मुंबई: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल (16 डिसेंबर) नागपूरमधील (Nagpur) राजभवनावर थाटामाटात पार पडला. महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. पण मंत्र्यांच्या शपथविधीनंतर अनेक आमदारांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. आमदारांच्या नाराजीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर खुलासे केले. महायुतीच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी आम्ही अडीच वर्षांचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरवला असल्याचा खुलासा केला.
एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही अडीच अडीच वर्षांचं मंत्रिपद ठरवले आहे. त्यामुळे पक्षांत इतर नेत्यांना संधी मिळू शकेल, जो काम करेल त्याला संधी मिळणार, ज्या मंत्र्याला जो विभाग मिळेल त्याने तिथे काम पूर्ण करून दाखवायचे, जो परफॉर्म करेल त्याला संधी मिळेल. त्यानंतर भाजपमध्येही असेच अडीच वर्षांच मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलाय का, असा प्रश्न विचारला असता, फडणवीस म्हणाले, य आम्ही प्रत्येक मंत्र्याचा परफॉर्मन्स ऑडिट करू आणि त्यानंतर निर्णय घेऊ.
Portfolio Allocation: मंत्रिमंडळ विस्तार तर झाला…; आता खातेवाटप कधी?
मंत्री आपल्या विभागात योग्य पद्धतीने काम करत नाही,असे ऑडिटमध्ये लक्षात आले तर त्यावेळी त्या मंत्र्याचा पुनर्विचार केला जाईल. ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही, त्यांना पक्षाकडून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातील. भाजपमध्ये ज्यांना मंत्रिपद दिले जात नाही. त्यांना पक्षाकडून वेगळी जबाबदारी देण्याचे निर्णय झालेले असतात. पण जे मंत्री ड्रॉप झाले आहेत त्यातील काही लोक परफॉर्मन्स नसल्यामुळेच ड्रॉप झालेले असतात, असंही फडणीसांनी स्पष्ट केलं
दरम्यान, आजपासून 16 डिसेंबरपासून विधीमंडळाच्या अधिवेशनाला सुरूवात होत आहे. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, आगामी विधानसभेच्या अधिवेशनात 20 विधेयके मांडण्यात येणार असून, ही विधेयके राज्याच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी महत्त्वाची ठरणार आहेत.
आज 16 डिसेंबर 1971 च्या युद्धाची आठवण करून देणारा विजय दिवस; भारतापासून ते
पण दुसरीकडे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षांनी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला होणाऱ्या चहापानावर बहिष्कार टाकला. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, विरोधक गेल्या काही वर्षांपासून तेच जुने मुद्दे उपस्थित करत आहेत. आता विरोधकांनी एकच नवीन मुद्दा जोडला आहे, तो म्हणजे ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) च्या गैरवापराचा आरोप. “EVM म्हणजे ‘Every Vote for Maharashtra’. जर विरोधक आम्हाला ‘EVM सरकार’ म्हणत असतील तर आम्ही ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’साठी उभे आहोत, हे सांगायला मला अभिमान वाटतो. आपले सरकार राज्याच्या विकासासाठी कठोर परिश्रम घेत असून जनतेच्या पाठिंब्याने आगामी निवडणुकीत मोठे यश मिळवू. असंही त्यांनी स्पष्ट केलं.