सेन्सेक्समध्ये 1,165.36 अंकांची तर निफ्टीमध्ये 392.10 अंकांची घसरण; वाचा... का होतीये बाजाराची घसरगुंडी!
आज सकाळी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात निराशादायक झाली मात्र काही वेळात बाजारात बदल झाला आणि शेअर बाजार कमालीचा वधारला. सेन्सेक्सने तब्बल 82 हजारांचा टप्पा ओलांडला तर निफ्टीनेही मोठी उसळी घेत 24800 चा टप्पा पार केला होता. मात्र शअर बाजार बंद होण्यापूर्वी काही वेळा अगोदर बाजारात थोडीशी घसरण पाहायला मिळाली आणि सरतेशेवटी बीएसई निर्देशांक सेन्सेक्स 809 अंकांच्या वाढीसह 81,765 स्तरावर बंद झाला. त्याच वेळी एनएसई निर्देशांक निफ्टी सुमारे 241 अंकांची उसळी घेत 24708 वर बंद झाला. शेअर बाजारातील वाढीचे कारण काय हे लक्षात घेऊया.
रिझर्व्ह बॅंक
अमेरिकेतील चांगल्या बातमीमुळे भारतातील देशांतर्गत अर्थव्यवस्थाही उत्तम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिझर्व्ह बँक ही 6 डिसेंबरला दर कपातीचे संकेत देऊ शकते, असे बाजार गृहीत धरत आहे. रेपो दर कमी केला नाही तरी भविष्यात व्याजदर कमी होण्याचा मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विदेशी गुंतवणूकदार
विदेशी संस्थागत गुंतवणूकदार हे या महिन्याच्या सुरुवातीपासूनच निव्वळ खरेदीदार बनले असल्याचे दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून निव्वळ विक्री करणाऱ्या एफआयआयने ( Foreign Institutional Investor) काल बुधवारी 1798 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. मंगळवारी परदेशी गुंतवणूकदारांनी 3665 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. हा चढता ट्रेंड या महिन्यात पाहायला मिळत आहे. मात्र मागील दोन महिन्यात परिस्थिती या उलट होती. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये एफआयआयने भारतीय बाजारातून तब्बल १.६ लाख कोटी रुपये काढून घेतले होते.
सर्वाधिक कमाई करणारा स्टॉक
निफ्टीवरील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या शेअर्समध्ये ट्रेंट पहिल्या स्थानावर आहे. ट्रेंटचा शेअर 3.31 टक्क्यांनी वाढला आणि 7,074.95 अंकांवर बंद झाला आहे. इन्फोसिसच्या शेअर्समध्ये 2.42 टक्क्यांनी वाढ झाली. त्यानंतर टीसीएस 2.31 टक्क्यांनी वाढ झाली, टायटनचे शेअर्स 2.19 ट्क्क्यांनी वधारले तर डॉ. रेड्डी च्या शेअर्समध्ये 2.18 ट्क्क्यांनी वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्या शेअर्सधारकांना आज फायदा मिळाला आहे.
‘या’ शेअर्समध्ये झाली घसरण
एसबीआय लाईफ, एचडीएफसी लाईफ, बजाज ऑटो, एनटीपीसी आणि ग्रासिम या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. एसबीआय लाईफच्या शेअर्समध्ये सर्वात जास्त घसरण झाली कंपनीचे शेअर्स 1.21 टक्क्यांनी घसरले. एचडीएफसी लाईफचे शेअर्स हे 1.09 टक्क्यांनी घसरले तसेच बजाज ऑटोच्या शेअर्समध्ये 1.05 टक्क्यांची घसरण झाली. एनटीपीसीच्या शेअर्समध्ये 0.90 ट्क्क्यांची घसरण पाहायला मिळाली तर ग्रासीमच्या शेअर्समध्ये 0.38 टक्के घसरण झाली आहे.
उद्या आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने आता उद्याही देशांतर्गत शेअर बाजार वधारलेला राहिल्यास या महिन्याच्या पहिल्या आठवड्या शेअर बाजाराची कामगिरी अत्यंत उत्तम होणार आहे.