राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा तथ्यहीन - भुजबळ (File Photo)
मुंबई: राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवासांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रीया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट ही कौंटुबिक फूट आहे. त्यामुळे ते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. पण त्यांच्या या विधानामुळे मात्र राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
माध्यमांशी संवाद साधताना संजय शिरसाट म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी दोन्ही काँग्रेससोबत युती करणं हेच चुकीचंच होतं. हे आम्ही त्यांना आधीपासूनच सांगत होते. पण आता त्यांना त्याचा प्रत्यय येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवाले तुमच्यासोबत जास्त दिवस राहणार नाहीत. हेच आम्ही त्यांना अनेकदा सांगत होतो. पण आता जसजसे त्यांचे भविष्य अंधारमय होत आहे. तसतसे ते टीका करत आहेत. राष्ट्रवादीतील ही फूट कौटुंबिक मानली जात असली तरी ते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
‘आमचे ड्रोन भारताच्या राजधानीपर्यंत…’, पाकिस्तानी सैन्याचा पोकळ दावा; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
काँग्रेस तरी कुठे उबाठासोबत आहे. गेल्या चार महिन्यात त्यांची काँग्रेससोबत कोणती बैठक झाली, कधी यांनी त्यांना फोन केला, किंवा त्यांना यांना फोन केला असा सवालही शिरसाट यांनी उपस्थित केला. पुढील काळात उबाठा गटाल एकट्यानेच वाटचाल करावील लागणार असल्याचं दिसत आहे. हा एकट्याचा प्रवास त्यांना खूप महागात पडणार आहे. ते हिंदुत्त्वाशी एकरूप राहिले नाही, मग महाविकास आघाडीत जाऊनही ते महाविकास आघाडी एकत्र ठेवू शकले नाहीत. त्यांची अवस्था आता ना घर का ना घाट का अशी झाली आहे, अशी जहरी टीकाही त्यांनी ठाकरे गटावर केली आहे.
संजय शिरसाट म्हणाले, अजित पवार हे शरद पवार यांच्यासोबत जातील की हे माहिती नाही, पण शरद पवार आणि अजित पवार यांचं एकत्र येणे हे काहीतरी संकेत देत आहेत. शरद पवार आमच्या सोबत येतील की अजित पवार नेतृत्व करतील हे सगळे प्रश्न आहे. त्या राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करेल हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र येऊ द्या. त्यानंतर कोणतही समीकरणे ठरतात हे पाहू. पण भाजप आणि शिवसेनेची युती पक्की आहे त्यात कोणतेही मतभेद नाही.
Maharashtra SSC Results 2025 Date: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कसा पाहाल निकाल? जाणून घ्या
“दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आल्यावर आम्ही छोटा भाऊ होतो की मोठा भाऊ, हा मुद्दा नाही,” असं स्पष्ट करताना अजित पवार यांनी युतीच्या प्रश्नावर भाष्य केलं. “चंद्रबाबू नायडू आमच्यासोबत आले, म्हणून आम्ही युती केली का? त्यांच्या प्रासंगिक युतीशी आमचं काही देणंघेणं नाही,” असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. लाडकी बहीण योजनेवरही अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत घेतलेला निर्णय कायम राहील. योजनेत काही सकारात्मक बदल किंवा अद्ययावत प्रक्रिया करायची असल्यास त्याचं स्वागत आहे. मात्र, सध्या लाभार्थी महिलांना जे काही मिळत आहे, त्यामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.