Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Cabinet Decision : मंत्रिमंडळ बैठकीत ६ महत्त्वाचे निर्णय; नोकऱ्या अन् या शहरांसाठी कोट्यवधींचा निधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. मात्र या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा दांडी मारली. त्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 18, 2025 | 04:22 PM
मंत्रिमंडळ बैठकीत ६ महत्त्वाचे निर्णय; नोकऱ्या अन् या शहरांसाठी कोट्यवधींचा निधी

मंत्रिमंडळ बैठकीत ६ महत्त्वाचे निर्णय; नोकऱ्या अन् या शहरांसाठी कोट्यवधींचा निधी

Follow Us
Close
Follow Us:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. मात्र या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा दांडी मारली. त्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्याची मान्यताही देण्यात आली आहे. त्याशिवाय जळगाव, पुणे यासह इतर जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Tanaji Sawant Security: फडणवीसांचा एक आदेश अन् तानाजी सावंतांचा सरकारी लवाजमा गायब; आता 48 नव्हे तर केवळ…

जलसंपदा विभाग, गृह विभाग, वित्त विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागासाठी सहा निर्णय घेण्यात आले आहे. फडणवीस सरकारकडून डान्स बारचा कायदा आणि इतर आज मोठे निर्णय घेण्याची शक्यता होती. पण तसा कोणताही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आलेला नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. 👉 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) ✅म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर… — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 18, 2025

मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

• म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १ हजार ५९४ कोटींची मान्यता. या योजनेतून अवर्षण प्रवण भागात १ लाख ८ हजार १९७ हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग)

• अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता (ANTF) ३४६ नवीन पद निर्मिती व त्यासाठीच्या खर्चास मान्यता.(गृह विभाग)

• सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता. (वित्त विभाग)

• राज्यातील रोपवेच्या कामांसाठी राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. (NHLML) ला आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग)

Rohit Pawar On Operation Tiger: ‘ऑपरेशन टायगर’वरून रोहित पवारांची शिवसेनेवर टीका; म्हणाले, “पुढे जाऊन मांजर अन्…”

• जळगांव जिल्ह्यामधील चाळीसगांव तालुक्यातील वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या १ हजार २७५ कोटी ७८ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता. चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील ८ हजार २९० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग)

• पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन देण्यास मंजूरी. (महसूल विभाग)

Web Title: Maharashtra cabinet decision mahayuti government takes 6 major decisions under cm fadnavis leadership marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 03:28 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Cabinet Decision
  • Mahayuti Government

संबंधित बातम्या

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”
1

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Devendra Fadnavis: “सायबर फसवणूक तक्रारीसाठी…”; देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन
3

Devendra Fadnavis: “सायबर फसवणूक तक्रारीसाठी…”; देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांचे मराठी भाषेबाबत महत्वाचे विधान; म्हणाले, “… हा आपल्या सर्वांचा सन्मान”
4

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांचे मराठी भाषेबाबत महत्वाचे विधान; म्हणाले, “… हा आपल्या सर्वांचा सन्मान”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.