Latur Crime News: धक्कादायक! लग्नाचे आमिष, प्रेमाचा सापळा… महिलेची २२ लाखोंची फसवणूक
हे देखील वाचा: Dharashiv Health Department: धाराशिव आरोग्य विभागात गैरप्रकार? कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शोषणाचा आ. हेमंत ओगलेंनी केला आरोप
सध्या पीडित महिला गुजरातमध्ये एका बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरोपीने पीडितेच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर विश्वास संपादन करून टप्प्याटप्प्याने १३ तोळे सोन्याचे दागिने आणि १ लाख २५ हजार रुपयांची रोकड घेतली.
२२ लाख रुपयांचे कर्ज स्वतःच्या खात्यावर वळविले
आरोपीने पीडितेच्या नावावरून कोटक महिंद्रा व एचडीएफसी बँकेतून तब्बल २२ लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज काढायला लावले आणि ती रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय, पीडित महिलेच्या घराची मूळ कागदपत्रेही आरोपीने स्वतःकडे ठेवल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आले आहे.
हे देखील वाचा: Latur News: लातूर जिल्ह्यात अवैध वाहतुकीचा विळखा कायम, प्रशासनाचे दुर्लक्ष उघड; परिवहन मंत्र्यांच्या आदेशानंतरही कारवाईचा अभाव
वैयक्तिक संबंध उघड करून बदनामीची धमकी
पीडितेने या प्रकाराला विरोध केल्यावर आरोपीने त्यांचे वैयक्तिक संबंध उघड करून बदनामी करण्याची धमकी दिली. पैशांची मागणी करून खंडणीही मागितली. या प्रकरणी पीडित महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपीविरुद्ध बलात्कार, धमकी, खंडणी व फसवणूक अशा गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.






