Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Zilla Parishad: लातूरमध्ये महायुतीत हायव्होल्टेज ड्रामा! जि.प. बांधकाम सभापती पदावरून रस्सीखेच सुरू

लातूर जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती पदावरून महायुतीत हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाल्याचे दिसत आहे. तसेच, ४ विषय समिती सभापतींची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा उपजिल्हाधिकारी रोहिणी नन्हे-विरोळे यांनी केली.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 31, 2026 | 11:32 AM
Latur Zilla Parishad: लातूरमध्ये महायुतीत हायव्होल्टेज ड्रामा! जि.प. बांधकाम सभापती पदावरून रस्सीखेच सुरू

Latur Zilla Parishad: लातूरमध्ये महायुतीत हायव्होल्टेज ड्रामा! जि.प. बांधकाम सभापती पदावरून रस्सीखेच सुरू

Follow Us
Follow Us:
  • लातूर जिल्हा परिषदेत हाय व्होल्टेज ड्रामा
  • जि.प. बांधकाम सभापतीपदसाठी रस्सीखेच
  • जिल्हा परिषदेच्या ४ विषय समिती सभापतीची बिनविरोध निवड
 

Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपल्या निलंगा तालुक्यात खेचून नेल्यामुळे आता जि.प. बांधकाम सभापतीपद औसा मतदारसंघाला मिळावे या साठी औशाचे आ. अभिन्यू पवार हे अत्यंत आग्रही असतानांच बांधकाम सभापती पदावर राष्ट्रवादीचे नेते सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दावा सांगितल्याने आता जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती पदावरून हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाल्याचे दिसते. आज लातूर जिल्हा परिषदेतील ४ विषय समिती सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्याची घोषणा पिठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रोहिणी नन्हे-विरोळे यांनी केली. चारपैकी दोन सभापती पद हे भाजपाला तर दोन सभापती पद हे राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले आहे.

Latur Crime News: धक्कादायक! लग्नाचे आमिष, प्रेमाचा सापळा… महिलेची २२ लाखोंची फसवणूक

जिल्हा परिषदेमध्ये भाजपा व राष्ट्रवादी युती आहे. मात्र यात बांधकाम सभापती पद कोणाला द्यायचे यावरून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपात रस्सीखेच दिसून येत आहे. जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा युतीस स्पष्ट बहुमत आहे. यापूर्वीच अध्यक्ष भाजपाचा व उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांची निवड झालेली आहे. आज ४ विषय समिती सभापती पदासाठी पिठासीन अधिकारी रोहिणी नन्हे यांच्या उपस्थितीत जि. प. च्या नवनिर्वाचीत सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेनंतर समाजकल्याण
सभापती म्हणून शिरूर ताजबंद, ता. अहमदपूर गटातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तमराव संभाजी माने यांची, खरोळा, ता. रेणापूर गटातून निवडून आलेल्या भाजपाच्या शिवकन्या महेंद्र गोडभरले यांची महिला व बालकल्याण समिती सभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

विषय समिती क्र. १ साठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तोगरी, ता. उदगीर गटातून निवडून आलेले ज्ञानेश्वर हरिभाऊ बिरादार यांची तर विषय समिती सभापती क्र. २ साठी सरवडी, ता. निलंगा (औसा विधानसभा मतदार संघ) येथून भाजपाच्या उमेदवार म्हणून विजयी झालेल्या सो, कविता किशन गोरे यांनी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. या चारही पदासाठी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. निवडणूक प्रक्रिये दरम्यान काँग्रेसच्या चारही उमेदवारांनी आपआपले उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने जिल्हा परिषदेच्या चारही विषय समिती सभापतीच्या निवडी बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली.

Dharashiv Health Department: धाराशिव आरोग्य विभागात गैरप्रकार? कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शोषणाचा आ. हेमंत ओगलेंनी केला आरोप

घोषणा होताच दोन्ही पक्षाच्या या नूतन सभापतीच्या समर्थकांनी तसेच भाजपा व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. बांधकाम सभापती पदावरून अडले जिल्हा परिषदेमध्ये महिला व बालकल्याण समिती आणि समाजकल्याण समिती सभापती साठी निवडी झाल्या. मात्र, उर्वरीत दोन समिती समिती क्र. १ व समिती क्र. २ असे संबोधून निवड करण्यात आली.

बिनविरोध झाल्या असल्या तरी या दोन समितीच्या सभापती पदाच्या खाते वाटपासाठी तीन ते चार दिवस लागतील व त्यानंतरच बांधकाम सभापती पद कोणाकडे हे निश्चीत होईल. जिल्हा परिषदेत भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती असली तरी जि. प. च्या बांधकाम समिती पदावरून या दोन्ही पक्षात ताणाताणी होत असल्याचे जाणवत आहे.

Web Title: High voltage drama in the mahayuti in latur the tug of war over the post of zilla parishad construction chairman has begun

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • Latur
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

Latur : “पगार मिळेपर्यंत हटणार नाही…”; लातूर महापालिकेचे कामकाज पूर्णपणे ठप्प
1

Latur : “पगार मिळेपर्यंत हटणार नाही…”; लातूर महापालिकेचे कामकाज पूर्णपणे ठप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.