Photo Credit- Team Navrashtra कुणाल कामराचा एकनाथ शिंदेंना विनोदी भाषेत 'गद्दर' म्हणणारा 'तो' व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विनोदी कलाकार कुणाल कामरा यांच्या टिप्पणीमुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. कॉमेडीच्या माध्यमातून त्याने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांची खिल्ली उडवली आहे. तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतराच्या नाट्यमय घडामोडींवर त्याने विंडबनात्मक गाणे गायले आहे.या गाण्यात त्याने एकनाथ शिंदेंचे नाव न घेता गद्दार असा शब्द वापरला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानतर शिवसैनिकांनी त्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणाची तोडफोड करत त्याला इशारा दिला आहे. विशेष म्हणजे कुणाल कामराने हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावरून शेअरही केला आहे.
“थाने की रिक्षा, चेहरे पे दाढी, आँखो में चष्मा.. हाये एक झलक दिखलाए कभी, गुवाहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो, गद्दार नजर वो आए मंत्री नहीं वो दलबदलू है, और कहा क्या जाए जिस थाली में खाए, उसमे ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी मे मिल जाए तीर कमान मिला है इसको, बाप मेरा ये चाहें ” असं गाण त्याने गायलं आहे.
Kunal Kamra News: ‘गद्दार नजर वो आये…’; एकनाथ शिंदेंवर टिका
“शिवसेना भाजपमधून बाहेर पडली. मग शिवसेना शिवसेनेतून बाहेर पडली. मग राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून बाहेर पडली. एका मतदाराला ९ बटणे देण्यात आली. सगळे गोंधळले होते. पक्षाची सुरुवात एका व्यक्तीने केली होती. तो मुंबईच्या खूप मोठा जिल्हा ठाणे येथून येतो. त्यानंतर कुणाल “ठाणे की रिक्शा, चेहरे पर दाढ़ी, आंखो में चश्मा, मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजर वो आये…” असे गाणे गायले.
यानंतर कामरा म्हणाले, “हे त्यांचे राजकारण आहे. त्यांना कौटुंबिक कलह संपवायचा होता म्हणून त्यांनी कोणाचे तरी वडील चोरले. याचे उत्तर काय असेल? मी उद्या तेंडुलकरच्या मुलाला भेटू का, भाऊ, चला जेवूया. मी तेंडुलकरची प्रशंसा करतो आणि त्याला सांगतो, भाऊ, आजपासून तो माझा बाप आहे.” कुणाल कामराच्या या विंडबनात्मक टिकेनंतर शिंदे गटातील शिवसैनिकही आक्रमक झाले आहेत.
Devendra Fadnavis News: स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार …; कुणाल कामराला फडणवीसांनी फटकारलं
“स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे. पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. महाराष्ट्रातील जनतेने 2024 साली कोण गद्दार आणि कोण खुद्दार ते दाखवून दिलय. कोणाकडे स्वर्गीय हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विरासत आहे. हे जनतेने ठरवलेलं आहे, हे कामराला हे माहित असलं पाहिजे” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराला फटकारलं आहे. आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कुणाल कामराला सुणावलं आहे.