Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Constituency Politics: उसाच्या पट्ट्यात देशमुख घराण्याची प्रतिष्ठा पणाला; लातुरकरांच्या मनात नेमकं काय?

मराठवाड्याप्रमाणेच लातूर ग्रामीण मतदारसंघातही मराठा आणि ओबीसी आरक्षण असा संघर्ष पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे उमेदवार मराठा आणि भाजप उमेदवार तुलनेत मागासवर्गीय आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 19, 2024 | 11:52 AM
Latur Constituency Politics: उसाच्या पट्ट्यात देशमुख घराण्याची प्रतिष्ठा पणाला; लातुरकरांच्या मनात नेमकं काय?
Follow Us
Close
Follow Us:

लातूर:  लातूर जिल्ह्याचे नाव काढले की डोळ्यांसमोर सर्वात आधी उभे राहते ते उसाचे पीक, उसाच्या पिकासाठी लातूरची विशेष ओळख आहे. पण मराठवाड्यातील महत्त्वाचा भाग असलेला लातूर जिल्हा राजकाराणासाठीही तितकाच प्रसिद्ध आणि महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख हेदेखील लातूरचेच. मोठ्या प्रमाणात होणारे उसाचे पिकाचे उत्पन्न पाहता विलासराव देशमुखांनी लातूरमध्ये सहकारी कारखाने सुरू केले. पण त्याचवेळी त्यांनी लातूरमध्ये राजकीय ताकदही वाढवली.

विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा त्यांचा थोरला मुलगा अमित देशमुख यांनी सांभाळला. अमित देशमुख यांच्या पावलावर पाऊल टाकत धाकटा मुलगा धीरज देशमुख यांनीदेखील राजकारणात प्रवेश केला. दोघेही आमदार झाले. यावेळीही हे दोघेजण निवडणुकीच्या रिंगणात उभे असून दोघांच्याही मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे.

West Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्रात कोण मारणार बाजी; कोणाची ताकद जास्त, कोण कमजोर?

मराठवाड्याचा महत्त्वाचा भाग असल्याने मराठा आरक्षणाच्या राजकारणाचा प्रभाव इथेही दिसून येत आहे. विशेष म्हणजे यावेळी भाजपच्या महायुतीने काँग्रेसच्या बलाढ्य जागांवर आपले ताकदीचे उमेदवार उभे करून काँग्रेस उमेदवारांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय माजी गृहमंत्री शिवराज पाटील हेही याच जिल्ह्यातून येतात. माजी मुख्यमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या कुटुंबाचाही इथल्या राजकारणात मोठा प्रभाव आहे. यावेळीही या बड्या घराण्यातील उमेदवार वेगवेगळ्या जागांवर रिंगणात आहेत. लातूर जिल्ह्यात एकूण सहा जागा असून गेल्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या होत्या.

लातूर शहराच्या जागेवर सर्वात चुरशीची लढत

लातूरमधून विलासराव देशमुख विजयी झाले होते. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र अमित देशमुख यांना या जागेचा वारसा मिळाला. वडिलांचे नाव आणि स्वच्छ प्रतिमेमुळे अमित देशमुख तीनदा विजयी झाले. यावेळी ते चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहे. पण यावेळी समीकरणे काहीशी गुंतागुंतीची झालेली दिसतात. विशेष म्हणजे, विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि बॉलिवूड अभिनेते रितेश देशमुखही आपल्या भावाला विजयी करण्यासाठी प्रचारात व्यस्त आहे. पण यावेळी चुरशीच्या लढतीचे कारण म्हणजे भाजपच्या उमेदवार अर्चना पाटील चाकूरकर.  अर्चना पाटील चाकूरकर या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या त्या सूनबाई आहेत. माजी गृहमंत्री पाटील यांनी अद्याप खुल्या व्यासपीठावर आपल्या सुनेचा प्रचार केलेला नाही. पण  त्यांना अंतर्गत मदत केल्याची जोरदार चर्चा असल्याचे स्थानिक जाणकारांचे म्हणणे आहे.

लग्नाच्या 30 दिवस आधीपासूनच दररोज 1 तास रडते नवरी! या ठिकाणी आहे अजब परंपरा

एकीकडे तीन वेळा आमदार होऊनही फारशी विकासकामे होत नसल्याने अमित देशमुख यांच्याविरोधात स्थानिक जनतेत नाराजी आहे. पण अर्चना चाकुरकर या शहरातील सामाजिक कार्याशी जोडल्या गेल्या आहेत. आमदार झाल्यानंतर अमित देशमुख मुंबईत राहणार आहेत. पण अर्चना चाकूरकर मात्र लातूरच्या जनतेसोबत राहणार असल्याची चर्चा आहे.

उसाच्या रसात दडलाय विजयाचा गोडवा

मराठवाड्याप्रमाणेच लातूर ग्रामीण मतदारसंघातही मराठा आणि ओबीसी आरक्षण असा संघर्ष पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे उमेदवार मराठा आणि भाजप उमेदवार तुलनेत मागासवर्गीय आहे. ऊस उत्पादक शेतकरीही येथील महत्त्वाचे मतदार आहेत. या जागेवर विलासराव देशमुख यांच्या नावावर साखर कारखाना असून त्यांचे आमदार पुत्र धीरज देशमुख दुसऱ्यांदा रिंगणात आहेत. ऊस कारखानदारांशी संबंधित शेतकरी आणि ऊस उत्पादक संघटनांवर देशमुख यांची पकड ही त्यांची ताकद मानली जाते.

साखर कारखान्यासमोर ऑटोमध्ये बसलेल्या तिघांना निवडणुकीबाबत विचारले असता ते म्हणाले की, ही मोठी माणसे आहेत, सर्वसामान्यांना क्वचितच भेटतात. एकाने माधवचे नाव घेतले आणि सांगितले की देशमुख घराणे चांगले आहे, पण त्यांना त्यांच्यामध्ये राहणारा नेता हवा आहे.

अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर होणार? ट्रम्प प्रशासनाची स्थलांतरितांविरोधातील मोठी योजना

या जागेवर भाजपचे रमेश कराड आणि धीरज देशमुख यांच्यात लढत होणार आहे. कराड हे जवळपास 20 वर्षांपासून स्थानिक राजकारणात सक्रिय आहेत. भाजपचे संघटनही येथे जोरदार आहे. गेल्या निवडणुकीत युतीमध्ये ही जागा भाजपकडून शिवसेनेकडे गेली होती. तेव्हा संतप्त भाजप सदस्यांनी नोटा दाबला होता. मतमोजणीत NOTA साठी 29 हजार मते पडली. येथील जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपने चांगली कामगिरी केली होती. ऊस उत्पादक शेतकरी आणि मराठा मते धीरज यांच्या समर्थनार्थ दिसत आहेत, तर रमेश यांना मागासवर्गीयांचा पाठिंबा दिसत आहे.

 

Web Title: Latur constituency politics amit deshmukh dhiraj deshmukh congress ramesh karad bjp fight in latur nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 11:52 AM

Topics:  

  • Amit Deshmukh
  • BJP

संबंधित बातम्या

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण
1

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा
2

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
3

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

तिकीट न मिळालेल्यांची भाजप नेते करणार मनधरणी; ‘या’ नेत्यांकडे विशेष जबाबदारी
4

तिकीट न मिळालेल्यांची भाजप नेते करणार मनधरणी; ‘या’ नेत्यांकडे विशेष जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.