माढा तालुक्यातील कन्हेरगावात बिबट्याची दहशत
दौंड : राज्यामध्ये बिबट्याची दहशत वाढत आहे. अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांमध्ये बिबट्या शिरत असून यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी जुन्नर भागामध्ये बिबट्यांचे अस्तित्व जास्त आढळून येत होते. आता मात्र पश्चिम महाराष्ट्रातील गावागावांमध्ये बिबट्या आढळत आहेत. शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाई आणि दौंड तालुक्यातील खामगाव परिसरात बिबट्या आढळून आला आहे.
शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाई येथील मुंजाळवाडीत शुक्रवारी (दि.09) रात्रीच्या सुमारास बिबट्या मानवी वस्तीमध्ये शिरल्याची घटना घडली. शत्रुघ्न साहेबराव देवकर यांच्या गोठ्यातील शेळीवर बिबट्याने हल्ला करत तिला ठार केले. त्यामुळे कवठे येमाई परिसरात बिबट्यांची दहशत कायम असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी शत्रुघ्न देवकर यांनी आपल्या घरासमोर पशुधनासाठी दहा फुट उंचीचे तारेचे कंपाऊंड केले आहे. या दहा फुट कंपाऊंडच्या तारेवरुन बिबट्याने आत उडी मारत प्रवेश करुन आतमध्ये बांधलेल्या तीन वर्ष्यांच्या गाभण शेळीवर हल्ला करून ठार केले.या घटनेने शेतकरी देवकर यांचे सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. या भागात वारंवार अशा घटना घडत असल्याने पाळीव पशुधनाचे संरक्षण कशा प्रकारे करावे ? हा प्रश्न पशुपालक शेतकऱ्यांच्या समोर उभा ठाकला आहे.
अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पशुपालन करणारे शेतकरी ट्रस्ट झाले असून पाळीव प्राण्यांचे नाहक बळी जात आहेत. बिबट्याच्या वाढत्या दहशतीने स्थानिक शेतकऱ्यांनी बिबट्यांना पिंजऱ्यात पकडण्यासाठी शिरूर वन विभागाने योग्य त्या उपाययोजना तात्काळ करण्याची मागणी केली आहे.या घटनेचा शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गणेश पवार, वनरक्षक नारायण राठोड, वनमजूर हनुमंत कारकुड यांनी पंचनामा केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा