Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Davos News : दावोसमध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट; 4,99,321 कोटींचे सामंजस्य करार

दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे काल रात्री उदघाटन झालं. त्यानंतर आज पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी 4 लाख 99 हजार 321 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 21, 2025 | 10:30 PM
दावोसमध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट; 4,99,321 कोटींचे सामंजस्य करार

दावोसमध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट; 4,99,321 कोटींचे सामंजस्य करार

Follow Us
Close
Follow Us:

दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे काल रात्री उदघाटन झालं. त्यानंतर आज पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी 4 लाख 99 हजार 321 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. यातून सुमारे 92,235 इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. यातील एकच करार 3 लाख कोटींचा असून हा जेएसडब्ल्यू यांच्यासोबत करण्यात आला असून, तो स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स इत्यादी क्षेत्रात करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट देणारा हा करार असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. जेएसडब्ल्यूचे सज्जन जिंदाल यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. उद्योगमंत्री उदय सामंत आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते.

आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस आहे. दावोसमध्ये बाहेर बर्फ पडतो आहे. पण, येथे आतमध्ये गुंतवणुकीचा ओघ येत असल्याने गर्मी आहे, असे सांगताना ते म्हणाले, महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ची प्रक्रिया अतिशय वेगवान आणि तितकीच सहजसोपी प्रक्रिया आहे. गुंतवणूकदारांच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्रात एकदा याल तर पुन्हा तुम्ही बाहेर जाणार नाही, असे मी त्यांना सांगितले, असे सज्जन जिंदाल यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, आज दावोसमध्ये पहिला करार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, त्याप्रमाणे राज्यातील शेवटच्या नाही, तर पहिला जिल्हा असलेल्या गडचिरोलीसाठी झाला. कल्याणी समूहासोबत संरक्षण, स्टील, ईव्ही क्षेत्रासाठी हा करार झाला. यात गुंतवणूक 5200 कोटी रुपयांची असून 4000 रोजगार निर्मिती होणार आहे. आज झालेले सामंजस्य करार हे कल्याणी समूह, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, बालासोर अलॉय लि., विराज प्रोफाईल्स प्रा. लि., एबी इनबेव, जेएसडब्ल्यू, वारी एनर्जी, टेम्बो, एलमाँट, ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी, अवनी पॉवर बॅटरिज, जेन्सॉल, बिसलरी इंटरनॅशनल, एच टू पॉवर, झेड आर टू, ब्ल्यू एनर्जी मोटर्स, इस्सार, बुक माय शो, वेल्स्पून इत्यादी कंपन्यांचा समावेश असून, लॉजिस्टिक, ऑटोमोबाईल्स, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, पायाभूत सुविधा, करमणूक, हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आदी क्षेत्रातील हे करार आहेत.

फ्युएलची पुण्यात संस्था

यातील एक करार फ्युएल अर्थात फ्रेंडस युनियन फॉर एनर्जायझिंग लाईव्हज यांच्याशी करण्यात आला असून, ते महाराष्ट्रातील 5000 युवकांना आर्टिफिशियल इंटिलिजन्स, डिजिटल मार्केटिंग आणि बिझनेस अ‍ॅनालिटिक्स या क्षेत्रात प्रशिक्षित करणार आहेत. फ्युएल स्किलटेक युनिव्हर्सिटी पुण्यात स्थापन करण्याचा मनोदय सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे.

सामंजस्य करारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे…

(टीप : ही यादी भारतीय वेळेनुसार सायं. 8.30 पर्यंत)

आतापर्यंत झालेले सामंजस्य करार

एकूण : 4,99,321 कोटींचे

1) कल्याणी समूह

क्षेत्र : संरक्षण, स्टील, ईव्ही

गुंतवणूक : 5200 कोटी

रोजगार : 4000

कोणत्या भागात : गडचिरोली

2) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.

क्षेत्र : संरक्षण

गुंतवणूक : 16,500 कोटी

रोजगार : 2450

कोणत्या भागात : रत्नागिरी

3) बालासोर अलॉय लि.

क्षेत्र : स्टील आणि मेटल्स

गुंतवणूक : 17,000 कोटी

रोजगार : 3200

4) विराज प्रोफाईल्स प्रा. लि.

क्षेत्र : स्टील आणि मेटल्स

गुंतवणूक : 12,000 कोटी

रोजगार : 3500

कोणत्या भागात : पालघर

5) एबी इनबेव

क्षेत्र : अन्न आणि पेये

गुंतवणूक : 750 कोटी

रोजगार : 35

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

6) जेएसडब्ल्यू समूह

क्षेत्र : स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स

गुंतवणूक : 3,00,000 कोटी

रोजगार : 10,000

कोणत्या भागात : नागपूर/गडचिरोली

7) वारी एनर्जी

क्षेत्र : हरित ऊर्जा, सौर उपकरणे

गुंतवणूक : 30,000 कोटी

रोजगार : 7500

कोणत्या भागात : नागपूर

8) टेम्बो

क्षेत्र : संरक्षण

गुंतवणूक : 1000 कोटी

रोजगार : 300

कोणत्या भागात : रायगड

9) एल माँट

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 2000 कोटी

रोजगार : 5000

कोणत्या भागात : पुणे

10) ब्लॅकस्टोन

क्षेत्र : माहिती तंत्रज्ञान

गुंतवणूक : 25,000 कोटी

रोजगार : 1000

कोणत्या भागात : एमएमआर

11) ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी

क्षेत्र : डेटा सेंटर्स

गुंतवणूक : 25,000 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : एमएमआर

12) अवनी पॉवर बॅटरिज

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स

गुंतवणूक : 10,521 कोटी

रोजगार : 5000

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

13) जेन्सोल

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स

गुंतवणूक : 4000 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

14) बिसलरी इंटरनॅशनल

क्षेत्र : अन्न आणि पेये

गुंतवणूक : 250 कोटी

रोजगार : 600

कोणत्या भागात : एमएमआर

15) एच टू ई पॉवर

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 10,750 कोटी

रोजगार : 1850

कोणत्या भागात : पुणे

16) झेड आर टू समूह

क्षेत्र : ग्रीन डायड्रोजन अँड केमिकल्स

गुंतवणूक : 17,500 कोटी

रोजगार : 23,000

17) ब्ल्यू एनर्जी मोटर्स

क्षेत्र : ऑटोमोबाईल्स, ईव्ही

गुंतवणूक : 3500 कोटी

रोजगार : 4000

कोणत्या भागात : पुणे

18) इस्सार (ब्ल्यू एनर्जीसोबत सहकार्याने)

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 8000 कोटी

रोजगार : 2000

19) बुक माय शो

क्षेत्र : करमणूक

गुंतवणूक : 1700 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : एमएमआर

20) वेल्स्पून

क्षेत्र : लॉजिस्टीक

गुंतवणूक : 8500 कोटी

रोजगार : 17,300

 

Web Title: Maharashtra development will get boost after signing mous worth rs 499321 crore in davos conference said cm devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 10:30 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis

संबंधित बातम्या

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
1

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ
2

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा
3

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पसायदानाद्वारे अखिल…”;
4

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पसायदानाद्वारे अखिल…”;

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.