मुंबई : अखेर मुंबई पोलिसांनी प्रवीण कलमे यांच्याविरोधात अजामीनपात्र लूक आऊट नोटीस जारी केली आहे. SRA मधून फाईल चोरी केल्यासंदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. केंद्रीय गृहखात्याने याविषयीचे पत्र पाठवत तपासाबाबत माहिती विचारली होती. ब्युरो ऑफ इम्मिग्रेशनने या 27 जून रोजी मुंबई पोलिसांना याविषयीची विचारणा केली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात मुंबई पोलिसांनी आज कलमेंविरोधात अजामीनपात्र लूक आऊट नोटीस बजावल्याचे सांगितले.
तसेच कलमे हे दुबईत लपून बसलेले असून, पोलीस त्यांनी तिथून खेचून मुंबईत आणतील असा, विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या दहा महिन्यांपासून कलमे यांच्याविरोधात कलमे यांच्यावर कारवाई करावी यासाठी पाठपुरावा करत असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगत उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुन्हा आरोपांची राळ उडवून दिली.
[read_also content=”तब्बल 24 वर्षांनी आव्हाडांना क्लिन चिट; 350 रुपये लाच घेतल्याचा होता आरोप https://www.navarashtra.com/maharashtra/a-clean-chit-to-awadh-after-24-years-he-was-accused-of-accepting-a-bribe-of-rs-350-nrdm-299845.html”]
किरीट सोमय्या म्हणाले, प्रवीण कलमे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उजवा हात आहे. अनिल परब यांचा जवळचा तर जितेंद्र आव्हाडांचा सचिन वाझे असल्याचा पुन्हा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. कलमे यांच्यामार्फत ठाकरे यांनी वसुली केल्याचा पुनर्उच्चार त्यांनी केला. गेल्या दहा महिन्यांपासून कलमेंविरोधात कारवाईसाठी आपण पाठपुरावा करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच कलमे हे दुबईत लपून बसले आहेत. मुंबई पोलीस लवकरच कलमे यांना दुबईतून खेचून आणतील असा विश्वासही किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला.