Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट; अकाउंट लगेच चेक करा, सप्टेंबरचा हफ्ता झाला जमा

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर योजनेचा हप्ता कधी जमा होणार, याकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागले होते. अखेर सरकारकडून सप्टेंबर महिन्याची रक्कम वितरित करण्यात आली. या योजनेची घोषणा करताना पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 01, 2026 | 09:39 AM
लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट; अकाउंट लगेच चेक करा, सप्टेंबरचा हफ्ता झाला जमा

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट; अकाउंट लगेच चेक करा, सप्टेंबरचा हफ्ता झाला जमा

Follow Us
Follow Us:
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर 
  •  

    सप्टेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा 

  •  

    या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत

मुंबई : राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फायद्याची ठरताना दिसत आहे. या योजनेला चांगला प्रतिसादही मिळत आहे. या योजनेंतर्गत दरमहा महिलांना 1500 रुपये राज्य सरकारकडून दिले जात आहेत. आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाल्याने लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वी दिलासा मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने ही योजना सुरु केली आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर योजनेचा हप्ता कधी जमा होणार, याकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागले होते. अखेर सरकारकडून सप्टेंबर महिन्याची रक्कम वितरित करण्यात आली. या योजनेची घोषणा करताना पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पुढे ही रक्कम २१०० रुपये करण्याचेही सरकारने सांगितले होते. मात्र, सध्या महिलांना १५०० रुपयेच मिळत आहेत. या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय फायदा झाल्याचे मानले जाते. मात्र, योजनेच्या खर्चामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण वाढत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.

योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू

दरम्यान, योजना बंद होणार असल्याच्या चर्चेनंतर सरकारने योजना सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. दुसरीकडे, योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून, अपात्र महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. तसेच आवश्यक केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महिलांना लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पात्र महिलांनी आपली माहिती आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण असल्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.

FAQ (Frequently Asked Questions)

१. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्या राज्यात राबवली जाते?

ही योजना महाराष्ट्र राज्यात राबवली जाते.

२. या योजनेअंतर्गत महिलांना किती आर्थिक मदत मिळते?

पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये दिले जातात.

३. कोणत्या महिन्याचा हप्ता जमा झाला आहे?

सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे.

Web Title: Ladki bahin yojana september installment credited nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 09:39 AM

Topics:  

  • Government Scheme
  • Ladki Bahin Yojana
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लवकरच धावणार; किती असेल तिकीट?
1

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लवकरच धावणार; किती असेल तिकीट?

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट ! दिवाळीपूर्वीच योजनेचे मिळणार 3000 रुपये?
2

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट ! दिवाळीपूर्वीच योजनेचे मिळणार 3000 रुपये?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.