पुणे: पुण्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. ड्युटी संपवून घरी जात असतांना दोन व्यक्तीने पोलिसांवर कोयत्याने वार केला आहे. ही घटना लॉ कॉलेजरोडवर काल रात्री १ वाजताच्या सुमारास घडली आहे. आता पुन्हा पोलिसचं असुरक्षित आहे की काय? असा प्रश्न उपस्तिथ होत आहे.
नेमकं काय घडलं?
रात्री एक वाजताच्या सुमारास आपली ड्युटी संपवून घरी जात असतांना लॉ कॉलेजरोडवर बाईक वरून जाणाऱ्या दोघांनी गुन्हे शाखा युनिट युनीट-3 मध्ये काम करणाऱ्या अमोल काटकर यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. प्राथमिक माहितीनुसार कट मारल्याच्या वादात हा प्रकार घडला आहे. या घटनेत काटकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कोयता हल्ला करणाऱ्यांना पोलीस शोध घेत आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही घटना रात्री एक वाजताच्या सुमारास घडली आहे.
कट मारण्याच्या वादातून…
प्राथमिक माहितीनुसार, कट मारण्याच्या वादातून हा हल्ला झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात पोलीस अमोल काटकर गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आरोपी कोण होते आणि त्यांचा हेतू नेमका काय होता, याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. सतत खून, हाणामाऱ्या, लुटमार, दरोडे, धमक्या, दहशत माजवणे अश्या अनेक घटना समोर येत आहे. आता पुण्यात पोलिसचं असुरक्षित आहे की काय असं सवाल आता विचारण्यात येत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रकारांमुळे सामान्य नागरिकांसह पोलिसांनाही सुरक्षितता नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यासारख्या मोठ्या आणि सुरक्षित शहरातसुद्धा पोलिसांवरच हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये भयाचं वातावरण आहे. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या घटनेमुळे पोलिस यंत्रणेसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
प्रकरण मिटविण्यासाठी 2 लाख रुपये दे, नाहीतर मी…; पुण्यात मिठाई विक्रेत्याला महिलेची धमकी
सोशल मिडीयाच्या माध्यमातून झालेली ओळख एका मिठाई विक्रेत्याला चांगलीच महागात पडली. महिलेने मिठाई विक्रेत्याला धमकावून त्याच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ४७ वर्षीय विक्रेत्याने फरासखाना पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार स्नेहा मोहित कदम (वय ३०, रा. सांगली) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.