेत कारवाई केली नाही, तर उरलेले पाच तलावही लवकरच नामशेष होतील.
पाण्याचा तुटवडा आणि दुर्मीळ होत चाललेले नैसर्गिक जलसेत
भिवंडी शहराला दररोज १६२ एमएलडी पाण्याची गरज असताना, केवळ १२० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये शहरातील एकमेव बहाळ तलावातून ५ एमएलडी, मुंबई महानगरपालिकेकडून ४२ एमएलडी, तर स्टेम कंपनीकडून ७३ एमएलडी पाणीपुरवठा होतो. शहरातील तलाव टिकून राहिले असते, तर पाणीटंचाईची समस्या उद्भवली नसती. मात्र, तलावांची योग्य देखभाल न झाल्याने आणि काही तलाव नष्ट झाल्याने शहरातील नैसर्गिक जलस्रोत कमी झाले आहेत.
गर्दुल्ले, दारूपार्थ्यांचा अड्डा
बडाळ तलाव शेजारी तब्बल १२.५ कोटी खर्च करून २००५ मध्ये वहाळ उद्यान नागरिकांसाठी तयार करण्यात आले, तलावात बोटिंग सुरु करण्यात आली. सुस्थित असलेलं तलाव व उद्यान आज ते गर्दुल्ले आणि गैरकृत्य करणा-यांचा अड्डा बनले आहे. येथे दारू पाटी, पत्ते खेळणे, प्रेमी युगीळांचे अश्लील चाळे यांसारखे प्रकार होत आहे. तसेच अस्वच्छता यासारखे प्रकार सर्रास घडत आहेत. नागरिकांनी आणि सामाजिक संस्थांनी या समस्येकडे लक्ष वेधले असले, तरी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे परिस्थिती जैसे थे आहे.
महानगरपालिकेने त्वरीत पावले उचलावीत
तलावांचे संवर्धन आणि उद्यानांचे संरक्षण करण्यासाठी महानगरपालिकेने त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात हे सार्वजनिक ठिकाण पूर्णपणे नष्ट होण्याची भीती आहे. तसेच, या ठिकाणांसाठी पुरेसे मनुष्यबळ तैनात करावे, तलावांची नियमित स्वच्छता करावी आणि अनधिकृत अतिक्रमणावर कठोर कारवाई करावी, नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे.