Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लक्ष्मीपुजनामुळे खरेदीला उत्साह! बाजारपेठा झेंडुंच्या फुलांनी फुलल्या, नागरिकांची गर्दी

देशभरामध्ये दिवाळीचा मोठा उत्साह दिसून येत आहे. दिवाळीच्या सामनांने आणि फुलांनी बाजारपेठ सजल्या आहेत. तसेच खरेदीसाठी नागरिकांची मोछी गर्दी झाली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 01, 2024 | 11:16 AM
Shopping enthusiasm in Karad markets due to Lakshmi Pujan

Shopping enthusiasm in Karad markets due to Lakshmi Pujan

Follow Us
Close
Follow Us:

कराड : देशामध्ये दिवाळी सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. दिव्यांची आरास आणि फुलांची सजावय केली जात आहे. दिवाळीला उत्साहात प्रारंभ झाला असून सर्वत्र आनंदाचे व चैतन्याचे वातावरण दिसत आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाचा दिवस सर्वात महत्वाचा समजला जातो. आज लक्ष्मीपूजन असून गुरुवारी सायंकाळपासून सातारामधील बाजारपेठा फुलल्या आहेत. बाजारामध्ये फुलांची मोठी आवाक झाली असून बाजारपेठ केशरी व पिवळ्या रंगाने अक्षरशः न्हावून गेली आहे.  फुलांबरोबरच शहरामध्ये विविध साहित्य खरेदीसाठी गर्दी होती.

लक्ष्मी व कुबेर या दोन्ही देवता धन-संपत्ती देणारे देवता मानले जातात. त्यामुळे घरात लक्ष्मी नांदावी, आर्थिक सुबत्ता यावी, नोकरी, व्यवसायात यश यावे, सुख, शांती लाभावी, यासाठी अमावस्येच्या सायंकाळी लक्ष्मीपूजन हे केले जाते. लक्ष्मीपूजनच्या निमित्ताने शहरातील दत्त चौक, कन्या शाळा व मुख्य बाजारपेठ परिसरात लक्ष्मीचे फोटो, मूर्ती, तयार पूजेचे साहित्य, झेंडूची फुले, केरसुनी, चिरमुरे, बत्ताश्य़ांची पाकिटे, कोहळा,
आंब्यांची डहाळे, ऊस, नारळ, नारळाच्या झावळ्या आदी प्रकारचे साहित्य विक्रेत्यांकडून खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती.

हे देखील वाचा : कर्जाची माहिती न दिल्याने बँक मॅनेजरवर जीवघेणा हल्ला; कराडमध्ये घडला धक्कादायक प्रकार

दिवाळीत लक्ष्मीपूजन हाच मुख्य दिवस असल्याने, यासाठी लागणारी पिवळी, लाल झेंडूची फुलेही मोठ्या प्रमाणात विक्रीस आली आहेत. 80 ते 100 दरम्यान, प्रतिकिलो फुलांचा दर होता. झेंडूची व इतर फुले खरेदी करताना नागरिक दिसत होते. त्याचबरोबर पुजेमध्ये वेगवेगळया प्रकारची पाच फळे लागत असल्याने, ते घेण्यासाठी बाजारमध्ये गर्दी झाली आहे. तसेच घराला लावायची कृत्रिम फुलांची आकर्षक तोरणे, माळा, हार, आंबाच्या पानांची प्लास्टीक तोरणे व विविध साहित्य विक्रीस आले आहे. शोभेच्या कुंड्या, विविध सजावटीच्या शोभेच्या वस्तू आदी सर्व साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याने शहरातील बाजारपेठ अक्षरशः गजबजून गेली आहे.

हे देखील वाचा : करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज बाद; ढसाढसा रडून धनंजय मुडेंना सुनावले खडेबोल

लक्ष्मीपूजनाबरोबरच वही व चोपडी पूजनालाही व्यापार्‍यांमध्ये महत्व आहे. त्यामुळे वह्या खरेदीही मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती.तसेच लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज सलग असल्याने मिठाईच्या दुकानांमध्येही खरेदीसाठी गर्दी होती. खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी
केल्याने शहर गर्दीने फुलून गेले आहे. सर्वत्र नवचैतन्य असून हिंदू संस्कृतीमधील सर्वांत मोठ्या दिवाळी सणाचा उत्साह दिसून येत आहे.

Web Title: Lakshmi pujan brings shopping excitement markets bloom with marigold flowers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2024 | 11:16 AM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2024
  • Satara News

संबंधित बातम्या

Kas Pathar news : कास पठार हंगाम लवकरच होणार सुरु…; आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ होण्यासाठी ग्रामस्थांनी घेतले विविध निर्णय
1

Kas Pathar news : कास पठार हंगाम लवकरच होणार सुरु…; आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ होण्यासाठी ग्रामस्थांनी घेतले विविध निर्णय

कोयना धरणातून नयनरम्य पाण्याचा विसर्ग; साताऱ्यात पावसाचा जोर वाढला
2

कोयना धरणातून नयनरम्य पाण्याचा विसर्ग; साताऱ्यात पावसाचा जोर वाढला

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; आरपीआयच्या आठवले गटाचा इशारा
3

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; आरपीआयच्या आठवले गटाचा इशारा

कबुतरांचा सहवास देतोय खोकला अन् दमा; फुफुसाच्या संसर्गित रोगांना मिळतंय आवताण
4

कबुतरांचा सहवास देतोय खोकला अन् दमा; फुफुसाच्या संसर्गित रोगांना मिळतंय आवताण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.