Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातासमुद्रापार घुमला विठ्ठलनामाचा गजर! लंडनहून निघाली पंढरीची दिंडी; ११ देशांचा प्रवास करून विठुरायाच्या भेटीसाठी येणार पादुका

Pandharpur Wari : वारकरी परंपरेचा जागतिक गौरव करणारी अनोखी दिंडी लंडनहून पंढरपूरकडे रवाना झाली आहे. विठुरायाच्या पादुका ११ देशांचा प्रवास करून पंढरपूरात दाखल होणार असून, सातासमुद्रापारही विठ्ठलभक्तीचा गजर घुमत असल्याचे या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 01, 2026 | 04:35 PM
सातासमुद्रापार घुमला विठ्ठलनामाचा गजर! लंडनहून निघाली पंढरीची दिंडी; ११ देशांचा प्रवास करून विठुरायाच्या भेटीसाठी येणार पादुका

सातासमुद्रापार घुमला विठ्ठलनामाचा गजर! लंडनहून निघाली पंढरीची दिंडी; ११ देशांचा प्रवास करून विठुरायाच्या भेटीसाठी येणार पादुका

Follow Us
Follow Us:
  • सातासमुद्रापार घुमला विठ्ठलनामाचा गजर!
  • लंडनहून निघाली पंढरीची दिंडी
  • ११ देशांचा प्रवास करून विठुरायाच्या भेटीसाठी येणार पादुका
सचिन ननावरे, वाई : आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि अध्यात्माचा प्राण. शतकानुशतके लाखो वारकरी “ज्ञानोबा-तुकाराम”चा जयघोष करत आळंदी ते पंढरपूर पायी चालत विठुरायाच्या भेटीसाठी निघतात. या अलौकिक परंपरेचे आकर्षण आता देशाच्या सीमा ओलांडून सातासमुद्रापार पोहोचले आहे. यंदा प्रथमच इंग्लंडमधील लंडन येथून पंढरपूरकडे निघालेली जागतिक दिंडी वारकरी संप्रदायाच्या इतिहासातील एक नवे पर्व ठरत आहे.

इंग्लंडमधील रॉयल विंडसर रेसकोर्स येथून ६ जून २०२६ रोजी या जागतिक वारीचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. कपाळी गंध, गळ्यात तुळशीमाळ, हाती भगवा ध्वज आणि मुखी विठ्ठलनामाचा अखंड गजर… अशा वातावरणात भारतीयांसह विविध देशांतील भाविकांनी या दिंडीत सहभाग घेतला. भारतीय वारकऱ्यांचा भक्तिभाव, समतेचा संदेश आणि शिस्तबद्ध वारी पाहून अनेक परदेशी नागरिकही या सोहळ्याचे सहभागी बनले.

पालकमंत्र्यांनी जपली वारकरी परंपरा! आषाढीनंतर विठ्ठल मंदिरातील कथित खरेदी गैरव्यवहाराची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होणार चौकशी

या वारीत विठ्ठलाच्या पादुका इंग्लंड, नेदरलँड्स, बेल्जियम, फ्रान्स, लक्झेंबर्ग, जर्मनी, पोलंड, झेक रिपब्लिक, हंगेरी, तुर्की आणि जॉर्जिया अशा ११ देशांतून सुमारे ५० दिवसांचा प्रवास करणार आहेत. जॉर्जियामधून या पादुका विमानाने मुंबईत आणल्या जाणार असून त्यानंतर त्या आळंदीत पोहोचतील. तेथून पारंपरिक पालखी सोहळ्यासह दिंडीत सहभागी होत विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत.

या जागतिक वारीमागील संकल्पना मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असलेले अनिल खेडकर यांची आहे. २०१७ पासून ते नियमितपणे पंढरीची वारी करत आहेत. लंडनमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिर उभारण्याचा संकल्प आणि परदेशात वाढणाऱ्या भारतीय तरुणांना वारकरी संप्रदाय, संत साहित्य व महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख करून देण्याच्या उद्देशातून त्यांनी हा अभिनव उपक्रम हाती घेतला.

या वारीत रिले पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. प्रत्येक देशातील भाविक आपल्या देशाच्या हद्दीपर्यंत पादुकांसह पदयात्रा करून त्या पुढील देशातील वारकऱ्यांकडे सुपूर्द करत आहेत. त्यामुळे संपूर्ण युरोपमध्ये विठ्ठलनामाचा गजर घुमत असून विविध देशांतील भारतीयांना एकाच भक्तीच्या सूत्रात बांधण्याचे काम ही वारी करत आहे. एप्रिल २०२५ मध्ये भारतातून विठ्ठलाच्या पादुका तब्बल ७० दिवसांचा प्रवास करून लंडनमध्ये पोहोचल्या होत्या. त्या वेळी विविध देशांतील भारतीयांनी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले होते. त्याच प्रेरणेतून ‘लंडन ते पंढरपूर वारी’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली.

वारकरी संप्रदाय हा केवळ धार्मिक परंपरा नसून समता, बंधुभाव, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारी जीवनशैली आहे. आता हाच संदेश जगभर पोहोचविण्याचे कार्य या जागतिक वारीच्या माध्यमातून घडत असून पंढरीची वारी खऱ्या अर्थाने ‘विश्ववारी’ बनत असल्याची भावना वारकरी व्यक्त करत आहेत.

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी वारी… जोरदार तयारी! झेडपीची पंढरीत प्रथमच सभा; साडेचार कोटींच्या कामांना मंजुरी

बुडापेस्टमध्ये विठुरायाच्या पादुकांचे जल्लोषात स्वागत

हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे डॅन्यूब नदीच्या काठावर लंडन ते पंढरपूर वारीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. वारकरी पोशाख, कपाळी गंध, भगवा ध्वज आणि हरिनामाच्या गजरात भारतीयांसह हंगेरीयन नागरिकांनी विठुरायाच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले. या सोहळ्यात सुमारे १०० ते १५० भारतीय आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते, अशी माहिती बुडापेस्टमधील भारतीय रहिवासी व वारीचे प्रतिनिधी विनोद धायगुडे यांनी दिली.

Web Title: London pandharpur dindi viththal paduka 11 countries wari 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • Ashadhi Wari 2026
  • pandharpur wari

संबंधित बातम्या

पंढरपूरच्या विकास आराखड्याला वेग! निविदा प्रक्रिया राबवा; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरासाठी वास्तुविशारद नेमा
1

पंढरपूरच्या विकास आराखड्याला वेग! निविदा प्रक्रिया राबवा; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरासाठी वास्तुविशारद नेमा

पालकमंत्र्यांनी जपली वारकरी परंपरा! आषाढीनंतर विठ्ठल मंदिरातील कथित खरेदी गैरव्यवहाराची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होणार चौकशी
2

पालकमंत्र्यांनी जपली वारकरी परंपरा! आषाढीनंतर विठ्ठल मंदिरातील कथित खरेदी गैरव्यवहाराची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होणार चौकशी

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी वारी… जोरदार तयारी! झेडपीची पंढरीत प्रथमच सभा; साडेचार कोटींच्या कामांना मंजुरी
3

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी वारी… जोरदार तयारी! झेडपीची पंढरीत प्रथमच सभा; साडेचार कोटींच्या कामांना मंजुरी

Pandharpur Ashadhi Wari 2026: ‘वारीत सुविधा, सेवेत कसूर नाही! साडेचार कोटींच्या कामांना जिल्हा परिषदेची ऐतिहासिक मंजुरी
4

Pandharpur Ashadhi Wari 2026: ‘वारीत सुविधा, सेवेत कसूर नाही! साडेचार कोटींच्या कामांना जिल्हा परिषदेची ऐतिहासिक मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.