
नीरा नदीच्या पाण्यासाठी सराटीत रास्ता रोको; इंदापूर-माळशिरसमधील सर्वपक्षीय नेते आक्रमक
नीरा नदीपात्र कोरडे पडल्याने इंदापूर आणि माळशिरस तालुक्यातील शेतीपिके पाण्याअभावी संकटात सापडली आहेत. शेतीच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनण्याची भीती निर्माण झाली आहे. एकीकडे शेतकरी पिके जगविण्यासाठी धडपडत असताना दुसरीकडे नदीपात्रात पाणी नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि नीरा नदीत हक्काचे पाणी तातडीने सोडण्याच्या मागणीसाठी सराटी येथे शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.
या आंदोलनात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रत्यक्ष सहभागी होत शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा दिला. आप्पासाहेब जगदाळे, भरत शहा, प्रदीप गारटकर, श्रीमंत ढोले, हनुमंत कोकाटे यांच्यासह इंदापूर व माळशिरस तालुक्यातील विविध पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
पक्ष, गट-तट बाजूला ठेवून नेते एकत्र
विशेष म्हणजे, पाण्याच्या प्रश्नावर सर्वपक्षीय नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येत दाखविलेली एकजूट ही या आंदोलनाची प्रमुख ठळक बाब ठरली. राजकीय पक्ष, गट-तट आणि मतभेद बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र येत प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला.
शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे
‘शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, नदीपात्रात तातडीने पाणी सोडले पाहिजे,’ अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा यापुढे अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही उपस्थित नेत्यांनी दिला.
हे सुद्धा वाचा : दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार, पाठलाग करत तरुणावर कोयत्याने वार; आळंदीतील घटनेनं खळबळ
शेतकऱ्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचणार का?
नीरा नदीच्या पाण्याचा प्रश्न आता केवळ सिंचनापुरता मर्यादित राहिलेला नसून, तो हजारो शेतकरी कुटुंबांच्या अस्तित्वाचा आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजेचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे सराटीतील या रास्ता रोको आंदोलनातून उमटलेला शेतकऱ्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचणार का आणि नीरा नदीपात्रात प्रत्यक्ष पाणी कधी सोडले जाणार, याकडे आता इंदापूर-माळशिरस तालुक्यांतील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Ans: इंदापूर आणि माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी नीरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडावे, या मागणीसाठी सराटी येथे आक्रमक रास्ता रोको आंदोलन केले.
Ans: माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
Ans: नीरा नदीपात्रात शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी तातडीने सोडण्यात यावे, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. नदीपात्र कोरडे पडल्याने शेतीपिके आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मागणीची दखल न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.