
Harshwardhan Patil
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. शरद पवार यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे अनेक नेते जात असल्याने या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. त्यातच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विलिनीकरणाबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. अजित पवार यांची दोन्ही पक्ष एकत्र येण्याची भूमिका होती आणि त्यासंदर्भातील बैठकीला आपण स्वतः उपस्थित होतो, असं त्यांनी स्पष्ट केलं. (NCP Merger)
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, विलिनीकरणाच्या बैठकीत आपण उपस्थित होतो. त्यावेळी अजितदादांची दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, अशी भूमिका होती. अनेक नेत्यांनी याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी एकत्र येण्याचं त्यावेळी ठरलं होतं, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच मागील निवडणुका दोन्ही पक्षांनी एकत्र लढवल्या होत्या.
मात्र, दुर्दैवाने अजितदादांचा अपघात झाला आणि त्यानंतर परिस्थिती बदलली. दादांची आजही पावलोपावली आठवण येते, अशी भावनिक प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
NCP Merger : ‘दादा गेले, विषय संपला!’ राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
विलिनीकरणाचा अंतिम निर्णय हा पक्षाच्या अध्यक्षांचा असतो. ज्येष्ठ नेते म्हणून आमची भूमिका असली तरी वैयक्तिक मतापेक्षा पक्षाचं सामूहिक मत महत्त्वाचं असतं, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.
18 जानेवारीला यासंदर्भात बैठक झाली होती. त्यावेळी अजितदादा स्वतः आपल्याकडे आले होते. त्यानंतर शरद पवारांसोबत बारामतीला जाऊन चर्चा झाली होती, असंही त्यांनी सांगितलं. मात्र, सध्याच्या परिस्थितीत विलिनीकरणाबाबत आपल्याशी कोणीही चर्चा केलेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक पुढील आठवड्यात होण्याची शक्यता हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली. दोन्ही पक्षांचे प्रमुख, त्यानंतर कोअर कमिटी आणि मग आमदार अशी विलिनीकरणाची प्रक्रिया असू शकते, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी योग्य वेळी योग्य निर्णय होतील, असं सूचक विधान केलं आहे. तर सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या निधनानंतर विलिनीकरणाचा विषय आपल्यासाठी संपल्याचं म्हटलं आहे.
त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाबाबत नेमका निर्णय काय होणार, याकडे आता राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Ans: अजित पवार यांची दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची भूमिका होती. यासंदर्भातील बैठकीला आपण उपस्थित होतो, असा खुलासा हर्षवर्धन पाटील यांनी केला.
Ans: हर्षवर्धन पाटील यांच्या माहितीनुसार, 18 जानेवारीला विलिनीकरणासंदर्भात बैठक झाली होती. त्यावेळी अजित पवार स्वतः त्यांच्याकडे आले होते.
Ans: हर्षवर्धन पाटील यांनी पुढील आठवड्यात कोअर कमिटीची बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, बैठकीची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही.