Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लातूर मनपाच्या शाळेत ‘बोगस’ विद्यार्थी; अभिजीत दीपके यांचा गंभीर आरोप; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी लातूर शहरातील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक २६, लेबर कॉलनी येथील शाळेला भेट देऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान गंभीर अनियमितता आढळून आल्याचा आरोप कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांनी केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 21, 2026 | 01:44 PM
लातूर मनपाच्या शाळेत 'बोगस' विद्यार्थी; अभिजीत दीपके यांचा गंभीर आरोप; सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी

लातूर मनपाच्या शाळेत 'बोगस' विद्यार्थी; अभिजीत दीपके यांचा गंभीर आरोप; सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी

Follow Us
Follow Us:

लातूर : कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी लातूर शहरातील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक २६, लेबर कॉलनी येथील शाळेला भेट देऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान दिपके यांनी शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत शाळेतील भौतिक सुविधा, शैक्षणिक सुविधा, शौचालये, स्वयंपाकगृह, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा आदींची माहिती घेतली. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना पाहणीपूर्वी प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आल्याचे, तर काही शाळांमध्ये इतर शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश घालून बसविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणाशी संबंधित नसलेल्या व्यक्तींचा वावर असल्याचेही निदर्शनास आल्याचा दावा त्यांनी केला. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. वास्तविक परिस्थिती समोर आल्याचे दिपके यांनी सांगितले. पाहणी केलेल्या काही शाळांमध्ये शैक्षणिक सुविधांचा अभाव, शिक्षकांची रिक्त पदे, अपुरी व्यवस्था असल्याचे त्यांनी नमूद केले.

या दौऱ्यात कॉक्रोच जनता पार्टीचे अजिंक्य शिंदे, विक्रांत शंके, प्रतिक पीतांबरे, विवेक पाठक, गणेश कल्लुरकर, धनराज पाटील, प्रज्वल कयापाक, ईस्माईल सय्यद, डी उमाकांत, राज लष्करे, हर्षद लवटे, आनंद घोडके, अयान सय्यद, कुणाल गिलचे, विश्वंभर सुर्यवंशी, पदाधिकारी व कार्यकर्ते, उपस्थित होते.

शाळांच्या दुरवस्थेवरुन अभिजीत दीपके आक्रमक

पाहणी केलेल्या काही शाळांमध्ये शैक्षणिक सुविधांचा अभाव, संगणक सुविधांची कमतरता, शिक्षकांची रिक्त पदे, विद्यार्थ्यांच्या बसण्याची अपुरी व्यवस्था आणि शौचालयांच्या दुरवस्थेसह शाळांच्या इमारतीचीही अवस्था चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था गंभीर असून, या शाळांमध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी कार्यरत शिक्षकांचे पाल्य मात्र या शाळांमध्ये शिक्षण घेत नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. काही ये-जा करतात. त्यामुळे सकाळी शाळेत शिक्षक ६० ते ७० किलोमीटर अंतरावरून शाळेत पोहोचण्यास विलंब होणे आणि परतीच्या प्रवासासाठी लवकर निघणे यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळेवर परिणाम होत असल्याचा आरोप दिपके यांनी केला. “लातूर जिल्ह्यातील शाळांची पाहणी पूर्ण झाल्यानंतर राज्यातील सर्व शालेय इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा : प्रेयसीच्या अंगावर कार घालून प्रियकराने केला खून; सीसीटीव्हीमुळे उघड झाला आरोपीचा बनाव

लातूर मनपाच्या शाळेत ‘बोगस’ विद्यार्थी; दीपके यांनी केला आरोप

लातूर महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक २६, लेबर कॉलनी येथील पाहणीदरम्यान गंभीर अनियमितता आढळून आल्याचा आरोप कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांनी केला. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी केवळ दोन शिक्षकांची नियुक्ती असून, चार वर्गातील विद्यार्थ्यांसाठी केवळ दोन वर्गखोल्यांची सुविधा असल्याचे त्यांनी सांगितले. या शाळेतील मूलभूत सुविधांची स्थिती पाहता, आपल्या पाहणीची माहिती मिळाल्यानंतरच शाळेची स्वच्छता करण्यात आल्याचा आरोपही दिपके यांनी केला. विशेष म्हणजे, शाळेत नैसर्गिक विद्यार्थी संख्या किती आहे, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “महानगरपालिकेने शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी यापूर्वीच अशीच ताकद आणि इच्छाशक्ती वापरली असती, तर पाहणीच्या वेळी बाहेरून विद्यार्थी आणून बसविण्याची वेळ आली नसती. शाळेतील नैसर्गिक विद्यार्थी संख्या त्याच वेळी दिसून आली असती,” असा आरोप दिपके यांनी केला. पाहणीदरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शाळेतील प्रत्यक्ष परिस्थिती समोर आली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शाळांमध्ये केवळ कागदोपत्री सुविधा दाखविण्याऐवजी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, पुरेशा वर्गखोल्या, आवश्यक शिक्षक, संगणक सुविधा, स्वच्छतागृहे आणि सुरक्षित इमारत उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लातूर महानगरपालिकेने या आरोपांची गंभीर दखल घेऊन शाळेतील विद्यार्थी संख्या, शिक्षकसंख्या, वर्गखोल्या आणि उपलब्ध सुविधांची वस्तुनिष्ठ माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणीही त्यांनी केली

Web Title: Abhijit dipke of the cockroach janata party inspected schools in latur city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • Latur news
  • Maharashtra school

संबंधित बातम्या

Matheran Health Camp: माथेरानमधील विद्यार्थ्यांसाठी धावले डॉक्टर! नगरपरिषद शाळेत यशस्वी आरोग्य शिबिर पार पडले
1

Matheran Health Camp: माथेरानमधील विद्यार्थ्यांसाठी धावले डॉक्टर! नगरपरिषद शाळेत यशस्वी आरोग्य शिबिर पार पडले

CJP Leaders Claim Arrest Plan: अभिजीत, आशुतोष, सौरवसह CJP नेत्यांना अटक करण्याचे प्लॅनिंग; बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
2

CJP Leaders Claim Arrest Plan: अभिजीत, आशुतोष, सौरवसह CJP नेत्यांना अटक करण्याचे प्लॅनिंग; बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

Kalyan News: अभिजीत दीपकेंच्या दादरमधील आंदोलनाचा भाजपकडून निषेध; कल्याणमध्ये आंदोलन
3

Kalyan News: अभिजीत दीपकेंच्या दादरमधील आंदोलनाचा भाजपकडून निषेध; कल्याणमध्ये आंदोलन

CJP आंदोलनात लहान मुलांचा ‘मानवी ढाल’ म्हणून वापर? NHRC कडून मुंबई पोलीस, MeitY अन् X Corp ला नोटीस
4

CJP आंदोलनात लहान मुलांचा ‘मानवी ढाल’ म्हणून वापर? NHRC कडून मुंबई पोलीस, MeitY अन् X Corp ला नोटीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.