भिवंडी शहरातील वऱ्हाळा तलाव आता कचरा आंदोलनामुळे चर्चेत आहे. तलावातून काढलेला ५ टनहून अधिक कचरा नागरिकांनी थेट मनपा मुख्यालयासमोर आणून ठेवला आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “आमचा तलाव, आमची जबाबदारी” या मोहिमेस तरुण, महिला आणि लहान मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वर्षानुवर्षे तलावात साचलेल्या कचऱ्याकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे मत आहे व तातडीने स्वच्छतेची कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.