फोटो सौजन्य: सोशल मीडिया
वॉश्गिंटन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प सध्या चर्चेत आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात ते महत्त्वाच्या गोष्टींवर काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरिंतांविरोधात कठोर पाऊल उचलेल आहे. ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करून लष्करी शक्ती वापरण्याची योजना जाहीर केली आहे. या धोराणांमुळे लाखो परदेशी लोकांना देश सोडावा लागू शकतो.
अमेरिकेत अवैध स्थलांतरितांची समस्या ही अनेक वर्षांपासून वादग्रस्त राहिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पूर्वीच्या कार्यकाळातही स्थलांतरितांविरोधात कठोर धोरणे राबवली होती. यामुळे जागतिक पातळीवर वाद निर्माण झाले होते. 2024 मध्ये ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक प्रचारादरम्यान अवैध स्थलांतरितांविरोधातील कठोर भूमिका मांडली. यूएस डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीच्या अहवालानुसार, अमेरिकेत सध्या चार कोटी स्थलांतरित राहत आहेत, यापैकी सुमारे 25% स्थलांतरित बेकायदेशीर आहेत. यामध्ये अनेक जण देशात कामाच्या शोधात आले आहेत, तर काही जण निर्वासित म्हणून आले आहेत.
ट्रम्प यांचे स्थलांतरितांविरोधात मोठे पाऊल
ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टला प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, त्यांचे प्रशासन देशातील अवैध स्थलांतरितांविरोधात कठोर पावले उचलणार आहे. त्यांनी म्हटले की, देशात राहणाऱ्या 4,25,000 गुन्हेगारी नोंदी असलेल्या स्थलांतरितांना प्राथमिकता देऊन हद्दपार करण्यात येईल.
HUGE: President @RealDonaldTrump confirms he is prepared to declare a national emergency and use the military assets to reverse the Biden invasion. pic.twitter.com/XnqW121GnQ
— Tom Fitton (@TomFitton) November 18, 2024
टॉम होमन यांचा ट्रम्पला पाठिंबा
सीमा सुरक्षा प्रमुख टॉम होमन यांनी या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. टॉम होमन यांनी डेमोक्रॅटिक राज्यांनी हद्दपार मोहिमेत सहकार्य न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी हेही सांगितले की, बेकायदेशीर स्थलांतरितांना रोखण्याऐवजी सीमा सुरक्षा एजंट अनेकदा त्यांना अमेरिकेत आणण्यासाठी “प्रवास एजंट” म्हणून काम करतात, यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
स्थलांतरितांविरोधी धोरणामुळे परिणाम होणार
ट्रम्प यांच्या या निर्णयाचा देशातील स्थलांतरितांसाठी मोठा परिणाम होणार आहे. स्थलांतरितांना कामाची संधी आणि आधार मिळणे कठीण होईल. याशिवाय, त्यांना हद्दपार करण्याच्या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि सामाजिक आव्हाने उभ्या राहण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या या धोरणांमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह निर्माण झाला असला तरी, डेमोक्रॅटिक पक्ष आणि मानवाधिकार संघटनांनी या निर्णयाचा तीव्र विरोध केला आहे. अमेरिकेत पुन्हा राष्ट्रीय आणीबाणी लागू होणार का आणि ट्रम्प यांचे कठोर धोरण काय परिणाम घडवतील, याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.