
महाबळेश्वरच्या वाहतूक कोंडीवर आता पार्किंगचा तोडगा !
महाबळेश्वरमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. मात्र, पर्यटकांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत शहरात पुरेशा वाहनतळांची उपलब्धता नसल्याने पर्यटन हंगामात शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. पार्किंगसाठी जागा शोधताना पर्यटकांची दमछाक होते, तर स्थानिक नागरिकांनाही वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. या परिस्थितीचा विचार करून महाबळेश्वर नगरपरिषदेच्या वतीने बस आगार परिसरात नवीन सार्वजनिक वाहनतळ विकसित करण्याची योजना पुढे आणण्यात आली आहे.
टाळ-मृदंगाच्या गजरात पुणे-अक्कलकोट पालखी मार्गस्थ; 750 तरुणांनी केला व्यसनमुक्तीचा संकल्प
उपमुख्यमंत्री तथा नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. एकनाथ शिंदे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. मकरंद पाटील यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान महाबळेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी शहरातील सध्याच्या पार्किंग समस्येचे गांभीर्य आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीची सविस्तर माहिती परिवहन मंत्र्यांसमोर मांडली. तसेच बस आगार परिसरात प्रस्तावित असलेल्या नवीन आणि आकर्षक सार्वजनिक वाहनतळाच्या लेआउट डिझाइनचे सादरीकरण केले. यावेळी आर्किटेक्ट स्वप्नील संकपाळ आणि संतोष टिपूगडे उपस्थित होते.
प्रस्तावित वाहनतळामुळे महाबळेश्वर शहरातील वाहनांची गर्दी नियंत्रित करण्यास मोठी मदत होणार आहे. पर्यटकांना नियोजनबद्ध पार्किंगची सुविधा उपलब्ध होईल, स्थानिक नागरिकांची गैरसोय कमी होईल आणि शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यास हातभार लागेल.
या बैठकीला परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव, MSRTC चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक (बांधकाम) तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांचे खाजगी सचिव उपस्थित होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. तसेच महाबळेश्वर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव नगरविकास आणि परिवहन विभागाकडे सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
“महाबळेश्वर शहरात पर्यटकांची संख्या वाढल्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या व पार्किंग व्यवस्था अपुरी पडत होती. मात्र पार्किंगचा प्रश्न सुटल्यामुळे महाबळेश्वर शहरात होणारी वाहतूक कोंडी कंट्रोल होणार आहे”, अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी महाबळेश्वर न.पा.योगेश पाटील यांनी दिली.
E20 पेट्रोलच्या गुणवत्तेवर बीपीसीएलचे स्पष्टीकरण; 893 नमुन्यांमध्ये इथेनॉलचे प्रमाण योग्य
Ans: महाबळेश्वर एसटी आगाराच्या जागेत भव्य सार्वजनिक वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
Ans: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
Ans: वाहनतळ उभारल्यास पर्यटकांच्या वाहनांसाठी नियोजित पार्किंगची सुविधा उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी होऊन वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.