Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लवकरच धावणार; किती असेल तिकीट?

Pune Metro: पुणेकर आणि आयटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे उद्घाटन ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ४ नोव्हेंबरपासून सकाळी ६ वाजल्यापासून सामान्य प्रवाशांसाठी मेट्रो सेवा सुरू होईल.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 01, 2026 | 11:10 AM
Pune Metro: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Pune Metro: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ४ नोव्हेंबरपासून सुरू.
  • पहिल्या टप्प्यात १७ स्टेशन प्रवाशांसाठी खुली.
  • हिंजवडी ते शिवाजीनगर प्रवासासाठी ६२ रुपये तिकीट.

पुण्यातील लाखो आयटी कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासूनची वाट पाहणं आता संपलं आहे. शहरातील सगळ्यात जास्त चर्चेत असलेला हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग अखेर सुरु होतीये.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचं उद्घाटन 3 नोव्हेंबरला सकाळी होणार आहे. आणि उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवार, 4 नोव्हेंबरपासून सकाळी 6 वाजल्यापासून सामान्य प्रवाशांसाठी ही मेट्रो सुरु होणार आहे. जिल्हा न्यायालयापासून ते हिंजवडी फेज 3 म्हणजेच मेगापोलिस सर्कलपर्यंत जायला आता फक्त 62 रुपये लागणार आहेत. Pune Metro:

किती मिनिटाला मिळणार मेट्रो?

PMRDA चे आयुक्त अभिजीत चौधरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. सकाळी ऑफिसच्या गर्दीच्या वेळेत म्हणजे सकाळी 7.30 ते 9.30 आणि संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत दर 6 मिनिटाला मेट्रो मिळणार आहे. बाकीच्या वेळेत गर्दी कमी असते, तेव्हा दर 12 मिनिटाला मेट्रो असेल.

या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार बालेवाडीला उपस्थित राहणार आहेत. पहिल्या टप्प्यात या मार्गावरील 17 स्टेशन सुरु होणार आहेत. उरलेली 6 स्टेशन जानेवारी 2027 पर्यंत हळूहळू सुरु होतील, असं चौधरी यांनी सांगितलं.

हिंजवडी ते शिवाजीनगर ‘मेट्रो लाईन 3’ला मिळाला अखेर मुहूर्त? 3 नोव्हेंबरला मेट्रो धावणार

पुणेरी मेट्रो म्हणून ओळख

या नवीन मार्गाला पिंक लाईन किंवा पुणेरी मेट्रो म्हणून ओळखलं जाणार आहे. या मार्गासाठी एकूण 22 ट्रेन तयार आहेत. सकाळी 6 वाजता पहिली मेट्रो निघेल आणि रात्री 11.40 वाजता जिल्हा न्यायालयातून हिंजवडीकडे जाणारी शेवटची मेट्रो असेल. Pune Metro:

हा प्रकल्प केंद्र सरकारच्या 2017 च्या मेट्रो धोरणात मंजूर झालेला पहिला प्रकल्प आहे. हा PPP म्हणजे पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर बनला आहे. त्यामुळे इतर मेट्रोच्या तुलनेत याचं तिकीट थोडं जास्त आहे, हे स्वतः आयुक्तांनी मान्य केलं आहे.

व्हॉट्सअँपवर पण मिळणार

तिकीट काढणं आता एकदम सोपं केलं आहे. स्टेशनवरच्या खिडकीवर तर तिकीट मिळेलच, पण त्यासोबतच QR कोडने पण तिकीट काढता येईल. सगळ्यात भारी म्हणजे आता व्हॉट्सअँपवर पण मेट्रोचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे रांगेत उभं राहण्याची गरज नाही.

महामेट्रोच्या ॲपमध्ये पण या नवीन मार्गाची सुविधा जोडली जाणार आहे. पुढच्या काही दिवसात पुण्यातील तिन्ही मेट्रो मार्गांसाठी एकच तिकीट वापरण्याची सोय पण सुरु होणार आहे, जेणेकरून प्रवाशांना वेगवेगळं तिकीट काढावं लागणार नाही.

प्रवासाचा वेळ अर्ध्याहून कमी होणार

हिंजवडी ते शिवाजीनगर हा पूर्ण प्रवास करायला फक्त 45 मिनिटे लागतील. सध्या हिंजवडीला जायला आयटी कर्मचाऱ्यांना दीड ते दोन तास लागतात, ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं. या मेट्रोमुळे त्यांचा रोजचा एक तास तरी वाचणार आहे.

9 वर्षांनी पूर्ण झाला प्रकल्प

विशेष म्हणजे या मेट्रोचं भूमिपूजन पण पंतप्रधान मोदींच्याच हस्ते नोव्हेंबर 2018 मध्ये झालं होतं. 5 वर्षात काम पूर्ण होईल असं वाटत होतं. पण कोरोनामुळे काम थांबलं आणि नंतर मार्च 2025 पर्यंत डेडलाईन देण्यात आली. पण ती पण चुकली. जवळपास 6 ते 8 वेळा तारखा पुढे ढकलल्या गेल्या.

Hinjawadi-Shivajinagar Metro: पंतप्रधानांचा दौरा लांबल्याने हिंजवडी मेट्रोला पुन्हा नव्या मुहूर्ताची प्रतीक्षा

अखेर 9 वर्षांनंतर ही मेट्रो सुरु होतेय.साधारणपणे इतर मेट्रोचं उद्घाटन झाल्यावर 2-3 तासातच प्रवाशांसाठी सुरु होते. पण इथे वेगळा पायंडा पाडला आहे. 3 तारखेला उद्घाटन आणि 4 तारखेपासून सेवा सुरु.

तिकीट दर किती?

  • 0 ते 2 किमी – 12 रुपये
  • 2 ते 4 किमी – 25 रुपये
  • 4 ते 8 किमी – 37 रुपये
  • 8 ते 12 किमी – 45 रुपये
  • 12 ते 18 किमी – 49 रुपये
  • 18 किमी पेक्षा जास्त – 62 रुपये
💡

Frequently Asked Questions

  • Que: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कधी सुरू होणार आहे?

    Ans: मेट्रो ४ नोव्हेंबर २०२६ पासून सामान्य प्रवाशांसाठी सुरू होणार आहे.

  • Que: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे तिकीट किती आहे?

    Ans: १८ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी कमाल तिकीट दर ६२ रुपये आहे.

  • Que: पहिल्या टप्प्यात किती मेट्रो स्टेशन सुरू होणार आहेत?

    Ans: पहिल्या टप्प्यात १७ स्टेशन सुरू होणार आहेत. उर्वरित ६ स्टेशन जानेवारी २०२७ पर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे.

Web Title: Pune hinjewadi shivajinagar metro 2026 start date timings ticket fare rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • maharashtra news
  • Marathi News
  • pune metro news
  • pune news update

संबंधित बातम्या

Virat Kohli Struggles: विराट कोहलीसाठी डोकेदुखी ठरला भारताचाच ‘हा’ गोलंदाज! वारंवार केलं क्लीन बोल्ड, ODI आधी धोक्याची घंटा
1

Virat Kohli Struggles: विराट कोहलीसाठी डोकेदुखी ठरला भारताचाच ‘हा’ गोलंदाज! वारंवार केलं क्लीन बोल्ड, ODI आधी धोक्याची घंटा

Mother Son Suicide News: सीसीटीव्ही फुटेजने उघडले गुपित! मातेने चिमुरड्याला १८ व्या मजल्यावर नेऊन संपवले आयुष्य; वाकडमधील थरार!
2

Mother Son Suicide News: सीसीटीव्ही फुटेजने उघडले गुपित! मातेने चिमुरड्याला १८ व्या मजल्यावर नेऊन संपवले आयुष्य; वाकडमधील थरार!

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट; अकाउंट लगेच चेक करा, सप्टेंबरचा हफ्ता झाला जमा
3

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट; अकाउंट लगेच चेक करा, सप्टेंबरचा हफ्ता झाला जमा

COEP Tech 2026: ‘तंत्रज्ञानाचा वापर मानवजातीच्या विनाशासाठी नव्हे, तर….’ अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांचे आवाहन!
4

COEP Tech 2026: ‘तंत्रज्ञानाचा वापर मानवजातीच्या विनाशासाठी नव्हे, तर….’ अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांचे आवाहन!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.