
धक्कादायक ! आश्रमशाळेच्या जेवणातील वरणात आढळली पाल; 31 विद्यार्थ्यांना झाली विषबाधा
चंद्रपूर : आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या अन्नातून 31 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या संशयाने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना जिवती तालुक्यातील नगराळा येथील अंनू नाईक माध्यमिक शाळेत मंगळवारी उघडीस आली. तेच अन्न विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. जेवण केल्यानंतर विद्यार्थ्यांना तातडीने राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
आश्रमशाळेत नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी सकाळच्या जेवणाची तयारी करण्यात आली होती. सकाळी ९.३० वाजता शाळेतील २४० विद्यार्थ्यांपैकी ३१ विद्यार्थी जेवण्यासाठी पंगतीत बसले. या विद्यार्थ्यांना अन्न वाढले जात असताना वस्तीगृह अधिक्षक अल्का राठोड यांना वरणाच्या बकेटमध्ये पाल आढळली. त्यांनी तत्काळ विद्यार्थ्यांचे सहभोजन थांबवून त्याची सूचना मुख्याध्यापकांना दिली. ३१ विद्यार्थ्यांनी काही घास अन्न प्राशन केले होते. विषबाधेची शक्यता लक्षात घेऊन पंगतीतील ३१ विद्यार्थ्यांना तातडीने राजूरा येथील ग्रामीण रूग्णालयात सकाळी ११ वाजताच्या सुमारास तपासणीसाठी दाखल करण्यात आले.
Chandrapur News : ४२ गावांचा भार, मात्र वैद्यकीय सुविधांचा अभाव; तळोधीत ग्रामीण रुग्णालयाची मागणी
दरम्यान, कोणत्याही विद्यार्थ्याला उलटी, चक्कर येणे किंवा मळमळ करणे असे लक्षण दिसून येत नसल्याने सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. या विद्यार्थ्यांना २४ तासासाठी रूग्णालयात राहावे लागणार आहे हे विशेष. असे असले तरी, शाळा व्यवस्थापनाच्या एकूण कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.
भोजनाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दररोज गुणवत्ता, स्वछता आणि अन्नसुरक्षेची नियमित तपासणी होते की नाही? असा सवाल पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. यात मुलींचाही समावेश आहे. मंगळवारी सकाळी 31 मुलांची तुकडी जेवायला बसल्यानंतर सुरुवातीला हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे जेवण थांबवण्यात आले, विद्यार्थ्यांना कोणताही त्रास झाला नसला तरी काळजी म्हणून त्या ३१ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ८ तास उलटल्यानंतरही विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे कोणतेही लक्षण आढळून आले नाही.
मंचरमध्ये बनावट दूध रॅकेटचा भांडाफोड
महाराष्ट्राला हादरवणारी घटना मंचरमध्ये घडली. मंचरमध्ये बनावट दूध रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला असून, ५ रुपयांच्या रासायनिक मिश्रणातून ७० रुपयांना विषारी दूध विक्री होत असल्याची माहिती समोर आली आहे. या व्यवसायातून जवळपास वर्षाला दोन हजार कोटी रुपयांची उलाढाल गेल्या सहा-सात वर्षांपासून चालू असल्याचे वास्तव समोर आले आहे.