Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kunal Kamra: हायकोर्टाने दिलासा देताच कुणाल कामराने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; मुंबई पोलिसांसमोर…

प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामराच्या नावावरून बराच गोंधळ सुरू आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध विनोदी कलाकाराने वादग्रस्त विधान केल्यापासून सर्वत्र गदारोळ माजला आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 28, 2025 | 06:49 PM
Kunal Kamra: हायकोर्टाने दिलासा देताच कुणाल कामराने घेतला 'हा' मोठा निर्णय; मुंबई पोलिसांसमोर...

Kunal Kamra: हायकोर्टाने दिलासा देताच कुणाल कामराने घेतला 'हा' मोठा निर्णय; मुंबई पोलिसांसमोर...

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामराच्या नावावरून बराच गोंधळ सुरू आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध विनोदी कलाकाराने वादग्रस्त विधान केल्यापासून सर्वत्र गदारोळ माजला आहे.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंग्यात्मक भाष्य केल्याने कामरा  वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कुणाल कामराला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. दरम्यान, या कॉमेडियनने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याने अटकपूर्व जामीनासाठी मद्रास हायकोर्टात धाव घेतली होती.

कुणाल कामराने दाखल केलेल्या याचिकेवर मद्रास हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावर हायकोर्टाने कुणाल कामराला दिलासा दिला आहे. कामराला हायकोर्टाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्याला अंतरिम दिलासा देण्यात आला आहे. 7 एप्रिलपर्यंत कुणाल कामराला अटक न करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. त्यानंतर आता कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहे. 31 मार्च रोजी कुणाल कामरा हा चौकशीसाठी मुंबई पोलिसांसमोर हजर राहणार असल्याचे समजते आहे.

कुणाल कामराने स्वतःला निर्दोष घोषित केले

कुणाल कामराचे वकील व्ही. सुरेश यांनी न्यायमूर्ती सुंदर मोहन यांच्यासमोर तातडीने सुनावणीसाठी याचिकेचा उल्लेख केला. गुरुवारी रात्री उशिरा त्यांनी ई-फायलिंग सिस्टमद्वारे उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी कुणाल कामरा यांनी असा युक्तिवाद केला आहे की त्यांच्याविरुद्ध आरोप असलेल्या गुन्ह्यांमध्ये ते निर्दोष आहेत आणि त्यांना या प्रकरणात खोटे अडकवण्यात येत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचा वापर केल्याबद्दल एका कलाकाराला त्रास देणे, धमकावणे आणि सेन्सॉरशिप करणे अशी तक्रार कॉमेडियनने दाखल केली आहे.

Kunal Kamra Video Viral: ‘थाने की रिक्षा, चेहरे पे दाढी, आँखो में चष्मा..’; कुणाल कामराचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

कुणाल कामरावर हक्कभंग 

कुणाल कामरा विरोधात शिंदे गटासह महायुतीने आक्रमक पवित्रा घेतला. तर ठाकरे गटाने कुणाल कामरा याची बाजू उचलून धरली होती. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कुणाल कामराची कविता पुन्हा एकदा त्याच चालीमध्ये बोलून दाखवली होती. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. हेच सत्य असून ते बोलले तर का मिरच्या झोंबल्या असा सवाल देखील अंधारेंनी उपस्थित केला होता. यानंतर आता विधीमंडळामध्ये सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे.

कुणाल कामराचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विनोदी कलाकार कुणाल कामरा यांच्या टिप्पणीमुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे.  कॉमेडीच्या माध्यमातून त्याने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांची खिल्ली उडवली आहे. तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतराच्या नाट्यमय घडामोडींवर त्याने  विंडबनात्मक गाणे गायले आहे.या गाण्यात त्याने एकनाथ शिंदेंचे नाव न घेता गद्दार असा शब्द वापरला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानतर शिवसैनिकांनी त्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणाची तोडफोड करत त्याला इशारा दिला आहे. विशेष म्हणजे कुणाल कामराने हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावरून शेअरही केला आहे.

Web Title: Madras highcourt granted interin bail kunal kamra present at mumbai police eknath shinde controversial song case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2025 | 06:45 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Kunal Kamra
  • Madras High Court
  • Mumbai Police

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
2

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Big Breaking: मुंबईकर गुदमरले! मोनोरेल वाटेतच बंद; ऑक्सिजनशिवाय प्रवाशांचे…; रेस्क्यू ऑपरेशन सुरू
3

Big Breaking: मुंबईकर गुदमरले! मोनोरेल वाटेतच बंद; ऑक्सिजनशिवाय प्रवाशांचे…; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
4

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.