Big Breaking: बांगलादेशींविरुद्ध महाराष्ट्र ATS ॲक्शन मोडमध्ये; 'या' शहरांमधून 17 जणांना अटक
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने राज्यात मोठी कारवाई केली आहे. मुंबई आणि अन्य ठिकाणी एटीएसने छापेमारी केली आहे. एटीएस सध्या बांग्लादेशी नगरिकाविरुद्ध कडक कारवाई करताना पाहायला मिळत आहे. आज केलेल्या छापेमारीमध्ये देखील एटीएसने अनेक बांग्लादेशी नागरिकांना अटक केली आहे. अवैधपणे भारतात येणाऱ्या आणि अनधिकृतपणे राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांवर एटीएसने कारवाई केली आहे.
महाराष्ट्र एटिएसने बांग्लादेशी नगरिकानाविरुद्ध अभियान सुरू केले आहे. नवीन मुंबई, ठाणे आणि सोलापूर शहरात मागील काही तासांमध्ये आम्ही ही कारवाई केल्याचे महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्याने सांगितले. एटीएसने महाराष्ट्रात आज छापेमारी करत 17 नागरिकांना अटक केली आहे. त्यामध्ये 7 पुरुष आणि 6 महिलांना अटक केली आहे.
बनावटओळखपत्र, मुंबईत अवैधरितत्या वास्तव्य: 7 बांगलादेशींना अटक
कल्याणच्या आय फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष राजेश दखिनकर यांच्या माहितीवरून डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी वैध कागदपत्रांशिवाय भारतात आलेल्या आणि डोंबिवलीत वास्तव्यास असलेल्या सहा बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वजण 15 दिवसांपूर्वी बांगलादेशातून आले होते आणि त्यातील काही एका कापड कंपनीत काम करत होते. मानपाडा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन बांगलादेशला परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बनावट ओळखपत्र आणि कागदपत्रांच्या सहाय्याने हे लोक भारतात आले आणि डोंबिवलीत राहत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
या कारवाईनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. डोंबिवलीसारख्या मोठ्या शहरात अवैध बांगलादेशी नागरिकांची संख्या सातत्याने वाढत आहे. वेळोवेळी बांगलादेशींच्या अशाच अटकेच्या घटना घडतात. मात्र ही समस्या काही संपत नाही. मानपाडा पोलिसांच्या या कारवाईमुळे या बांगलादेशी नागरिकांना शहरात कोण एन्ट्री देतंय, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
गेल्या आठवड्यातही 17 डिसेंबर रोजी कोळसेवाडी पोलिसांनी विठ्ठलवाडीच्या जुनी सोनिया कॉलनीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी जोडप्याला अटक करून तुरुंगात पाठवले होते. अंजुरा हसन (३७) आणि कमल हसन (४४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे गेल्या सात ते आठ वर्षांपासून भारतात बेकायदेशीरपणे राहत होते आणि रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत होते. काम केले होते.
हेही वाचा: Bangladeshis arrested in Mumbai: बनावट ओळखपत्र, मुंबईत अवैधरितत्या वास्तव्य: 7 बांगलादेशींना अटक
उल्लेखनीय आहे की, जुलै २०१७ मध्येही मानपाडा पोलिसांनी अडवली परिसरातून सहा बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. बनावट कागदपत्रांच्या आधारे तो येथे राहत होता. तसेच 2016 मध्ये कल्याण ग्रामीणच्या निलजे गावात अकरा बांगलादेशींना अटक करण्यात आली होती. ज्यामध्ये 8 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश होता.
कल्याण पूर्वेतील अडवली, ढोकळीसह कल्याण पूर्वेकडील चेतना, तसेच डोंबिवलीतील गोळवली आदी भागात बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्यास आहेत. ज्यामध्ये हॉटेल, लेडीज बारमध्ये वेटरचे काम, चिकन शॉप, नारळ पाणी आणि ज्यूस सेंटर यासारख्या व्यवसायांमध्ये त्यांचे अधिक सहकार्य आहे.