Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गॅस सिलिंडरच्या टंचाईने नांदेडकर त्रस्त; अधिवेशनात लोकप्रतिनिधींचे मार्ग काढण्याचा प्रयत्न

नांदेडमध्ये देखील गॅस तुटवडा भासत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार, आमदार विकासकामांसाठी पाठपुरावा करत होते. त्यामुळे हा आठवडा गाजला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 16, 2026 | 04:55 PM
LPG Gas Cylinder Shortage in Nanded Causes Unnecessary Hardship to Citizens

LPG Gas Cylinder Shortage in Nanded Causes Unnecessary Hardship to Citizens

Follow Us
Close
Follow Us:

LPG Gas Shortage : अमृत देशमुख :  नांदेड : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-इजाईल संघर्षामुळे गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे देशभरात विशेषतः महाराष्ट्रातील जिल्ह्या जिल्ह्यात गॅस सिलिंडरची (LPG Gas) टंचाई व दरवाढीची समस्या निर्माण झाली आहे. नांदेड जिल्हाही गॅस टंचाईने होरपळून निघाला आहे, जिल्ह्याला गॅस टंचाईचा फटका बसत असतानाच दिल्ली व मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार, आमदार विकासकामांसाठी पाठपुरावा करत होते. या दोन्ही विभिन्न घडामोडींमुळे मागील आठवडा चर्चेत राहिला. (Nanded News)

मध्यपूर्व देशांतून होणाऱ्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर जाणवू लागला आहे. शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागल्याचे चित्र दिसून आले. संभाव्य तुटवड्याच्या भीतीने नागरिकांनी गरजेपेक्षा जास्त गॅस बुकिंग करण्यास सुरुवात केल्यामळे वितरण व्यवस्थेवर ताण निर्माण झाला. परिणामी अनेक गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाल्या. दरम्यान, काही ठिकाणी जादा दराने गॅस सिलिंडरची विक्री होत असल्याच्या तक्रारी समोर आल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले, कोणीही जादा दर आकारत असल्यास तत्काळ प्रशासनाकडे तक्रार करावी, असे स्पष्ट करण्यात आले.

हे देखील वाचा : राजकीय नेत्यांच्या प्रशिक्षणाला ‘ब्रेक’, नगरसेवकांची दांडी; रिकाम्या खुर्त्यांचीच चर्चा

चर्चेने आठवडा गाजला

गॅस टंचाईमुळे नागरिक त्रस्त असताना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मात्र दिल्ली व मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्यस्त होते. या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत केंद्रातील भाजप सरकारचा निषेध नोंदवला. ऐन उन्हाळ्यात गैस टंचाईच्या झळा बसत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले. दरम्यान, अधिवेशनाच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण आणि खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह विविध केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. राज्यसभेतही त्यांनी अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित करत जिल्ह्याच्या विकासासाठी पाठपुरावा केला. तसेच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी जिल्हह्यातील आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, श्रीजया चव्हाण, आनंदराव बौढारकर, राजेश पवार आणि भीमराव केराम मुंबईत उपस्थित राहून आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्न सभागृहात मांडले.

हे देखील वाचा :  महाराष्ट्रात जे चाललयं ते पटत नाहीये? राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्याचा टीझर आऊट

संबंधित मंत्र्यांकडून सकारात्मक आश्वासने मिळाल्याने जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्याच बरोबरच खा. अशोकराव चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी पोलिस आयुक्तालय नांदेडला स्थापन हावे, अशी मागणी करत पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली त्यामुळे पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. गॅस सिलिंडरची टंचाई, दरवाढीची विता आणि विकासकामांसाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा या विविध सामाजिक-राजकीय घडामोडीमुळे मागील आठवडा नांदेड जिल्ह्यात विशेष चर्चेत राहिला.

Web Title: Lpg gas cylinder shortage in nanded causes unnecessary hardship to citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 04:55 PM

Topics:  

  • Gas Cylinder
  • nanded news

संबंधित बातम्या

गॅस तुटवड्यामुळे छोटे व्यवसाय अडचणीत; आंतरराष्ट्रीय तणावाचा मावळ तालुक्याला फटका
1

गॅस तुटवड्यामुळे छोटे व्यवसाय अडचणीत; आंतरराष्ट्रीय तणावाचा मावळ तालुक्याला फटका

पोटात गॅस झाल्यानंतर अस्वस्थता जाणवते? मग ‘हे’ घरगुती उपाय केल्यास अपचनाच्या समस्येपासून मिळेल सुटका
2

पोटात गॅस झाल्यानंतर अस्वस्थता जाणवते? मग ‘हे’ घरगुती उपाय केल्यास अपचनाच्या समस्येपासून मिळेल सुटका

नांदेड भाजपला आता निष्ठावंतांची गरज नाही? स्वीकृत नगरसेविकांबाबत आश्वासन वेगळे अन् निर्णय वेगळा
3

नांदेड भाजपला आता निष्ठावंतांची गरज नाही? स्वीकृत नगरसेविकांबाबत आश्वासन वेगळे अन् निर्णय वेगळा

गॅस एजन्सीचालक मस्त, ग्राहक मात्र त्रस्त! भर उन्हात तासनतास रांगेत उभे राहून गॅस मिळविण्याची वेळ
4

गॅस एजन्सीचालक मस्त, ग्राहक मात्र त्रस्त! भर उन्हात तासनतास रांगेत उभे राहून गॅस मिळविण्याची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.