Maharashtra Breaking News
06 Oct 2025 10:24 AM (IST)
२ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या “कांतारा: चॅप्टर १” ने पहिल्या दिवशी भारतात ६० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर असाधारणपणे चांगली कामगिरी करत आहे, कलेक्शनच्या बाबतीत बॉलीवूडचा ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ चित्रपटाला मागे टाकून हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. “कांतारा: चॅप्टर १” ने रिलीजच्या चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे आपण जाणून घेणार आहोत.
06 Oct 2025 10:17 AM (IST)
ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत भारत अ संघाने अपवादात्मक कामगिरी केली. पहिल्या दोन सामन्यांनंतर मालिका १-१ अशी बरोबरीत होती. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जॅक एडवर्ड्सच्या संघाने ४९.१ षटकांत सर्व विकेट गमावून ३१७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारत अ संघाने केवळ ४६ षटकांत २ विकेट राखून सामना जिंकला. यासह, श्रेयस अय्यरच्या संघाने एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली.
06 Oct 2025 10:06 AM (IST)
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपूर्वी राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिल्यानंतर हालचालींना गती मिळाली आहे.
06 Oct 2025 10:00 AM (IST)
जागतिक बाजारातील उत्साहवर्धक संकेत असूनही, सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची कमकुवत सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,९६२ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ४४ अंकांनी कमी होता.
06 Oct 2025 09:50 AM (IST)
BBTak या लोकप्रिय शो बिग बॉस १९ शी संबंधित अपडेट्स शेअर करणाऱ्या ऑनलाइन पेजने त्यांच्या अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट या आठवड्यातील नामांकित स्पर्धकांची माहिती देते. या आठवड्यातील नामांकित स्पर्धकांमध्ये झीशान कादरी, नीलम गिरी, मृदुल तिवारी, बसीर अली, अशनूर कौर आणि प्रणीत मोरे यांचा समावेश आहे. परंतु, त्यापैकी कोणता स्पर्धक घराबाहेर येईल हे पाहणे बाकी आहे.
06 Oct 2025 09:40 AM (IST)
नवी मुंबई येथील ऐरोलीत एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मुख्याध्यापिकेने सार्वजनिकपणे रागावल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे आरोप तिच्या पालकांनी केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव अनुष्का शहाजी केवळे असे आहे. ती ऐरोलीतील सुशिलाबाई देशमुख विद्यालयात दहावी या वर्गात शिक्षण घेत होती. तिच्या या टोकाच्या निर्णयाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
06 Oct 2025 09:30 AM (IST)
भारतात 6 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,939 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,944 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,954 रुपये आहे. भारतात 6 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,09,440 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,19,390 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 89,540 रुपये आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 154.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,54,900 रुपये आहे.
06 Oct 2025 09:20 AM (IST)
महिला एकदिवसीय विश्वचषकाचा सहावा सामना काल पार पडला हा सामना कोलंबो येथील प्रेमादासा स्टेडियम वर खेळवण्यात आला. भारतीय महिला संघ विरुद्ध पाकिस्तान महिला संघ यांच्यामध्ये हा सामना झाला होता. या सामना भारताच्या संघाने 88 धावांनी विजय मिळवला. यामध्ये दीप्ती शर्मा आणि क्रांती गौड यांची कौतुकास्पद कामगिरी राहिली. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताच्या संघाने सुरुवातीपासूनच पाकिस्तानच्या संघावर दबदबा निर्माण केला होता
06 Oct 2025 09:10 AM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर भरमसाठ टॅरिफ लादून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र भारत सरकार या दबावासमोर झुकण्यास नकार देत आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारत-अमेरिका व्यापार करारावर भाष्य करताना स्पष्ट केले की, भारत आपले राष्ट्रीय हित जपूनच निर्णय घेईल.
अमेरिकेने सध्या भारतावर दोन प्रकारचे टॅरिफ लागू केले आहेत — पहिले परस्पर व्यापार शुल्क, आणि दुसरे रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्क. या निर्णयामुळे दोन्ही देशांतील व्यापार संबंधांवर ताण निर्माण झाला असून, पुढील काही दिवसांतील घडामोडींवर सर्वांचे लक्ष आहे.
06 Oct 2025 09:00 AM (IST)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रायबरेलीत मारहाणीत ठार झालेल्या दलित तरुणाच्या वडिलांशी आणि भावाशी परदेशातून दूरध्वनीवरून संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी, “या असह्य दुःखाच्या प्रसंगी आम्ही पीडित कुटुंबासोबत ठामपणे उभे आहोत,” असे सांगत कुटुंबाचे सांत्वन केले.
काँग्रेसच्या मीडिया आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “लिंचिंगची ही घटना हृदयद्रावक आहे. आपल्या शेवटच्या क्षणी, काठ्या आणि पट्ट्यांनी क्रूरपणे मारहाण होत असताना, त्या तरुणाची शेवटची आशा राहुल गांधी होते,” असेही त्यांनी नमूद केले.
06 Oct 2025 08:44 AM (IST)
नवी मुंबईतील दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (८ ऑक्टोबर) भव्य कार्यक्रमात होणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीला जोरदार वेग आला असून, सुमारे ५० हजार लोकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नवी मुंबई आणि परिसरातील नागरिकांमध्ये या कार्यक्रमाबाबत उत्साहाचे वातावरण आहे. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या विमानतळाच्या उद्घाटनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
06 Oct 2025 08:41 AM (IST)
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या तयारीला आता वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ३१ जानेवारीपूर्वी सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यानंतर प्रभाग रचना अंतिम करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती.
या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात मोठी घडामोड झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेच्या सर्व २२७ प्रभाग रचनेस मंजुरी दिली असून, अंतिम आराखडा शासन राजपत्रात आणि मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Marathi Breaking news live updates- महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर ८८ धावांनी शानदार विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. (INDW vs PAKW)
भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत २४७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानला विजयासाठी २४८ धावांचे आव्हान होते. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यासमोर पाकिस्तानी फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत आणि संपूर्ण संघ १५९ धावांवर गारद झाला. या विजयासह भारताने पाकिस्तानवर सलग १२व्यांदा मात केली असून, गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर पाकिस्तानचा संघ सहाव्या स्थानावर आहे.