Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त

वाई परिसरात गावठी पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी तब्बल पाच तास सापळा रचून जेरबंद केले. त्याने दिलेल्या माहितीनंतर दुसऱ्या तरुणालाही पाठलाग करून पकडण्यात आले. दोघांकडून दोन गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे असा १ लाख ४० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 18, 2026 | 04:43 PM
Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त

Follow Us
Follow Us:
  • कॅनॉलजवळ पिस्टल मिरविताना अटक
  • साथीदाराकडूनही गावठी पिस्टल जप्त
  • पाच काडतुसे पोलिसांच्या हाती
 

सातारा: वाई परिसरात गावठी पिस्टलच्या जोरावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना वाई पोलिसांनी जेरबंद केले. शेंदुरजणे येथील कॅनॉलजवळ हातात पिस्टल घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी सापळा रचून पकडले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर दुसऱ्या आरोपीचाही पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. दोघांकडून दोन गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे असा १ लाख ४० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुदेश दीपक पाटणे आणि अक्षय विलास देसाई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा: Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं? 

पाच तास सापळा अन् पिस्टलसह अटक

वाई-सुरूर रस्त्यावरील शेंदुरजणे हद्दीतील कॅनॉलजवळ एक युवक हातात पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती वाई पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले. पोलिसांनी दुपारी साडेबारा वाजल्यापासून कॅनॉल परिसरात सापळा लावला. तब्बल पाच तास दबा धरून बसल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संशयित सुदेश पाटणे पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये त्याच्याकडे देशी बनावटीचे गावठी पिस्टल आढळून आले. पोलिसांनी हे पिस्टल जप्त केले.

चौकशीत साथीदाराची माहिती

पोलिसांच्या चौकशीत पाटणे याने हे पिस्टल स्वप्निल ऊर्फ सोन्या प्रदीप जगताप याच्याकडून घेतल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले. तसेच अक्षय देसाई यानेही त्याच्याकडून पिस्टल घेतल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी अक्षयचा शोध सुरू केला. दरम्यान, रात्री उशिरा अक्षय देसाई परखंदी रोडवरील चौकात पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. अंगझडती घेतली असता त्याच्याकडे आणखी एक गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे आढळून आली.

हेही वाचा: Accident News: पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; कारची ट्रकला जोरदार धडक , २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू 

शस्त्रे कोठून आली, तपास सुरू

दोन्ही आरोपींना अटक करून वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दोघांना २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या पिस्टलचा वापर कोणत्या कारणासाठी केला जाणार होता, आरोपींना शस्त्रे कोठून मिळाली आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे आणि त्यांच्या पथकाने केली.

Web Title: Wai crime news two country made pistols five live cartridges seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • crime news
  • Satara Crime
  • Satara Crime News
  • Wai News

संबंधित बातम्या

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?
1

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?

सासवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, गावठी पिस्टलसह तरुण ताब्यात; तब्बल 7 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त
2

सासवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, गावठी पिस्टलसह तरुण ताब्यात; तब्बल 7 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…
3

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ
4

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.