मुंबई: “मी देवेंद्र गंगाधर फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतो की….” आवाज घुमला आणि आझाद मैदानात जल्लोषाचा एकच आवाज झाला. देवेंद्र फडणवीसांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गेल्या पाच वर्षांपासून भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि देवेंद्र फडणवीसांचे चाहते ज्या क्षणाची वाट पाहत होते. तो क्षण अखेर सत्त्यात उतरला. संपूर्ण आझाद मैदानात जमलेले लोक स्तब्ध होऊन फडणवीसांचा शपथविधी पाहत होते. अखेर महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा भव्यदिव्य शपथविधी पार पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज (5 डिसेंबर) महराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शपथविधी कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर आझाद मैदानावर महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
महायुतीच्या शपथविधीसाठी गेल्या चार-पाच दिवसांपासून महायुतीच्या शपथविधीची तयारी सुरू झाली होती. अनेक ऐतिहासिक घटनाचा साक्षीदार असलेल्या आझाद मैदानावर महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आयोजित कऱण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक दिग्गज नेते यावेळी व्यासपिठावर उपस्थित होते. इतकेच नव्हे तर, बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान, सलमान खान, संजय दत्त, अभिनेत्री माधुरी दिक्षित यादेखील या सोहळ्यासाठी दाखल झाला होता. शपथविधीसाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आईचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांना त्यांच्या आईने औक्षण करून टिळा लावला अन् आशीर्वाद दिले.
Share Market: सकाळच्या पडझडीनंतर शेअर बाजाराचा जोरदार कमबॅक; नेमके काय आहे
गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठे बदल झाले आहेत, विशेषत: भाजपच्या राजकारणात लोकसभेतील पराभवानंतरही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत राहिली. अनेकदा फडणवीस यांना दिल्लीला पाठवायचे, त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवायचे, केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट करायचे, अशी चर्चाही सुरू झाल्या. पण त्याचकाळात फडणवीसांनी आपले डाव टाकण्यास सुरूवात केली होती. लोकसभेतील पराभवानंतर दुखावलेल्या फडणवीसांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्क साधत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी आरएसएसलाही विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी काम करण्याचे आवाहन केले. लोकसभा निवडणुकीच्या काळात संघ सक्रिय नव्हता. फडणवीस यांच्या सभांनंतर संघाची टीम सक्रिय झाली. निवडणुकीतील प्रत्येक छोट्या मोठ्या बैठकांपासून मोठमोठ्या सभांपर्यंत फडणवीस आणि भाजपने मायक्रो नियोजन केले होते. निवडणुकीच्या दिवसापर्यंत भाजप मैदानात काम करत होती.
Maharashtra CM Oath Ceremony Live : थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपचे नेतृत्त्व म्हणून पाहिले जायचे. पण मधल्य काळात हे नेतृत्त्व बदलाच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. पण भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि संघाच्या हस्तक्षेपामुळे भाजपची लगाम देवेंद्र फडणवीस यांच्या हाती राहिली. विधानसभा निवडणुकीच्या काळातही एकनाथ शिंदे यांचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाशी वाढता संपर्क आणि अजित पवार यांची नाराजी या सर्वात भाजपमधूनच फडणविसांच्या विरोधात सक्रीय असलेला गट या सगळ्याचा सामना करत देवेंद्र फडणवीस स्वतःला केंद्रस्थानी ठेवण्यात यशस्वी झाले. निवडणुकीच्या जागावाटपात महायुतीमध्ये वाटाघाटी करून जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवण्यात भाजपला यश आले. अखेर फडणवीसांच्या मेहनत फळाला आली आणि विधानसभा निवडणुकीत भाजप अभूतपूर्व बहुमताने विजयी झाली.
पण यानंतरही फडणवीसांचा संघर्ष सुरूच होता. मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांची तळमळ आणि नाराजी कायम होतीच. निकालानंतरही दोन आठवड्यांपर्यंत भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचे नाव जाहीर कऱण्यात आले नाही. त्यामुळेही राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा पेच वाढला होता. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत विनोद तावडे यांच्यापासून मुरलीधर मोहोळांपर्यंत अनेकांची नावे आली. पण या सर्वांना मागे टाकत आज फडणवींसांच्या मुख्यमंत्रिपदाची घोषणा झाली.