वारकऱ्यांसदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; वारीदरम्यान मृत्यू झाला तर मिळणार इतक्या लाखांची मदत
पंढरपूर आषाढी वारीला जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी सरकारने एक दिलासा देणारा आणि भावनिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा आणि अनपेक्षित घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबीयांना आधार मिळावा यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता वारीदरम्यान कोणत्याही अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना थेट ४ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. महसूल विभागाने यासंदर्भातील परिपत्रक आजच जाहीर केलं आहे.
Ashadhi Wari : “मस्तकी फेटा आणि कमरेला धोतर”; विठ्ठलाच्या पोशाखाची आहे रंजक आख्यायिका
अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना ४ लाखांची मदत
४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास – ७४,००० रुपये
६० टक्क्यांहून अधिक अपंगत्व आल्यास – २.५० लाख रुपये
एक आठवड्यापेक्षा अधिक रुग्णालयात उपचार घेतल्यास – १६,००० रुपये
एक आठवड्यापेक्षा कमी उपचार कालावधीसाठी – ५,४०० रुपये
कोणत्या घटनांमध्ये मदत मिळणार?
शासनाच्या परिपत्रकानुसार, १६ जून ते १० जुलै २०२५ या काळात वारीदरम्यान वारकऱ्यांना मृत्यू अथवा गंभीर दुखापत झाल्यास आर्थिक मदत मिळणार आहे.
अपघात
नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू
विषबाधा (अपघाती)
या घटनांचा समावेश असणार आहे. मात्र, आत्महत्या, खून अशा घटनांमध्ये ही मदत लागू होणार नाही.
सरकारकडून यंदा आरोग्य यंत्रणांनाही अधिक सज्ज करण्यात आल्या आहेत. आषाढी वारीदरम्यान राज्यभर मोफत आरोग्य तपासणी शिबिरं, कार्डिएक अॅम्ब्युलन्स, आणि तात्पुरती ICU सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना पंढरपूरला भेट देऊन तयारीचा प्रत्यक्ष आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच, प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या मोठ्या दिंड्यांसोबत सुसज्ज रुग्णवाहिका कायमस्वरूपी तैनात ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
Guru Purnima 2025: गुरु पौर्णिमा 10 की 11 नेमकी कधी? यावेळी तयार होणार विशेष योग
वारी म्हणजे फक्त अध्यात्मिक यात्रा नाही, ती हजारो कुटुंबांची श्रद्धा आणि भावनिक गुंतवणूक असते. अशावेळी अपघाती मृत्यू झाला तर शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत हा एक महत्त्वाचा आधार ठरू शकतो. हा निर्णय केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने एक चांगला निर्णय घेतल्याचं बोललं जात असून वारकऱ्यांच्या कुटुंबीयांन दिलासा मिळणार आहे .