Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Leopard News: पुण्यानंतर बिबट्या ‘या’ जिल्ह्यात; ‘कुंभकर्णी’ वनविभाग कधी जागा होणार?

वन विभागाने केवळ दाखवायची कार्यवाही न करता प्रत्यक्षात कोणतेही वैज्ञानिक निरीक्षण, सापळे, कॅमेरे किंवा मानवी वस्तीत घुसखोरी रोखण्याच्या उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 06, 2025 | 03:05 PM
Leopard News: पुण्यानंतर बिबट्या 'या' जिल्ह्यात; 'कुंभकर्णी' वनविभाग कधी जागा होणार? नागरिकांचा सवाल

Leopard News: पुण्यानंतर बिबट्या 'या' जिल्ह्यात; 'कुंभकर्णी' वनविभाग कधी जागा होणार? नागरिकांचा सवाल

Follow Us
Close
Follow Us:

राज्यभरातील अनेक भागात बिबट्यांचा वावर वाढला 
वाई तालुक्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 
वन विभागावर वाढतोय सर्वसामन्यांचा रोष 

वाई: वाईच्या पश्चिम भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा (Leopard) वाढता वावर नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरत असताना वाई वन विभाग (Forest Department) मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याची तीव्र नाराजी नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. जोर, जांभळी, वेलंग, मांढरेवाडी, अभेपुरी, धोम न्हाळेवाडी, बोरीव या गावांच्या शिवारात दररोज बिबट्याचे दर्शन होत असून आता तर हा बिबट्या थेट वाई शहरालगतच्या नावेचीवाडीपर्यंत पोहोचल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बिबट्या घरात, शिवारात घुसून कुत्रे, शेळ्या, मेंढ्या आणि वासरांचे फडशे पाडत आहे. तरीही या गंभीर परिस्थितीकडे वाई वन विभागाने आजवर ठोस उपाययोजना केलेली नाही. परिणामी, “पश्चिम भागात एखादी जीवघेणी दुर्घटना घडल्यावरच वन विभाग जागा होणार का?” असा संतप्त सवाल जनतेतून केला जात आहे.

Leopard News: किंचित दिलासा! पुणे जिल्ह्यात वनविभागाची मोठी कारवाई; पहाटेच्या वेळेस 3 बिबट्यांना…

शिरूर–जुन्नर–आंबेगाव पट्ट्याप्रमाणेच आता वाईच्या पश्चिम भागातही बिबट्याचा सततचा वावर जाणवत असून, मोकाट कुत्र्यांची संख्या घटल्याने पुढील काळात मानवांवर हल्ल्याची शक्यता वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वन विभागाने केवळ दाखवायची कार्यवाही न करता प्रत्यक्षात कोणतेही वैज्ञानिक निरीक्षण, सापळे, कॅमेरे किंवा मानवी वस्तीत घुसखोरी रोखण्याच्या उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत.

Leopard News: आईपासून विमुक्त झाला अन् फसला; Forest Department कडून बछड्याचे रेस्क्यू

दरम्यान, मांढरदेव पठार परिसरात आधीच रानडुक्कर, मोर आणि इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्याने शेतकऱ्यांची कमर मोडलेली असताना आता बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांचे जीवन अक्षरशः असुरक्षित झाले आहे. रात्री-अपरात्री शेताला पाणी देणेही शेतकऱ्यांना धोक्याचे झाले असून डोंगरालगतची शेती अनेकांनी सोडून दिल्याची स्थिती आहे. पश्चिम भागातील भीतीयुक्त वातावरण लक्षात घेता वाई वन विभागाने वेळीच जागे होऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात, बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी स्थानिकांकडून होत आहे.

पुणे जिल्ह्यात वनविभागाची मोठी कारवाई
शिरूर तालुक्यात सध्या अनेक ठिकाणी ऊस तोड सुरू असून बिबट्यांचे शेतकऱ्यांसह नागरिकांना सातत्याने दर्शन होत आहे. पिंपरखेड,जांबुत परिसरात बिबट्या च्या हल्ल्यात मागील महिन्यात ३ बळी गेल्यानंतर वन विभाग अलर्ट मोडवर असून बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी ज्या काही महत्वाच्या उपाय योजना करता येतील त्या प्राधान्याने बिबट प्रवण क्षेत्रात राबविताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काल दि. ३ रोजी शिरूर  वनपरिक्षेत्र कार्यालयात ७ नवीन पिंजरे दाखल झाले असल्याची माहिती शिरूरचे वन परिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली

Web Title: Leopard fear in wai western area people criticizes to forest department satara news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • Forest Department
  • Leopard

संबंधित बातम्या

वाईत उमेदवारांची वाढली धाकधूक; निकालाच्या प्रतीक्षेतच तापले राजकीय वातावरण
1

वाईत उमेदवारांची वाढली धाकधूक; निकालाच्या प्रतीक्षेतच तापले राजकीय वातावरण

Leopard News: किंचित दिलासा! पुणे जिल्ह्यात वनविभागाची मोठी कारवाई; पहाटेच्या वेळेस 3 बिबट्यांना…
2

Leopard News: किंचित दिलासा! पुणे जिल्ह्यात वनविभागाची मोठी कारवाई; पहाटेच्या वेळेस 3 बिबट्यांना…

Pune Leopard : बिबट्याच्या दहशतीने जिल्ह्यात उमेदवारांसमोर रात्रीच्या प्रचाराचा प्रश्न
3

Pune Leopard : बिबट्याच्या दहशतीने जिल्ह्यात उमेदवारांसमोर रात्रीच्या प्रचाराचा प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.