Aai Ekvira Devi Temple dress code enforced marathi news update
लोणावळा : कोळी बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या आई एकविरा देवी मंदिराबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. देवीच्या मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना यापुढे ड्रेसकोड घालणे बंधनकारक असणार आहे. मंदिरामध्ये सात जुलैपासून हा ड्रेसकोड लागू होणार आहे. याची अंमलबजावणी करणे बंधनकारक असणार आहे. फक्त मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना नाही तर दुकानदारांना देखील हा ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे.
आई एकविरा देवी मंदिराच्या संस्थानाकडून ड्रेसकोड बाबत एक पत्रक काढण्यात आले आहे. यामध्ये ड्रेसकोडबाबत नियम घालण्यात आले आहेत. तोडके आणि अंगप्रदर्शन करणारे कपडे घालणाऱ्या व्यक्तींना मंदिरामध्ये प्रवेश नाकारण्यात येणार असल्याचे स्पष्ट सांगण्यात आले आहे. देवीच्या मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंदिर संस्थानाकडून सांगण्यात आले आहे. पत्रकामध्ये सर्व भाविक, दुकानदार आणि स्थानिकांना हा ड्रेसकोड पाळणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे. पुरुष, महिला, तरुण आणि तरुणी सर्वांसाठी हा ड्रेसकोड असल्याचे मंदिर संस्थानाकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कोळी बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या एकविरा आईच्या मंदिरामध्ये प्रवेश करताना अंग झाकलेले कपडे घालावे लागणार आहेत. महिलांनी मंदिरामध्ये प्रवेश करताना साडी, कुर्ता, सलवार किंवा इतर भारतीय पारंपारिक कपडे परिधान करावे. मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या सर्व महिलांनी अंग झाकलेले कपडे परिधान करणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर हा नियम तरुण मुलींना देखील लागू करण्यात आला आहे. पुरुषांनी देखील अंग झाकलेले कपडे घालणे गरजेचे आहे. पुरुषांनी धोतर-कुर्ता, पॅन्ट, शर्ट, टीशर्ट किंवा इतर भारतीय कपडे घालणे गरजेचे आहे. पुरुषांचे देखील अंग झाकलेले असणे हे गरजेचे आहे. तसेच हा नियम तरुणांना देखील लागू असणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तरुण आणि तरुणींनी शॉर्टस, शॉर्ट स्कर्ट, वेस्टन कपडे, मिनी स्कर्ट, फाटलेली जीन्स, हाफ पॅन्ट किवा अंग प्रदर्शन करणारे कपडे घालू नयेत. अशी कपडे कुणी परिधान करून आढळल्यास त्या भक्ताला मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. ड्रेस कोड हा बंधनकारक आहे. अशी माहिती आई एकविरा देवीच्या संस्थानकडून करण्यात आली आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी जात असाल तर जरा थांबा. कारण मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना तुळजाभवानी मंदिर परिसरात असभ्य कपडे घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. असभ्य आणि अशोभनीय वस्त्र धारण करून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, असे फलक आजपासून मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचं भान ठेवा, असा सल्ला देखील फलकावरून देण्यात आला आहे. तुळजाभवानी मंदिरामध्ये प्रवेशासाठी मंदिर संस्थानच्या वतीने एक नियमावली जारी करण्यात आली आहे. त्या नियमावलीचे फलक हे मंदिरात लावण्यात आले आहेत. बरमोडा, हाफ पॅन्ट, उत्तेजक कपडे तसेच अंग प्रदर्शन करणारे कपडे घातलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही.