Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भीमा नदीच्या पाण्यात आढळली भली मोठी मगर; शेतकऱ्यांमध्ये भिती

दौंड तालुक्यातुन गेलेल्या भीमा नदीच्या पाण्यामध्ये दौंडच्या पूर्व भागातील आलेगाव ते देऊळगावराजे या दोन्ही गावाच्या मध्यभागी काही शेतकऱ्यांना भली मोठी मगर पाण्यात दिसून आली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 28, 2024 | 04:54 PM
भीमा नदीच्या पाण्यात आढळली भली मोठी मगर; शेतकऱ्यांमध्ये भिती
Follow Us
Close
Follow Us:

पाटस : दौंड तालुक्यातुन गेलेल्या भीमा नदीच्या पाण्यामध्ये दौंडच्या पूर्व भागातील आलेगाव ते देऊळगावराजे या दोन्ही गावाच्या मध्यभागी काही शेतकऱ्यांना भली मोठी मगर पाण्यात दिसून आली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पुणे जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर असल्याने खडकवासला धरण व इतर धरणाचे पाणी मुळा मुठा नदीला सोडण्यात आले होते. हेच पाणी पुढे भीमा नदीच्या पात्राला जाऊन मिळाल्याने भीमा नदीचे पात्र पाण्याने दुधाडी भरून वाहत होती. भीमा नदीला व त्या लगेचच्या गावांमध्ये पुरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र होते .या वाहत्या पाण्याच्या प्रवाहात अनेक जलचर प्राणी वाहून येत असतात. घोणस, मण्यार असे अनेक विषारी जातीचे सर्प नदी नदीच्या पाण्यात वाहून आल्याने ते नदी लगतच्या गावांमध्ये पाहायला मिळतात.

सध्या धरण क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्याने भीमा नदीचे पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे या नदीच्या पाण्यात एक भली मोठी मगर आलेगाव परिसरातील काही शेतकऱ्यांना दिसून आली. सुरुवातीला त्यांना मगर असल्याचा विश्वास बसला नाही, मात्र त्यांनी पाण्यात दगड मारला आणि मगरीने हालचाल केली, त्यामुळे ती मगरच असल्याचे दिसून आले. या भीमा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात ती वाहून आली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र , या प्रकारामुळे आलेगाव, देऊळगावराजे या परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या संदर्भात जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Large crocodile found in bhima river water fear among farmers nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2024 | 04:54 PM

Topics:  

  • Daund

संबंधित बातम्या

पाटस ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बंदच; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त
1

पाटस ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बंदच; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

Patas Fire Incident : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला भीषण आग; मालवाहतूक करणारा ट्रक जळून खाक
2

Patas Fire Incident : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला भीषण आग; मालवाहतूक करणारा ट्रक जळून खाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.