Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंदापुरच्या जागेत शरद पवार गटाची उडी वाढवणार महायुतीची डोकेदुखी; बॅनरबाजीमुळे राजकारण तापलं

भाजप, राष्ट्रवादीनंतर आता शरद पवार यांच्या गटाचा बॅनरमुळे राजकीय वर्तुळात सुरू असलेली जुगलबंदी समोर आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 05, 2024 | 10:51 AM
Team Navrashtra

Team Navrashtra

Follow Us
Close
Follow Us:

इंदापूर :  विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या राज्याचे राजकारण चांगलेच तापू लागले आहे. अशातच महायुतीत सुरु असलेल्या कुरघोड्याही समोर येऊ लागल्या आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमधून विधानसभेसाठी तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे  यांनीही दंड थोपटत हॅट्रिक गाठणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या गटानेही शड्डू ठोकले आहेत. त्यामुळे इंदापुरात आगामी विधानसभा निवडणुकांची रंगत वाढणार असल्याचे दिसू लागले आहे,

दोन दिवसांपूर्वी इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी ‘विमान चिन्हाच्या लागा तयारीला’ असे बॅनर झळकावले होते. त्या बॅनरच्या शेजारीच दत्तात्रय भरणे यांच्या समर्थकांनी, ‘आमचं ठरत नसतं, फिक्स असतं’  अशा मजकुरांचे बॅनर लावत प्रत्युत्तर दिले.तर भाजप, राष्ट्रवादीनंतर आता शरद पवार यांच्या गटाचा बॅनरमुळे राजकीय वर्तुळात सुरू असलेली जुगलबंदी समोर आली आहे.

शरद पवार यांच्या समर्थकांनी ‘आजपर्यंतचा इतिहास साहेब म्हणतील तोच इंदापूर विधानसभेचा आमदार’ अशा आशयाचा बॅनर लावला आहे. या बॅनरवर शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा फोटो लावण्यात आला आहे.  विशेष म्हणजे, तीनही पक्षांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आमच्याच पक्षाचा उमेदवार निवडून येणाऱ असल्याचा दावा केला आहे. या तीनही पक्षांच्या बॅनरबाजीने इंदापुरातील विधानसभा निवडणूक चांगलीच गाजणार असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, इंदापूरची विधानसभेची जागेसाठी 2019 साली हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये गेले.  तर 2019 ला भले आघाडी तुटली तरी चालेल पण इंदापूरची जागा सोडणार नसल्याचा हट्टच अजित पवार यांनी केला होता. महाविकास आघाडीतून बाहेर पडत अजित पवार हेदेखील  भाजपमध्ये सहभागी झाले. त्यामुळे आता पुन्हा एकदा इंदापुरची जाहा कोणाला मिळणार यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे.

अजित पवार इंदापुरच्या जागेसाठी  अडून बसतील आणि ती जागा दत्तात्रय भरणे यांना मिळू शकते, असे संकेत दिसू लागले आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच अपक्ष म्हणून लढण्याची तयारी सुरु केल्याचे या बॅनरमधून  दिसत आहेत.

 

Web Title: Leaders in grand alliance jostle for indapur seat politics will heat up due to banner fighting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2024 | 10:51 AM

Topics:  

  • Harshvardhan Patil
  • Latest Political News
  • Nationalist Congress Party
  • political news

संबंधित बातम्या

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
1

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर
2

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण
3

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

मराठ्यांविरोधात इंग्रजांना मदत करणाऱ्या कुटुंबाच्या घशात कोट्यवधींची जमीन? रोहित पवारांच्या रडारवर शिंदे गटाचा बडा नेता
4

मराठ्यांविरोधात इंग्रजांना मदत करणाऱ्या कुटुंबाच्या घशात कोट्यवधींची जमीन? रोहित पवारांच्या रडारवर शिंदे गटाचा बडा नेता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.