Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन

Mangal Prabhat Lodha: या स्पर्धेत १० प्रमुख क्षेत्रांतील प्रत्येकी ५ उपक्षेत्रांमधून नाविन्यपूर्ण संकल्पनांची निवड केली जाणार आहे. अशा एकूण ५० विजेत्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे वर्क ऑर्डर देण्यात येणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 06, 2026 | 06:38 PM
mangal prabhat lodha

mangal prabhat lodha

Follow Us
Follow Us:
  • सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांनीही सहभाग घ्यावा- मंगल प्रभात लोढा
  • स्पर्धेसाठी सोलापूर येथील स्टेट इनोवेशन एंड रिसर्च फाउंडेशनचे मिळणार सहकार्य
  • प्रत्येकी ५ उपक्षेत्रांमधून नाविन्यपूर्ण संकल्पनांची निवड केली जाणार
मुंबई/Mangal Prabhat Lodha: केंद्रीय कौशल्य विभागामार्फत ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ या बहुराज्यीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कौशल्य (Career), रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत या स्पर्धेत राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांनीही यामध्ये सहभाग घ्यावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, यासाठी या नाविन्यता क्षेत्रात कार्यरत असलेली सोलापूर येथील स्टेट इनोवेशन एंड रिसर्च फाउंडेशनचे सहकार्य मिळणार आहे. तरी नाविन्यता क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा त्यांनी केले.

मंत्रालयात सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज या स्पर्धेत राज्यातील जिल्हा परिषद शालेय स्तरावरही सहभाग वाढावा. यासाठी सोलापूर येथील स्टेट इनोवेशन एंड रिसर्च फाउंडेशन (सर) यांच्यासोबत आयोजित बैठकीत मंत्री  लोढा बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील, स्टेट इनोव्हेशन एंड रिसर्च फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिध्दराम माशाळे, बाळासाहेब वाघ यावेळी उपस्थित होते.

बाणगंगा तलावातील जलजीवन धोक्यात? मृत माशांचा खच, Mangal Prabhat Lodha यांनी केली पाहणी

मंत्री लोढा म्हणाले की, ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ या स्पर्धेसाठी २१ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. या स्पर्धेत नवोन्मेषक, विद्यार्थी, विद्यार्थी गट, संशोधक, प्राध्यापक, स्टार्टअप्स, एमएसएमई, कंपन्या, सामाजिक संस्था, शैक्षणिक व संशोधन संस्था तसेच इतर इनोव्हेशन टीम्स या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्थानिक समस्या समजून घेण्याची आणि त्यावर सर्जनशील उपाय शोधण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात आहे. ही क्षमता केवळ शालेय प्रकल्पांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष समाजोपयोगी नवकल्पनांमध्ये रूपांतरित व्हावी, हा ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांना समस्या ओळखण्यापासून ते त्यावर उपाय विकसित करून तो प्रत्यक्षात आणण्यापर्यंत मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे.

या स्पर्धेत १० प्रमुख क्षेत्रांतील प्रत्येकी ५ उपक्षेत्रांमधून नाविन्यपूर्ण संकल्पनांची निवड केली जाणार आहे. अशा एकूण ५० विजेत्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे वर्क ऑर्डर देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनांना केवळ पुरस्कार न मिळता त्यांना प्रत्यक्ष अंमलबजावणीची संधीही उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा या उपक्रमातील सहभाग वाढविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी (NGO) पुढे यावे, असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांसह ग्रामीण भागातील विविध शाळांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचवून विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे आवश्यक आहे. महिला, युवा आणि सर्वांसाठी खुले असलेल्या विविध वर्गांमधून अधिकाधिक नाविन्यपूर्ण कल्पना पुढे याव्यात, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

शेती, पाणी, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण, वाहतूक यांसह दैनंदिन जीवनातील विविध समस्यांवर विद्यार्थ्यांनी व्यवहार्य उपाय सुचवावेत. एनजीओंनी विद्यार्थ्यांना स्थानिक समस्या ओळखणे, त्यावरील उपाय विकसित करणे आणि स्पर्धेसाठी अर्ज सादर करणे या संपूर्ण प्रक्रियेत मार्गदर्शन करावे. आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांची संख्या, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट, माहिती देण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तसेच सादर करून घेतल्या जाणाऱ्या दर्जेदार अर्जांची संख्या याबाबत स्पष्ट कृती आराखडा तयार करावा. तळागाळातील विद्यार्थ्यांच्या कल्पनांना राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शासन, शाळा आणि स्वयंसेवी संस्थांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://sevainnovationchallenge.in/ येथे संपर्क करावा असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा

सेवा फर्स्ट इनोवेशन चॅलेंज स्पर्धेत फाऊंडेशनचे मिळणार सहकार्य : सिध्दराम माशाळे

स्टेट इनोवेशन एंड रिसर्च फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिध्दराम माशाळे म्हणाले की, राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना देण्यासाठी सोलापूर येथील स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन (सर फाऊंडेशन) कार्य करत आहे. संस्थेमार्फत या स्पर्धेत शालेय शिक्षण विभागाच्या सहकार्याने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राबविली जाणारी सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेची माहिती जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांपर्यत पोहोचवली जाईल. विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना राज्य व राष्ट्रीयस्तरावर व्यासपीठ देण्यासाठी या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न केला जाईल, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

Web Title: Mangal prabhat lodha appeal to school students also participated in the seva first innovation challenge tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • Career News
  • CM Devendra Fadnavis
  • Mangal Prabhat Lodha
  • Skill Development

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन! ‘Participate Mumbai’मुळे शहराच्या विकासात नागरिकांचा थेट सहभाग
1

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन! ‘Participate Mumbai’मुळे शहराच्या विकासात नागरिकांचा थेट सहभाग

Devendra Fadnavis : ‘संविधान हातात घेऊन संविधानालाच नकार..,’ दिल्लीतील आंदोलनावरून फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
2

Devendra Fadnavis : ‘संविधान हातात घेऊन संविधानालाच नकार..,’ दिल्लीतील आंदोलनावरून फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

Cabinet Meeting : फडणवीस सरकारचे मोठे निर्णय, पोलिसांपासून विद्यार्थ्यांपर्यंत 7 नव्या घोषणा, पाहा नेमकं काय ठरलं?
3

Cabinet Meeting : फडणवीस सरकारचे मोठे निर्णय, पोलिसांपासून विद्यार्थ्यांपर्यंत 7 नव्या घोषणा, पाहा नेमकं काय ठरलं?

बाणगंगा तलावातील जलजीवन धोक्यात? मृत माशांचा खच, Mangal Prabhat Lodha यांनी केली पाहणी
4

बाणगंगा तलावातील जलजीवन धोक्यात? मृत माशांचा खच, Mangal Prabhat Lodha यांनी केली पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.