Maharashtra Breaking News
04 Oct 2025 11:10 AM (IST)
जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कनिष्ठ निवासी डॉ. मोहित गादिया यांच्यावर उपचारादरम्यान रुग्णाच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. रुग्णालयात गर्दी केल्यामुळे डॉक्टरांनी नातेवाईकांना बाहेर जाण्यास सांगितले होते. त्याचा राग आल्याने काही नातेवाईकांनी डॉ. गादिया यांना कानशिलात लगावत खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत डॉक्टरांच्या कानाचा पडदा फाटला असून नाकातून रक्तस्त्रावही झाला आहे. पोलिसांनी दोघा संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.
04 Oct 2025 10:59 AM (IST)
गेल्या काही महिन्यांपासून सॅमसंगच्या पहिल्या ट्राय फोल्ड फोनबाबत प्रचंड चर्चा सुरु झाली आहे. हा स्मार्टफोन कधी लाँच होणार, त्याची किंमत किती असणार आणि त्याचे फीचर्स काय असणार याबाबत युजर्समध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या फोनबाबत आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. या अपडेटमध्ये फोनच्या लाँचिंग डेटबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे की, हा आगामी ट्राय फोल्ड फोन लवकरच लाँच केला जाणार आहे.
04 Oct 2025 10:55 AM (IST)
बीडमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका चार महिन्याच्या बाळाला पाण्याच्या बॅरेलमध्ये टाकून वडिलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना गेवराई तालुक्यातील तालवाडा येथील तहत रामनगर येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमोल हौसराव सोनवणे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने आधी आपल्याच चार महिन्याच्या बाळाला बॅरलमध्ये टाकून जीवे मारले. त्यांनतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली.
04 Oct 2025 10:50 AM (IST)
अलीकडील एका कार्यक्रमात गणेश नाईक यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव न घेता थेट शिंदे गटावर टीकेचे बाण सोडले. त्यांच्या या हल्लाबोलानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी नाईकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण आणखी तापले असून आगामी काळात या संघर्षाला कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
04 Oct 2025 10:43 AM (IST)
दिग्दर्शक राजेश मापुसकर यांच्या मास्टरक्लासपासून हंसल मेहता यांच्या पॅनेल डिस्कशनपर्यंत वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हल मध्ये काय काय घडलं याची चाहत्यांनाही नक्कीच उत्सुकता लागून राहिली आहे कारण वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलचा (WIFF) उद्घाटन सोहळा 2 ऑक्टोबरला अगदी मोठ्या दिमाखात पार असून ज्यामध्ये सिनेरसिक, इंडस्ट्रीतील जाणकार आणि स्वतंत्र फिल्ममेकर मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचा बघायला मिळालं.
04 Oct 2025 10:33 AM (IST)
एकीकडे अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढत आहेत, तर दुसरीकडे त्यांना आनंदाची बातमीही मिळत आहे. SBI कर्ज प्रकरणात त्यांना मुंबई उच्च न्यायालयातून धक्का बसला आहे. सर्व कायदेशीर अडचणींमध्येही त्यांना परदेशातून आनंदाची बातमी मिळत आहे. अनिल अंबानी परदेशात एक मोठा करार करणार आहेत. या करारामुळे त्यांच्या बँक खात्यात ₹१००,०००,०००,००० येणार आहेत.
04 Oct 2025 10:25 AM (IST)
वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही खराब झाली. मोहम्मद सिराजने ताजनारायण चंद्रपॉलला बाद करून पहिला ब्रेकथ्रू मिळवला. नितीश रेड्डीने एक शानदार कॅच घेतला. तत्पूर्वी, तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी शुभमन गिलने ४४८ धावांवर भारतीय डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. भारताने पाहुण्यांवर २८६ धावांची आघाडी घेतली आहे.
04 Oct 2025 10:22 AM (IST)
सप्टेंबरमध्ये टेक जायंट कंपनी Apple ने आयफोन 17 सीरीजसह अनेक नवीन प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. या प्रोडक्ट्सनंतर आता कंपनी पुन्हा एकदा नवीन प्रोड्क्टस लाँच करणार आहे. अशी माहिती समोर आली आहे की, कंपनी ऑक्टोबर महिन्यात 5 नवीन प्रोडक्ट्स लाँच करणार आहे. आगामी प्रोडक्ट्स Apple इकोसिस्टमच्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये लाँच केले जाणार आहेत. या आगामी प्रोड्क्समध्ये आयपॅडपासून नवीन Apple टिव्हीपर्यंत अनेक प्रोड्क्टसचा समावेश असणार आहे. कंपनी या महिन्यात कोणते नवीन प्रोडक्ट्स लाँच करणार आहे, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.
04 Oct 2025 10:11 AM (IST)
टीम इंडियाने स्पष्ट केले होते की ते पाकिस्तान बोर्डाचे प्रमुख आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत. परिणामी नक्वी ट्रॉफी घेऊन पळून गेले आणि सोशल मीडियाने त्यांना ट्रॉफी चोर म्हटले. या उघड अपमानानंतरही, पाकिस्तानमध्ये त्यांचा सन्मान होणार आहे. आता ट्रॉफी घेऊन पळून गेल्याबद्दल त्यांना सुवर्णपदक मिळणार आहे. अनेक लोकप्रिय पाकिस्तानी नेते देखील या समारंभात सहभागी होतील.
04 Oct 2025 09:59 AM (IST)
अमरावती: अमरावतीच्या परतवाड्यात मुंबई, नागपूर आणि अमरावती क्राईम ब्रांच पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. ती कारवाई म्हणजे पोलिसांनी दोन ठिकाणाहून १३ जणांना अटक करण्यात आली होती. यात आंतरराष्ट्रीय बिश्रोई गॅंगशी संबंधित एक आरोपी असल्याचा पोलीसांना माहिती मिळाली होती. मात्र तपासाअंती पोलिसांनी पकडण्यात आलेल्या सर्व संशयितांना सोडण्यात आलं. म्ह्णून हि कारवाई फसली का? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.
04 Oct 2025 09:50 AM (IST)
कलर्सचा वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १९’ हा हाय-व्होल्टेज ड्रामापासून मुक्त होणे अशक्य आहे. या स्पर्धकांना कितीही समजावून सांगितले तरी ते त्यांच्या कृत्यांपासून मागे हटत नाहीत. अशा परिस्थितीत सलमान खान हा एकमेव असा व्यक्ती आहे ज्याच्याकडे त्यांना हाताळण्याची ताकद आहे. हे सर्व स्पर्धक बॉलिवूडच्या दबंग खानसमोरही सरळ होतात. या वीकेंड का वारमध्ये, सलमान खान ज्यांनी सुधारणा केली नाही त्यांनाही सुधारेल. या आठवड्यात सलमान खान ‘बिग बॉस १९’ च्या सहा स्पर्धकांना एकामागून एक फटकारण्याची शक्यता आहे.
04 Oct 2025 09:40 AM (IST)
बिबट्या हा जंगलाचा एक धोकादायक शिकीरी आहे, त्याच्या शिकारीने संपूर्ण जंगल हादरतं. पण मानवी वस्तीत मात्र त्याचा काही टिकाव लागला नाही. बिबट्याने जेव्हा पहिल्यांदा मानवी वस्तीत एंट्री घेतली तेव्हा त्याचे असे हाल केले की जन्मभर त्याला ते विसरता येणार नाही. जंगलाचा शिकारी एका महिलेच्या घराबाहेर गेला आणि तिथेच त्याचा अनोखा स्वागतसमारंभ झाला. महिलेने शिकाऱ्याची अशी हालत केली की पाहणारे पाहतंच राहिले. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
04 Oct 2025 09:30 AM (IST)
Earthquake in Pakistan: भारताच्या शेजारील देश पाकिस्तानमध्ये नैसर्गिक आपत्तींनी लोकांना त्रास देत आहे. पुराचे संकट अद्याप कमी झालेले नाही आणि वारंवार येणाऱ्या भूकंपांमुळे आता घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी पहाटे १:५९ वाजता ४.५ रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवण्यात आला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, भूकंपाचे केंद्र जमिनीपासून सुमारे १० किलोमीटर खाली होते.
04 Oct 2025 09:20 AM (IST)
मुंबई: मुंबईतून एक धक्कदायक प्रकार समोर आलं आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत नृत्यांगना म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीवर बलात्काराची खळबळजनक घटना घडली आहे. आरे पोलिसांनी २२ वर्षीय नृत्य प्रशिक्षक आणि इव्हेंट ऑर्गनायझर असलेल्या तरुणाला याप्रकरणी अटक केली आहे. हा प्रकार सहा महिन्यांपूर्वी घडला होता. आता या घटनेची तक्रार दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे.
04 Oct 2025 09:10 AM (IST)
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दोन सामन्याची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. पहिल्या इंनिगमध्ये भारताच्या संघाने वेस्ट इंडिजच्या संघाला सर्वबाद करुन भारताचा संघ मागील दोन दिवसांपासून फलंदाजी करत आहे. भारताच्या संघाने या मालिकेमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाला पराभूत केले तरी संघ हा WTC पाॅइंट टेबलमध्ये फायदा होणार की नाही यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
04 Oct 2025 08:58 AM (IST)
मुंबई: भाषा ही संस्कृती जिवंत ठेवण्याचे माध्यम आहे. देशातील प्रत्येक भाषेने सांस्कृतिक ठेव दिलेली आहे. या सांस्कृतिक उत्थानात भाषेचे महत्त्व असल्याने मातृभाषा आणि इतर भाषांना जिवंत ठेवण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आपली मराठी भाषा ही कालही अभिजात होती, आजही अभिजात आहे, आणि उद्याही अभिजातच राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठीचा सन्मान हा आपल्या सर्वांचा सन्मान आहे. गावा-गावांतून, घरा-घरांतून ज्या ओव्या गायल्या, त्या माऊलीचा, रामप्रहारी येणाऱ्या वासुदेवांचा, देवळातून गुंजणाऱ्या आरतीचा, भजन-कीर्तनाचा, संतपरंपरेचा, शाहिरांच्या पोवाड्याचा हा सन्मान आहे. संत ज्ञानेश्वरांच्या भावार्थ दीपिकेपासून ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वचिंतनापर्यंत अशा सर्वच विचारवंतांचा हा सन्मान आहे.
04 Oct 2025 08:57 AM (IST)
भारताचा अ संघ सध्या ऑ्स्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामना खेळत आहे. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा सध्या देशासाठी खेळण्यात व्यस्त आहे. पण या व्यस्त वेळापत्रकामुळे त्याला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या कौटुंबिक सोहळ्याला मुकावे लागले. ३ ऑक्टोबर रोजी त्याची मोठी बहीण कोमल शर्मा लग्नबंधनात अडकली, परंतु त्याचा धाकटा भाऊ अभिषेक या खास दिवशी तिच्यासोबत उपस्थित नव्हता. त्याने देशासाठी मोठा त्याग केला आणि टीम इंडियासाठी फलंदाजी करण्यासाठी आला, पण तो निराश झाला.
04 Oct 2025 08:57 AM (IST)
भारतात आज 4 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,852 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,864 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,889 रुपये आहे. भारतात 3 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,868 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,879 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,901 रुपये होता.
Marathi Breaking news live updates : समुद्राच्या खोलवर लपलेल्या रहस्यांच्या कथा नेहमीच रोमांचक असतात. अमेरिकेतील फ्लोरिडा किनाऱ्यावरील Divers नी ३०० वर्षे जुन्या जहाजाच्या ढिगाऱ्यातून १,००० हून अधिक सोन्या-चांदीची नाणी शोधून काढली आहेत. हे तेच जहाज आहे जे ऐतिहासिकदृष्ट्या “Treasure Fleet” म्हणून ओळखले जाते. १७१५ मध्ये, हे स्पॅनिश जहाज वादळात बुडाले आणि लाखो रुपयांचा खजिना सोबत घेऊन गेले. या शोधामुळे पुन्हा एकदा ३०० वर्षे जुन्या दुर्घटनेला पुन्हा जिवंत केले आहे.
वाचा सविस्तर- 300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले