Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis : ‘संविधान हातात घेऊन संविधानालाच नकार..,’ दिल्लीतील आंदोलनावरून फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

Devendra Fadnavis : MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केलं जात असल्याचा आरोप करत त्यांनी MPSC अध्यक्षांच्या नियुक्ती आणि हटवण्याबाबत संविधानातील Article 317 चा दाखला दिला.

  • By विवेक
Updated On: Oct 06, 2026 | 04:48 PM
Devendra Fadnavis on Rahul Gandhi

Devendra Fadnavis on Rahul Gandhi

Follow Us
Follow Us:
  • “विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण”; फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा
  • MPSC अध्यक्षांना हटवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही; Article 317 चा फडणवीसांनी दिला दाखला
  • “भारतातील सगळ्या लोकशाही संस्था संपवा, अशा टोकाच्या पातळीवर राजकारण सुरू” – फडणवीस
 

Devendra Fadnavis : राज्यात MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. तसेच दिल्लीतदेखील INDIA आघाडीच्या आंदोलनामुळेदेखील देशभर चर्चा रंगू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

संविधानाने तयार केलेल्या संस्थांवरच लोकांचा विश्वास उडवण्याचं काम सुरू असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. त्यानंतर संविधान तुम्हाला न्याय देऊ शकत नाही, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही ते म्हणाले. राजधानी दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचा संदर्भ देत फडणवीसांनी ही टीका केली.

फडणवीसांचा राहुल गांधींवर घणाघात

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “भारताच्या संविधानाने तयार केलेल्या सर्व संस्था कुचकामी आहेत, अशी भावना समाजात रुजवण्याचं काम सुरू आहे. त्यानंतर संविधान तुम्हाला न्याय देऊ शकत नाही, असा संदेश दिला जाईल,” असा दावा त्यांनी केला. “म्हणून संविधान हातात घेऊन काम सुरू आहे,” असं म्हणत फडणवीसांनी दिल्लीत सुरू असलेल्या राहुल गांधींच्या आंदोलनावर भाष्य केलं.

INDIA Alliance EC March: भाजपला नेस्तनाबूत करणार, मोदी, शाह, भागवतांनी देशद्रोह केला; राहुल गांधींचे खुले आव्हान

“विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण”

पुण्यातील MPSC आंदोलनाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत पूर्णपणे सकारात्मक आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतले आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलं राजकारण केलं जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.

“भारतातील सगळ्या लोकशाही संस्था संपवा”, अशा टोकाच्या पातळीवर हे राजकारण सुरू असल्याचं फडणवीसांनी म्हटलं. राजकारणाला उत्तर राजकारणानेच दिलं जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

MPSC अध्यक्षांबाबत फडणवीसांची भूमिका काय?

MPSC अध्यक्षांचा राजीनामा घेणे किंवा त्यांना पदावरून हटवणे हे राज्य सरकारच्या हातात नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. संविधानातील Article 317 चा उल्लेख करत त्यांनी MPSC अध्यक्षांना हटवण्याची प्रक्रिया स्पष्ट केली. विद्यमान MPSC अध्यक्ष हे पेपरफुटीची घटना घडली त्यावेळी अध्यक्ष नव्हते, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. त्यामुळे त्यांच्यावर थेट कारवाई करण्याची मागणी कितपत योग्य आहे, याचाही विचार करायला हवा, असं ते म्हणाले.

मात्र, विद्यार्थ्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी आयोगातील आजी-माजी अध्यक्षांची चौकशी करण्यास सांगितल्याचं फडणवीसांनी सांगितलं. चौकशीत कोणी दोषी आढळल्यास Article 317 नुसार राष्ट्रपतींकडे कारवाईची शिफारस केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकारने याबाबत राज्यपालांकडे विनंती केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुंबई पोलिसांबाबत फडणवीस काय म्हणाले?

मुंबई पोलिस प्रोफेशनली काम करतात आणि कोणावरही चुकीची कारवाई करत नाहीत, असं फडणवीसांनी सांगितलं. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या असून, त्या मागण्या मान्य केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपलं अभिनंदन केल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र, सध्याच्या आंदोलनाचा वापर नेतृत्वासाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

Rahul Gandhi Delhi Protest: ज्ञानेश, इट्स डन ब्रो!; राहुल गांधींचे ‘Gen-Z’ स्टाईल पोस्टर; दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात मोठा राडा

Web Title: Devendra fadnavis rahul gandhi protest mpsc students protest vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • INDIA Alliance
  • MPSC
  • Rahul Gandhi
  • Student Protest

संबंधित बातम्या

INDIA Alliance EC March: भाजपला नेस्तनाबूत करणार, मोदी, शाह, भागवतांनी देशद्रोह केला; राहुल गांधींचे खुले आव्हान
1

INDIA Alliance EC March: भाजपला नेस्तनाबूत करणार, मोदी, शाह, भागवतांनी देशद्रोह केला; राहुल गांधींचे खुले आव्हान

Cabinet Meeting : फडणवीस सरकारचे मोठे निर्णय, पोलिसांपासून विद्यार्थ्यांपर्यंत 7 नव्या घोषणा, पाहा नेमकं काय ठरलं?
2

Cabinet Meeting : फडणवीस सरकारचे मोठे निर्णय, पोलिसांपासून विद्यार्थ्यांपर्यंत 7 नव्या घोषणा, पाहा नेमकं काय ठरलं?

Rohit Pawar MPSC Protest Pune : आंदोलनावरून राजकारण तापलं! रोहित पवारांनी विक्रम पाचपुतेंना थेट पाडण्याचं चॅलेंज दिलं
3

Rohit Pawar MPSC Protest Pune : आंदोलनावरून राजकारण तापलं! रोहित पवारांनी विक्रम पाचपुतेंना थेट पाडण्याचं चॅलेंज दिलं

Rahul Gandhi Delhi Protest: ज्ञानेश, इट्स डन ब्रो!; राहुल गांधींचे ‘Gen-Z’ स्टाईल पोस्टर; दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात मोठा राडा
4

Rahul Gandhi Delhi Protest: ज्ञानेश, इट्स डन ब्रो!; राहुल गांधींचे ‘Gen-Z’ स्टाईल पोस्टर; दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात मोठा राडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.