ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसने नेहमीच ठोस आणि लोकांच्या गरजांवर आधारित विकास मॉडेल राबवलं आहे. याउलट, भाजपाकडून दिखाऊ उपक्रमांमुळे दिशाभूल केली जात असल्याचा घणाघात काँग्रेस नेते धीरज देशमुख यांनी केला.
मराठवाड्याप्रमाणेच लातूर ग्रामीण मतदारसंघातही मराठा आणि ओबीसी आरक्षण असा संघर्ष पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे उमेदवार मराठा आणि भाजप उमेदवार तुलनेत मागासवर्गीय आहे.
सर्वसामान्य जनतेचे हित जोपासणे हे सरकारचे काम असते, असे सांगून सरकारने गुजरातचा विकास केला. उद्योगपतींना श्रीमंत केले. तसेच नऊ कोटी मतदार असलेल्या महाराष्ट्रावर नऊ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे.
सरकारकडून सोयाबीन, उडीद, मूगासह सर्वच पिकांना योग्य मोबदला दिला जात नाही. तर दुसरीकडे हेच महायुतीचे सरकार मात्र जाहिरात करण्यात मग्न आहे. आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी सरकारवर घणाघाती टीका केली