Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आम्ही लक्ष ठेवत आहोत, मूळ ओबीसींना तिकीट न दिल्यास…; लक्ष्मण हाकेंचा इशारा

निवडणुकांमध्ये मूळ ओबीसी समाजाला न्याय मिळावा, यासाठी ओबीसी समाजाने सज्ज राहण्याचे आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि ॲड. मंगेश सासणे यांनी केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 14, 2025 | 03:30 PM
आम्ही लक्ष ठेवत आहोत, मूळ ओबीसींना तिकीट न दिल्यास...; लक्ष्मण हाकेंचा इशारा

आम्ही लक्ष ठेवत आहोत, मूळ ओबीसींना तिकीट न दिल्यास...; लक्ष्मण हाकेंचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • मूळ ओबीसी समाजाला न्याय मिळावा
  • ओबीसी समाजाने सज्ज राहावे
  • लक्ष्मण हाके यांचे आवाहन
पुणे : आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुका लवकरच होणार आहेत. राजकीय नेत्यांचे विविध भागात दौरेही वाढले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रीया दिली आहे. राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, यामध्ये ओबीसी नगराध्यक्ष पदासाठी ७७ जागा राखीव आहेत. या निवडणुकांमध्ये मूळ ओबीसी समाजाला न्याय मिळावा, यासाठी ओबीसी समाजाने सज्ज राहण्याचे आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि ॲड. मंगेश सासणे यांनी केले.

लक्ष्मण हाके म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या समाजाच्या नेतृत्वाची खरी शाळा असतात. मात्र, जर मूळ ओबीसींना या निवडणुकांमध्ये तिकीट नाकारले गेले, तर त्यांच्या राजकीय अस्तित्वावरच गदा येईल. त्यामुळे कोणत्या पक्षाकडून मूळ ओबीसींना तिकीट दिले जाते आणि कोण त्यांना डावलते, यावर आम्ही लक्ष ठेवत आहोत. ते पुढे म्हणाले, २ सप्टेंबरचा जीआर काढण्यासाठी मनोज जरांगे यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांचे चेहरे ओबीसी बांधवांनी लक्षात ठेवावेत. सामाजिक न्याय आणि प्रतिनिधीत्वासाठी दिलेल्या आरक्षणाचा काही पक्षांकडून गैरवापर होत आहे. मूळ ओबीसींच्या जागांवर बोगस कुणबी प्रमाणपत्रधारकांना तिकीट दिले, तर त्याचा तीव्र विरोध केला जाईल.

ॲड. मंगेश सासणे म्हणाले, कुणबी प्रमाणपत्र म्हणजे ओबीसी समाजाला लागलेले कॅन्सर आहे. जर खऱ्या ओबीसींच्या जागांवर इतरांना तिकीट देण्यात आले, तर आम्ही त्या पक्षांच्या इतर जागांवर त्यांच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी काम करू. बोगस प्रमाणपत्रांच्या माध्यमातून ओबीसींच्या हक्कांवर गदा येऊ देणार नाही.

खऱ्या ओबीसींनाच उमेदवारी द्या

पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमधील इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) राखीव जागांवर केवळ खऱ्या ओबीसी उमेदवारांनाच संधी देण्यात यावी, अशी ठाम मागणी ओबीसी बहुजन महासंघाने केली आहे. कुणबी प्रमाणपत्रावर आधारित उमेदवार दिल्यास सर्वच जागांवर उमेदवार उभे करून संघर्ष उभारला जाईल, असा इशारा महासंघाचे नेते बाळासाहेब झोरे यांनी दिला. पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भानुदास पानसरे, किसन नांगरे, चंदाताई केदारी, राजेंद्र नांगरे, विशाल शेळके, महादेव व भाऊसाहेब मरगळे, भाऊसाहेब आखाडे आणि कृष्णा पानसरे आदी उपस्थित होते. मुळशी तालुक्यात पंचायत समितीच्या नऊ जागांपैकी तीन जागा ओबीसींसाठी आरक्षित आहेत.

Web Title: Laxman hake has warned all parties about the upcoming elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 03:28 PM

Topics:  

  • Election News
  • Laxman hake
  • obc

संबंधित बातम्या

Italy Elections : इटलीच्या राजकीय पटावर नवा डाव! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे नवीन निवडणूक सूत्र; विरोधकांनी का ओढले शरसंधान?
1

Italy Elections : इटलीच्या राजकीय पटावर नवा डाव! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे नवीन निवडणूक सूत्र; विरोधकांनी का ओढले शरसंधान?

‘ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज’; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन
2

‘ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज’; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.